Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Election Commission Of India: ‘तो’ एक लेख अन…; निवडणूक आयोग राहुल गांधीच्या जाळ्यात ?

निवडणूक आयोगाने (EC) निवडणुकीसंदर्भातील व्हिडिओ फुटेज आणि छायाचित्रे जतन करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 21, 2025 | 03:28 PM
Election Commission Of India: ‘तो’ एक लेख अन…; निवडणूक आयोग राहुल गांधीच्या जाळ्यात ?
Follow Us
Follow Us:

 Raul Gandhi on Election Commission Of India: देशभरातील विरोधी पक्षनेत्यांकडून सातत्याने लोकसभा निवडणूक आणि विविध राज्यात झालेल्या विषेशत: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक प्रक्रियेत आणि निकालांत फेरफार झाल्याचा आरोप करत आहेत.  राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत एकतर्फी निवडणूक आयुक्तांची निवड, बनावट मतदारांची नोंदणी, बनावट मतदान, टार्गेट बूथ रिगिंग आणि CCTV फुटेज वा पुरावे लपवण्याचे प्रकार उघड केले आहेत. महाराष्ट्रात मतदानानंतर अचानक ७.८३ टक्क्यांनी वाढलेली मतदान टक्केवारी ही निवडणूक इतिहासातील अभूतपूर्व घटना आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते..

हे सर्व सुरू असतानाच काल निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावरून राजकारणात नव्या वादाची ठिणगी पडणार असल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ एका वर्षाऐवजी केवळ ४५ दिवसांतच नष्ट  कऱण्याचा निर्णय़ घेतला आहे. आयोगाच्या या निर्णयावर खासदार राहुल गांधी य़ांनी पुन्हा निशाणा साधत संशय व्यक्त केला आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ एका वर्षाऐवजी केवळ ४५ दिवसांत डिलीट करण्याचा घेतलेला निर्णय हाही संशयास्पद आहे. हे संपूर्ण प्रकरण म्हणजे लोकशाहीसाठी धोकादायक ‘मॅच फिक्सिंग’ असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

Israel Iran War : इस्रायलशी युद्धादरम्यान इराणमध्ये भूकंपाचे तीव्र झटके; नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

राहुल गांधी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर एक्स अकाउंटवरून पोस्ट शेअर करत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर निशाणा साधला आहे. मतदार यादी?- Machine Relatable स्वरूप प्रदान करणार नाही, सीसीटीव्ही फुटेज?-कायदा बदलून ते लपवण्यात आले. निवडणुकीचा फोटो-व्हिडिओ?- आता, एका वर्षात नाही, तर आपण ते फक्त ४५ दिवसांत नष्ट केले जाणार. ज्याच्याकडून उत्तर हवे होते – तेच पुरावे नष्ट करत आहेत. त्यामुळे  हे स्पष्ट दिसून आले आहे आणि फिक्स निवडणूक लोकशाहीसाठी विषासारख्या आहेत.

दरम्यान, १५ दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात पानभर लिहिलेल्या लेखात  पाच टप्प्यात महाराष्ट्राच्या निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचा आरोप केला होता.  राहुल गांधी यांनी निवडणूक आयुक्तांची एकतर्फी निवड, बनावट मतदार, बोगस मतदान, टार्गेट बुथ रिंगिंग आणि सीसीटीव्ही पुरावे लवपल्याचे आरोप निवडणूक आयोगावर केले होते. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात मतदानानंतर अचानक ७.८३ टक्के मतदान टक्केवारी वाढण्याच्या मुद्याकडेही लक्ष वेधलं होत. ही  आतापर्यंतच्या इतिहासातील  अभूतपूर्व घटना असल्याचे म्हटले होते. त्यांनी या सर्व घडामोडींना मॅच-फिक्सिंग असल्याच आरोपपही केला होता. या आरोपांनंतर आता निवडणूक आयोगाने निवडणुकीचे फोटो आणि सर्व सीसीटीव्ही फुटेज ४५ दिवसात डिलीट करण्याचा निर्णय घेतल्यामुळे राहुल गांधी पुन्हा आक्रमक झाले आहे, ही निवडणूक फिक्स केल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे.

आषाढीसाठी पंढरपूरची तयारी; पंढरपूरमधील पश्चिमद्वार ते चौफाळा एकेरी मार्ग रहदारीस खुला ठेवण्याचे आदेश जारी

काय आहे निवडणूक आयोगाचा निर्णय?

निवडणूक आयोगाने (EC) निवडणुकीसंदर्भातील व्हिडिओ फुटेज आणि छायाचित्रे जतन करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. यानुसार, निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित डेटा केवळ ४५ दिवसांपर्यंत जतन केला जाणार असून, त्या कालावधीत कोणतीही निवडणूक याचिका दाखल न झाल्यास तो डेटा नष्ट केला जाईल.

३० मे रोजी आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना (CEO) पत्र पाठवून ही सुधारित धोरणं स्पष्ट केली. आयोगाच्या म्हणण्यानुसार, व्हिडिओग्राफी व फोटोग्राफी ही कायद्याने अनिवार्य नसून ती निवडणूक प्रक्रियेसाठी आंतरिक व्यवस्थापनाचे साधन म्हणून वापरली जाते. अलीकडच्या काळात अशा दृश्यांचा सोशल मीडियावर गैरवापर वाढला असून, त्यातून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Rahul gandhi criticizes election commissions decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 03:28 PM

Topics:  

  • election commission of india
  • Maharashtra Assembly Elections

संबंधित बातम्या

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
1

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
2

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं
3

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’
4

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.