नवी दिल्ली – हापूस असो वा दशहरी आंबा, (Mango) सगळीकडे आंब्याच्या बाबतीच फसवणूक होण्याचे प्रकार सारखेच. महाराष्ट्रातही कर्नाटकातून आलेले आंबे हे हापूसचे म्हणून खपवले जातात. आंब्याच्या वरच्या रंगरुपाला ग्राहकही भुलतो आणि त्यानममुळं खरा हापूस पदरात पडण्याऐवजी वेगळाच आंबा पदरात पडल्याचं त्याला कळतं. आपल्यासारखीच स्थिती मलिहाबादी दशहरी या उ. भारतातील प्रसिद्ध आंब्याबाबतही आहे. त्यावर मात्र उपाय शोधण्यात आलाय. आता तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात हा आंबा मागवला, तर तुम्हाला कळेव की हा आंबा नेमक्या कोणत्या बागेतला आहे आणि या आंब्यांच्या बागेचा मूळ मालक कोण आहे.
[read_also content=”सलग दुसऱ्या दिवशी अमृतसर स्फोटानं हादरलं! स्फोटात IED वापरण्याचा पोलिसांना संशय, सुदैवाने जिवितहानी नाही https://www.navarashtra.com/india/blast-at-heritage-street-area-in-amritsar-no-casualties-reported-nrps-396243.html”][blurb content=””]
यासाठी आंब्याच्या पेट्यांवर क्यूआर कोड टाकण्यात आले आहेत. हे क्यूआर कोड तुम्ही स्कॅन केलात, तर आंबा नेमक्या कोणत्या प्रदेशातला आहे आणि ती बाग कोणती, बागेचा मालक कोण, ही सगळी माहिती तुम्हाला हातासरशी मिळणार आहे. मलिहाबादी दशहरी या आंब्याची खास चव आहे. हा इतर जिल्ह्यांतही घेतला जातो, त्यामुळं अनेकदा ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक. या आंब्याच्या वेगळेपणामुळे आणि मुळात तो मलिहाबादी दशहरी असल्यामुळंच अनेक राज्यात इतकंच काय तर पाकिस्तानातही या अंब्याला विशेष मागणी आहे. या आंब्याला जीआय मानांकनही देण्यात आलेलं आहे. या अंब्यांना जीआय टॅग लावून त्याची विक्री करण्यात येत होती. त्यामुळं आंब्याची विश्वसनीयता वाढत होती आणि अंब्याला जास्त दरही मिळत होता.
सामान्यपणे या दशहरी अंब्यांची विक्री करताना आंब्याच्या पेटीवर जीआाय मानांकनाचा टॅग लावण्यात येतो. मात्र तरीही ग्राहकांना अंब्याच्या पेटीत नक्की कोणता आंबा आहे, याची साशंकता मनात राहतेच. ही शंका दूर करण्यासाठी आंब्याच्या झाडांचं जियो टॅगिंगही आता करण्यात येणार आहे. यासह आंब्यावर कागदांचं कव्हरही घालण्यात येणार आहे. खरा आंबा कोणता हे कळण्यासाठी जीआय मानांकनासोबतच क्यूआर कोडची रचनाही करण्यात आलीय.
एका खासगी कंपनीच्या वतीनं हे करण्यात येतंय. कंपनीच्या संस्थापकांनी सांगितलं की यासाठी सुमारे २०० आंब्याच्या मालकांशी त्यांनी संपर्क साधला. याबाबत एक मिटिंगही घेण्यात येणार आहे. या जियो टॅगिंगसाठी प्रत्येक पेटीमागे आंब्याच्या मालकांना ६० पैसे द्यावे लागतील. हा विचार केला तर प्रत्येक आंब्याला ५ पैसे पडणार आहेत. यामुळं ग्राहकांनाही खरा आंबा खात असल्याचं समाधानन मिळणार आहे. यासह व्यापारी आणि शेतकऱ्यांनाही जादा पैसे मिळणार आहेत.