rajiv gandhi jayanti
नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची आज जयंती आहे. यानिमित्ताने कॉंग्रेस नेते, पदाधिकारी यांच्याकडून अभिवादन केले जात आहे. राजीव गांधी यांचे समर्थक त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. राजीव गांधींचे चिंरजीव व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या वडिलांसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या भावनिक पोस्टमध्ये त्यांनी आपले मत मांडले आहे. आपल्या वडिलांची स्वप्न आपली मानून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील राहुल गांधी म्हणाले आहेत.
राहुल गांधींची भावूक पोस्ट
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच वडीलांना आदरांजली वाहिली आहे. राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, एक करुणामय व्यक्तिमत्व, सौहार्द व सद्भावनेचं प्रतीक”, बाबा, तुमची शिकवण माझी प्रेरणा आहे. भारतासाठीची तुमची स्वप्नं तीच माझीही स्वप्न आहेत. तुमच्या आठवणी सोबत घेऊन मी ती स्वप्नं पूर्ण करेन”, अशा शब्दांत राहुल गांधींनी वडिलांसाठी आपल्या भावना पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत. तसेच आज सकाळी राहुल गांधींनी दिल्लीतील वीर भूमीला भेट दिली.
एक करुणामय व्यक्तित्व, सौहार्द और सद्भावना के प्रतीक…
पापा, आपकी सीख मेरी प्रेरणा है, और भारत के लिए आपके सपने मेरे अपने – आपकी यादें साथ ले कर इन्हें पूरा करूंगा। pic.twitter.com/LFg6N43eZW
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 20, 2024
जयराम रमेश यांची खास पोस्ट
काँग्रेसचे नेते व खासदार जयराम रमेश यांनीही देशाच्या राजकीय व तंत्रज्ञानविषयक विकासाची आठवण करुन देत राजीव गांधींच्या योगदानाबाबत भावूक पोस्ट केली आहे. जयराम रमेश यांनी लिहिले आहे की, आज राजीव गांधींची 80वी जयंती आहे. त्यांचं राजकीय जीवन अल्पकालीन पण अत्यंत प्रभावी ठरलं. 1985 च्या अर्थसंकल्पात अर्थविषयक धोरणांचा एक नवा दृष्टीकोन मांडण्यात आला होता. या अर्थसंकल्पात राजीव गांधींची महत्त्वाची भूमिका होती. राजीव गांधींच्या हत्येपूर्वी काही आठवडे त्यांनी 1991 च्या निवडणुकांसाठीच्या जाहीरनाम्यावर बरंच काम केलं होतं. त्यातील आर्थित तरतुदींच्या पार्श्वभूमीवर नरसिंग राव-मनमोहन सिंग यांनी जुलै 1991 मध्ये देशात मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुधारणा राबवल्या, अशा आठवणी जयराम रमेश यांनी व्यक्त केल्या आहेत.
The greatest memorial to Rajiv Gandhi’s life’s work would be to revive India’s inherent culture of empathy, healing, and reconciliation, fostering intellectual freedom, technological innovation, and youth empowerment.
This would be achieved with a balanced approach that… pic.twitter.com/qTqcdyFjbW
— Mallikarjun Kharge (@kharge) August 20, 2024