Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi Hydrogen Bomb: हरियाणानंतर बिहारमध्येही मतचोरी होणार! थेट पुरावे दाखवत राहुल गांधीचा गंभीर आरोप

हरियाणा वासियांनो तुमचे सरकार चोरण्यात आले आहे. हरियाणात खोटे सरकार स्थापन झाले आहे. हरियाणात २ कोटी मतदार आहेत. त्यात २५ लाखांची मतचोरी झाली आहे.  हरियाणात १२.५ टक्के मतचोरी झाली होती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 05, 2025 | 01:47 PM
Rahul Gandhi Hydrogen Bomb: Rahul Gandhi Press Conference

Rahul Gandhi Hydrogen Bomb: Rahul Gandhi Press Conference

Follow Us
Close
Follow Us:

Rahul Gandhi Hydrogen Bomb: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्रातील मोदी सरकारवर  मतचोरीचे गंभीर आरोप केले  आहेत. ऑगस्ट महिन्यात त्यांनी कर्नाटकातील महादेव पुरा मतदारसंघात झालेल्या मतचोरीचा मुद्दा उपस्थित करत केंद्र आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी आपण हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला होता. राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत हरियाणा निवडणुकीत झालेल्या मतचोरीचे खुलासे केले  आहेत.

 वाचा, काय म्हणाले राहुल गांधी ?

“कर्नाटकातील महादेवपुरानंतर हा मतचोरीचा मुद्दा आहे. तो एका राज्यात किंवा जिह्यात होत नाहीये तो संपूर्ण देशात सुरू आहे.  एक्झिटपोलनुरसार हरियाणात काँग्रेसचे सरकार येणार असल्याचे दाखवत होते. आमचा डेटा, पक्ष हेदेखील काँग्रेसच्या बाजूने कल देत होते. पहिल्यांदाचा पोस्टल बॅलेट्स  आणि राज्याचे निकाल वेगवेगळे होते. पोस्टल बॅलेटनुसार काँग्रेस पुढे होती. ओपीनियन पोल, एक्झिट पोल यासर्वात काँग्रेस पुढे होती. पण निकाल काही वेगळेच आले. आम्ही खोलवर चौकशी केली. ”

Rahul Gandhi PC: हरियाणात २५ लाख मतांची चोरी; राहुल गांधींचा Hydrogen Bomb

आम्हाला एक उत्तर मिळाले, सरकार एक ऑपरेशन  करत आहे.  मतांची चोरी करण्यात आली होती. हरियाणात काँग्रेसचा विजय होता तो पराभवात बदलण्यात आला. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपच्या एका नेत्याचे पत्रकार परिषदेतील काही  फुटेज दाखवले त्यात हा नेता हरियाणात भाजप एकतर्फी सरकार बनवत असल्याचे म्हणताना दिसत आहे. आमच्याकडे सर्व व्यवस्था आहे. राहुल गांधी म्हणाले, जर सगळे एक्झिट पोल, ओपीनियन  पोल  काँग्रेस जिंकत असल्याचे म्हणत आहेत आणि हे हसत हसत सांगता आहेत की  आमच्याकडे सर्व व्यवस्था आहेत. मग भाजपकडे अशा कोणत्या व्यवस्था आहेत, असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

हा हरियाणाचा अंतिम इलोक्टोरल नकाशा आहे. हरियाणात काँग्रेस जवळपास २२ हजार मतांनी हरली. ८ मतदारसंघात पराभव झाला. ही यादी आहे. पण मतांचा फरक जोडला असता ८ मतदारसंघात २२ हजार मते जोडली असती तर काँग्रेसचा विजय झाला असता. पण जर एकूण मतांची आकडेवारी पाहिली तर १.१६ लाख मतांचे अंतर होते. १ लाख आणि २२ हजार,हा आकडा लक्षात ठेवा.

Delhi Riots 2020: दिल्ली दंग्यांबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय; दोन जणांची निर्दोष मुक्तता, सहा जण दोषी

राहुल गांधी यांनी एका तरुणीचा फोटो स्क्रीनवर शेअर केला. ते म्हणाले या तरूणीने २२ वेळा १० मतदान केंद्रावर  मतदान करण्याची संधी मिळते. राय मतदारसंघात २२ वेळा १० मतदान केंद्रांवर या तरूणीला मतदान करण्याची संधी मिळते. ही तरूणी ब्राझीलची मॉडेल आहे. म्हणजेच हे केंद्रीय ऑपरेशन  आहे. कारण १० मतदान केंद्रावर हीचा फोटो आहे. म्हणजे हे BLOचे काम नाही. हे सेंटरमधून डेटाबेसमध्ये टाकण्यात आले आहे.  ब्राझीलची महिला २२ वेळा हरियाणात मतदान करते.

हरियाणात पाच पद्धतीने  मतचोरी करण्यात आली आहे. डुप्लिकेट मतदार: ५२१,६१९ चुकीचा पत्ते: ९३,१७४ मोठ्या प्रमाणात मतदार: १९,२६,३५१ असे आहेत. महादेव पुरातील मतदारसंघातील प्रेझेन्टेशननंतर निवडणूक आयोगाने आम्हाला इतर फॉर्म्स दिले नाहीत. त्यावेळी त्यांनी चूक केली. पण आता आम्हाला फ़ॉर्म ७ दिले नाहीत. महादेवपुरात फॉर्म ६ मध्ये  ३० टक्के मतचोरी झाली होती. आता इथेही तसेच झाले असणार. फ़ॉर्म ६ आणि फ़ॉर्म ७मध्ये जवळपास १० लाख मतांची चोरी झाली असावी असा आमचा अंदाज आहे. पण आमच्याकडे त्याचे रेकॉर्ड्स नाहीत.

हरियाणा वासियांनो तुमचे सरकार चोरण्यात आले आहे. हरियाणात खोटे सरकार स्थापन झाले आहे. हरियाणात २ कोटी मतदार आहेत. त्यात २५ लाखांची मतचोरी झाली आहे.  हरियाणात १२.५ टक्के मतचोरी झाली होती. त्यानंतरही काँग्रेस केवळ २२ हजार मतांनी हरते.  एक फोटो एक मतदारसंघ १०० मते. एकाच महिला फोटोपुढे वेगवेगळी नावे, असे करण्यात आले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या कथित मतदार गैरव्यवहारांबाबत निवडणूक आयोगावर तीव्र आरोप केले आहेत. “एका बूथवर त्याच महिलेचे नाव तब्बल २२३ वेळा आल्याचे दिसून आले आहे. त्या महिलेने किती वेळा मतदान केले, याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे,” असे ते म्हणाले.

Train accident : भीषण रेल्वे अपघात! रक्ताचा सडा अन् मृतदेहाचे तुकडे…, भरधाव हावडा-कालका एक्स्प्रेसने भाविकांना चिरडलं

राहुल गांधी  म्हणाले की, “सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आले कारण त्यातून बूथवरील गैरव्यवहार उघड झाले असते. एका मुलीने १० ठिकाणी मतदान केले, तर बनावट फोटो असलेले १,२४,१७७ मतदार होते. एका महिलेने नऊ ठिकाणी मतदान केल्याची नोंद आहे. या सर्व प्रकारामागे भाजपला मदत करण्याचा हेतू असल्याचा आरोप केला. तसेच, या मतचोरीची चौकशी आता जनतेनेच केली पाहिजे.” असे आवाहनही त्यांनी केले.

 

Web Title: Rahul gandhi hydrogen bomb after haryana there will be vote rigging in bihar too rahul gandhis serious allegation showing direct evidence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 01:47 PM

Topics:  

  • Rahul Gandhi
  • Rahul Gandhi News

संबंधित बातम्या

Rahul Gandhi News: इंदिरा गांधींमध्ये नरेंद्र मोदींपेक्षा जास्त हिंमत होती…; राहुल गांधींनी मोदींना पुन्हा डिवचले
1

Rahul Gandhi News: इंदिरा गांधींमध्ये नरेंद्र मोदींपेक्षा जास्त हिंमत होती…; राहुल गांधींनी मोदींना पुन्हा डिवचले

Bihar Elections: मतांसाठी नाचा म्हटलं तरी पंतप्रधान नाचतील; बिहारच्या प्रचारामध्ये हे काय बोलून गेले राहुल गांधी
2

Bihar Elections: मतांसाठी नाचा म्हटलं तरी पंतप्रधान नाचतील; बिहारच्या प्रचारामध्ये हे काय बोलून गेले राहुल गांधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.