Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्षेप घेतला. शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच असल्याचे सांगत त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले.

  • By विवेक
Updated On: Aug 14, 2026 | 03:13 PM
Supriya Sule

Supriya Sule

Follow Us
Follow Us:
  • शिवसेना उद्धव ठाकरेंचीच असल्याचा सुप्रिया सुळेंचा दावा
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच असल्याचा पुनरुच्चा
  • पक्षफुटी आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर टीका
 

शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह यासंदर्भातील प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने फूट पडली, ती संविधानाच्या चौकटीत बसणारी नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच या प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने फूट पाडण्यात आली, ती योग्य नाही. या संपूर्ण प्रक्रियेबाबत विरोधकांनाही आणि आम्हालाही वस्तुस्थिती माहिती आहे. निवडणूक आयोगासारख्या संस्थेचा अशा प्रकारे वापर होणे लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी म्हटले.

‘शिवसेना काल, आज आणि उद्याही उद्धव ठाकरेंचीच’

शिवसेनेच्या नेतृत्वावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांची बाजू घेतली. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि त्यांच्या हयातीत पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवली, त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच असल्याचे त्या म्हणाल्या.

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद

वेगळा राजकीय मार्ग स्वीकारायचा असेल तर राज ठाकरे यांनी स्वतंत्र पक्ष उभारल्याप्रमाणे तो मार्ग स्वीकारता आला असता, असेही सुळे यांनी नमूद केले. स्वतःच्या कर्तृत्वावर पक्ष उभा करणे ही कौतुकाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही निवडणूक आयोगावर नाराजी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणाचाही सुप्रिया सुळे यांनी यावेळी उल्लेख केला. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य असून पक्षाच्या घटनेतील तरतुदींनुसार केवळ आमदार आणि खासदारांच्या संख्येवर पक्षाचे मालकी हक्क ठरत नसल्याचा दावा त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच असल्याचे सांगत या संदर्भातील कागदपत्रे न्यायालयात सादर केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसवर अन्याय केल्याचे जड अंतःकरणाने म्हणावे लागत आहे, अशी नाराजी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हाच्या वादावर न्यायालयीन प्रक्रियेत पुढे काय निर्णय होतो, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Shiv Sena Symbol Case : निकालानंतर रडण्यासाठी वातावरण निर्मिती ;शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची उबाठा गटावर खरमरीत टीका

Web Title: Supriya sule shivsena uddhav thackeray election commission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • election commission of india
  • NCP Sharad Pawar
  • Sharad Pawar
  • Shivsena UBT
  • supriya sule
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Election Commission Controversy : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थेट हायकोर्टात याचिका; SIR थांबवण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?
1

Election Commission Controversy : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थेट हायकोर्टात याचिका; SIR थांबवण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार

Rahul Gandhi Live PC News: ज्ञानेश कुमारांनी निवडणूक यंत्रणा उदध्वस्त केली, मोदी-शाह मास्टमाईंड: राहुल गांधींचा घणाघात
3

Rahul Gandhi Live PC News: ज्ञानेश कुमारांनी निवडणूक यंत्रणा उदध्वस्त केली, मोदी-शाह मास्टमाईंड: राहुल गांधींचा घणाघात

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल
4

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.