...अन्यथा भारतात AI क्रांती कशी अशक्य? राहुल गांधींनी संसदेत मांडला मुद्दा
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या AI अर्थात आर्टिफिसीअल इंटेलिजन्सचा बोलबाला आहे. तंत्रज्ञानच नाही तर शेतीपासून सर्वचं क्षेत्रात याचा वापर होणार आहे. हा जगासाठी नवा अविष्कार आहे. दरम्यान चीनी DeepSeek च्या अविष्काराने अमेरिकेसह या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना मोठा धक्का बसला आहे. भारतही स्वत: चं एआय मॉडेल विकसित करण्याच्या प्रयत्नात आहे. अर्थसंकल्पातही AI साठी तरतूद करण्यात आली आहे. त्यावर राहुल गांधी यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. अमेरिका आणि चीनकडे स्वत: डेटा आहे. त्यामुळे त्यांनी AI मॉडेल विकसित करणं सोपं झालं. मात्र आपल्याकडे डेटाच नाही ज्याच्यावर एआय काम करत. मग भारतात एआय क्रांती कशी शक्य आहे, असा मुद्दा राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
… तरच 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरील टॅक्स होणार माफ; सोप्या शब्दांत समजून घ्या नक्की काय आहे गणित
राहुल गांधी म्हणाले की, चीन उत्पादनात भारतापेक्षा कितीतरी पुढे आहे. आहे तर भारत वापरात पुढे आहे. आपण सध्या एआय बद्दल बोलत आहोत. मी देशातील तरुणांना सांगू इच्छितो की एआय डेटावर चालतं हे समजून घेण्याची गरज आहे. डेटाशिवाय एआयचा काहीही उपयोगन नाही ते अस्तित्वातच येणार नाही. एक गोष्ट स्पष्ट होते की डेटा, मग तो फोनचा असो, इलेक्ट्रिक कारचा असो किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या गॅझेटचा असो. त्या डेटावर चीनचे नियंत्रण आहे. त्याच वेळी, जर आपण वापराच्या डेटाबद्दल विचार केला तर त्यावर अमेरिकेचं वर्चस्व आहे.
आपल्याला उत्पादन नेटवर्कवर काम करावं लागेल. या क्षेत्रात चीन आपल्यापेक्षा १० वर्षे पुढे आहे. तो गेल्या १० वर्षांपासून बॅटरी, रोबोट आणि मोटर्सवर काम करत आहे. आपल्याला या तंत्रज्ञानावर काम करावे लागेल. डेटाशिवाय, एआयच्या क्षेत्रात क्रांती होऊट शकत नाही, असं राहुल गांधी यांनी ठामपणे सांगितलं.
Budget 2024 : शेती, रोजगार, घरं की पायाभूत सुविधा; अर्थसंकल्पात महाराष्ट्राला नक्की काय मिळालं?
मेक इन इंडियाचा संदर्भ देत राहुल गांधींनी फोन दाखवला आणि म्हणाले की जर आपण म्हणलो की तो भारतात बनलेला आहे, तरी त्याचे भाग चीनमधून आले आहेत आणि ते येथे असेंबल केले गेले आहेत. आम्ही उपभोगावर लक्ष केंद्रित केलं त्यामुळे समाजात असमानता वाढली. प्रश्न असा आहे की एआय कोणता डेटा वापरत आहे. भारताकडे कोणताही डेटा नाही. एआय चीनी किंवा अमेरिकन डेटा वापरेल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.