२ ते १७ ऑक्टोबर दरम्यान बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुलात अग्निवीर सैन्य भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी भरतीच्या तयारी संदर्भात आढावा बैठक…
पारडी (ठवरे) ग्रामपंचायतीतील मग्रारोहयोच्या वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरींची कामे २०२५ मध्ये पूर्ण झाली. संबंधित अनुदानाची रक्कम ग्रामपंचायतीला प्राप्त झाली आहे. मात्र अद्याप ही रक्कम लाभार्थ्यांना मिळालेली नाही.
प्रथमच दक्षिण रायगडातील ऐतिहासिक महाड नगरीत रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. १० सप्टेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापुरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, या मागणीसाठी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत कोंडी गावा जवळ…
खोपोली नगरपरिषदेत विकासकामांच्या नावाखाली जवळपास १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप भाजपाच्या नगरसेविका सानिया शेख यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे खोपोलीतील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
८० किंवा त्यापेक्षा अधिक प्रदूषण निर्देशांक असलेले उद्योग ‘लाल’ श्रेणीत येतात. कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पांचा अधिकृत निर्देशांक ९७.६ असतानाही त्यांचे ‘निळ्या’ श्रेणीत पुनर्वर्गीकरण केल्याचा आक्षेप अहवालात घेण्यात आला आहे.
चिमूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. इच्छुकांकडून आपल्या गटातील योग्य उमेदवाराचा शोध सुरू झाला असून, काही ठिकाणी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.
जवळपास ७० टक्के सोयाबीनचे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी ७० टक्क्यांपर्यंत उध्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे पुढचे वर्ष अत्यंत संकटात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.…
अलिबाग येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात पत्रकार परिषदेत शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी सरकार आणि महावितरणवर टीका केली. स्मार्ट मीटरसह संपूर्ण योजनेसाठी ३९,६०२ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी…
मुंबईत रेल्वे रूळ ओलांडण्याच्या घटनांमध्ये जुलै महिन्यात मोठी वाढ झाली आहे. जानेवारी ते जूनच्या तुलनेत जुलैमध्येच विक्रमी ४,५५० प्रकरणे नोंदवली गेली असून, प्रवाशांचा जीवघेणा शॉर्टकट चिंतेचा विषय ठरत आहे.
आदित्य बिर्ला ग्रुपने ‘अल्ट्राव्होल्ट’ या ब्रँडसह वायर्स अँड केबल्स व्यवसायात प्रवेश केला आहे. तब्बल १,८०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह कंपनीने पुढील पाच वर्षांत या क्षेत्रातील अव्वल दोन कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्याचे लक्ष्य…
देहूच्या भंडारा डोंगरावर बेवारस सापडलेलं दीड वर्षांचं बाळ सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. महिला पोलीस कर्मचारी राणी राऊत आईची माया देत बाळाची काळजी घेत असून, त्याला त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न…
हरियाणा सरकारच्या वाढत्या कर्जाबाबत कॅगच्या अहवालातून गंभीर चित्र समोर आले आहे. जुन्या कर्जाची परतफेड आणि व्याज भरण्यासाठीही नव्या कर्जाचा आधार घ्यावा लागत असल्याने राज्याच्या आर्थिक स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माथेरान नगरपरिषदेमार्फत केंद्र शासन पुरस्कृत अमृत-२.० अभियांन अंतर्गत या प्रकल्पामध्ये शार्लोट तलावातील गाळ धावरी नदीत सोडण्याची कार्यवाही प्रस्तावित असल्याचे निदर्शनास आले.
महाराष्ट्र धारण जमीन तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतच्या अधिनियमा'तील तरतुदींमुळे यापूर्वी अनेक ठिकाणी नियमापेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनींची खरेदी-विक्री अडचणीत आली होती. मात्र आता तुकडेबंदीमुळे रखडलेले जुने जमीन व्यवहार…
भाजप समर्थित युवा नेते रोहित बोम्मावार यांच्या 'साथ फाऊंडेशन'तर्फे सोमवारी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र खा. प्रतिभा धानोरकर काँग्रेस समर्थित दहीहंडीला उपस्थित न राहता भाजप समर्थित दहीहंडीला उपस्थित राहणार…
कर्जत तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांबाबत पोलीस मित्र संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज पासून कर्जत श्रीराम पूल येथे पोलीस मित्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम यांनी आंदोलन सुरू केले आहे.
मुंबईतील पालिका शिक्षकांवर आधीच बीएलओ आणि एसआयआरच्या कामाचा ताण असताना आता नवीन अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणाची भर पडली आहे. दूरच्या केंद्रांवर दिवसभर प्रशिक्षण आयोजित केल्याने शिक्षकांमध्ये नाराजी असून, स्थानिक पातळीवर प्रशिक्षण घेण्याची…
गिधाडांच्या योग्य संवर्धनासाठी ठोस उपाययोजना न झाल्याने त्यांचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. नियमित होणाऱ्या नोंदींवरून राज्यात सध्या सुमारे १०० गिधाडेच उरली असल्याचे स्पष्ट होते.