
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत आज देशाचा अर्थसंकल्प सादर (Union Budget 2023) केला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने विशेष लक्षपुर्वक या बजेटमध्ये अनेक गोष्टींचा सामावेश करण्यात आला आहे. समाजातील गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना याचा फायदा होईल, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) नव्याने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाचे कौतुक केले. असा ऐतिहासिक अर्थसंकल्प पुढे आणल्याबद्दल त्यांनी अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचे कौतुकही केले
” हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या उभारणीसाठी भक्कम पाया तयार करेल. हा अर्थसंकल्प गरीब, मध्यमवर्गीय लोक, शेतकऱ्यांसह महत्त्वाकांक्षी समाजाची स्वप्ने पूर्ण करेल,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच, पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोट्यावधी विश्वकर्मा या देशाचे निर्माते आहेत. शिल्पकार, कारागीर हे सर्वच देशासाठी कष्ट करतात. या अर्थसंकल्पात देशात प्रथमच अनेक प्रोत्साहनात्मक योजना आणल्या आहेत. अशा लोकांसाठी तंत्रज्ञान, पत आणि बाजारपेठेचे नियोजन करण्यात आले आहे. पीएम विश्वकर्मा योजना म्हणजे विकास या विश्वकर्मांसाठी मोठा बदल घडवून आणेल. खेड्यात राहणाऱ्या महिलांपासून ते शहरी महिलांपर्यंत सरकारने अनेक पावले उचलली आहेत. अशी अनेक पावले पूर्ण ताकदीने पुढे टाकली जातील. याशिवाय महिलांच्या बचत गटांनी भारतात मोठे स्थान घेतले आहे. त्यांना बळ देण्यासाठी अर्थसंकल्पात नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महिलांसाठी विशेष बजेट योजनाही सुरू करण्यात येत आहे. जन धन खात्यानंतर, या विशेष बचत योजनेचा सामान्य कुटुंबातील मातांना मोठा फायदा होणार आहे.
Those toiling traditionally through their hands for the country, ‘Vishvakarma’ are the creators of this country. For the first time scheme related to training & support for ‘Vishvakarma’ has been brought in the budget: PM Narendra Modi on #UnionBudget2023 (Source: DD) pic.twitter.com/9JgiCf56k3 — ANI (@ANI) February 1, 2023
मोदी म्हणाले, भारत सरकारने सर्वात मोठी अन्न साठवणूक योजना केली आहे. सर्वात मोठ्या स्टोरेज क्षमतेसाठी. आता आपल्याला कृषी क्षेत्रातील डिजिटल पेमेंटच्या यशाची पुनरावृत्ती करायची आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात आम्ही डिजिटल कृषी पायाभूत सुविधांसाठी मोठी योजना आणली आहे. ते पुढे म्हणाले, आम्ही बाजरीसाठी मोठी योजना आणली आहे. जेव्हा ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल, जगभरात लोकप्रिय होईल, तेव्हा त्याचा सर्वाधिक फायदा भारतातील शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात यासाठी मोठी योजना करण्यात आली आहे. त्यामुळे शेती करणाऱ्या आपल्या आदिवासी बंधू-भगिनींना फायदा होईल आणि देशाला या क्षेत्राला चालना मिळेल.