नवी दिल्ली : भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त (Fourth Death Anniversary) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu), उपराष्ट्रपती जगदीप धनखर (Vice President Jagdeep Dhankhar) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह अनेक नेत्यांनी आज सकाळी अटल समाधी स्थळावर श्रद्धांजली वाहिली. २०१७ मध्ये त्यांचे निधन झाले.
गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट केले की, आदरणीय अटलजींनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण भारत मातेचे वैभव पुनर्संचयित करण्यासाठी घालवला. त्यांनी भारतीय राजकारणात गरीब कल्याण आणि सुशासनाच्या नवीन युगाची सुरुवात करून जगाला भारताच्या धैर्याची आणि सामर्थ्याची जाणीव करून दिली. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
President Murmu, PM Modi pay floral tribute to Atal Bihari Vajpayee on his death anniversary
Read @ANI Story |https://t.co/LDlpGtKsby#DroupadiMurmu #PMModi #AtalBihariVajpayee #floraltribute pic.twitter.com/yWfVfhigTT
— ANI Digital (@ani_digital) August 16, 2022
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही अटल समाधी स्थळी पोहोचून श्रद्धांजली अर्पण केली. माजी पंतप्रधानांना आदरांजली वाहताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लिहिले की, माजी पंतप्रधान आदरणीय अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना स्मरण करून नमन करतो. देशाला विकास आणि सुशासनाचा मंत्र देणाऱ्या अटलजींचे संपूर्ण जीवनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खोली आणि त्यांच्या सर्जनशीलतेच्या उंचीचे प्रतिबिंब आहे. भारताच्या विकासाच्या वाटचालीत त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे.