Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुजरातमध्ये भाजपचा पराभव करण्याचा राहुल गांधीचा दावा; पण आकडेवारी काय सांगते?

लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे अध्योध्येत त्यांचा पराभव झाला. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये काँग्रेस नरेंद्र मोदी आणि भाजपचा पराभव करेल हे लिहून ठेवा. असे राहुल गांधींनी म्हटले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 07, 2024 | 10:09 AM
Team Navrashtra

Team Navrashtra

Follow Us
Close
Follow Us:

गुजरात: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 99 जागा जिंकल्यानंतर आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी राहुल गांधी यांनी स्वीकारल्यानंतर, काँग्रेसमध्ये पक्षाला जणू नवसंजीवनी मिळाली आहे. पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते उत्साहात आहेत. अशातच गुजरात दौऱ्यावर असताना शनिवारी (6 जुलै) आपण अयोध्येत जसा भाजपचा पराभव झाला तसा आपण गुजरातमध्येही भाजपचा पराभव करू, अशी गर्जनाच केली आहे.

अहमदाबादमध्ये पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, भाजपने आम्हाला धमक्या देऊन आणि आमच्या कार्यालयाचे नुकसान करून आव्हान दिले आहे. पण ज्याप्रमाणे त्यांनी आमचे कार्यालय फोडले तसेच आम्हीही त्यांचे सरकार फोडणार आहोत. लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे अध्योध्येत त्यांचा पराभव झाला. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये काँग्रेस नरेंद्र मोदी आणि भाजपचा पराभव करेल हे लिहून ठेवा.

मात्र, राहुल गांधींनी असा दावा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीतही त्यांनी अशा गोष्टी बोलल्या होत्या. निवडणुकीत काँग्रेसला एकतर्फी विजय मिळत असल्याचे ते त्यावेळी म्हणाले होते. त्यावेळचे निकाल पाहिले असता त्यावेळी भाजपने 99 आणि काँग्रेसने 77 जागा जिंकल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसने 1, भारतीय आदिवासी पक्ष 2 आणि 3 अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. नरेंद्र मोदी केंद्रात पंतप्रधानपदावर असतानाही काँग्रेसला सरकार स्थापन करता आले नाही.

2022 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधींनी असाच दावा केला होता.   गुजरातच्या जनतेने यावेळी भाजपला सत्तेवरून हटवण्याचे ठरवले आहे. पण त्यावेळच्या निवडणूक निकालांनी काँग्रेसची झोप उडवली. भाजपला 156 जागा मिळाल्या. काँग्रेसला केवळ 17 जागांवर समाधान मानावे लागले. तर आम आदमी पक्ष  5 जागा आणि इतर पक्षांना 4 जागा मिळाल्या.

आता 2027 मध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यासाठी राहुल गांधींनी आतापासूनच राज्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे आणि त्याच क्रमाने गुजरातमध्ये पोहोचलेल्या राहुल गांधींनी पुन्हा एकदा राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. तर जुने आकडे वेगळेच चित्र मांडत आहेत. गेल्या वेळची आकडेवारी आणि आता ते करत असलेला दावा पाहता राहुल गांधी गुजरात जिंकण्यासाठी काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Web Title: Rahul gandhi claims to defeat bjp in gujarat but what do the statistics say

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2024 | 10:06 AM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Gujrat
  • Gujrat Politics
  • political news
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Gujarat Cabinet Expansion: गुजरातमध्ये एवढी मोठी राजकीय उलथापालथ का? ‘मिनी-असेंब्ली’साठी ‘ भाजपचा मोदी फॉर्म्युला’
1

Gujarat Cabinet Expansion: गुजरातमध्ये एवढी मोठी राजकीय उलथापालथ का? ‘मिनी-असेंब्ली’साठी ‘ भाजपचा मोदी फॉर्म्युला’

Rahul Gandhi: ‘तुम्ही चुकीचे आहात’! पंतप्रधान मोदींवरील टिप्पणीबद्दल अमेरिकन गायकाने राहुल गांधींना सुनावले खडे बोल
2

Rahul Gandhi: ‘तुम्ही चुकीचे आहात’! पंतप्रधान मोदींवरील टिप्पणीबद्दल अमेरिकन गायकाने राहुल गांधींना सुनावले खडे बोल

Uddhav Thackeray: “तर सरकारला सोडणार नाही…; उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?
3

Uddhav Thackeray: “तर सरकारला सोडणार नाही…; उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

बिहारच्या राजकारणात मोठ्या घडामोडी; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतली मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट
4

बिहारच्या राजकारणात मोठ्या घडामोडी; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतली मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.