
Rahul Gandhi Press confernce on vote chori brazilian model voted 22 times in haryana elections
Brazilian Model Vote in India: नवी दिल्ली : लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यांनी पुन्हा एकदा मतदार याद्यांमधील घोळ समोर आणून निवडणूक आयोगाची गोची केली. देशामध्ये राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर मतांची चोरी होत आहे. त्यांनी निवडणूक आयोग (ECI) आणि भारताच्या लोकशाही प्रक्रियेवर १००% पुराव्यांसह प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर एका ब्राझीलच्या मॉडेलने हरयाणामध्ये 22 वेळा मतदान केल्याचा धक्कादायक दावा राहुल गांधींनी केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत कथित मतांची चोरी वैयक्तिक मतदारसंघांमध्ये नाही तर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर होत असल्याचे सांगितले. सर्व सर्वेक्षणांनी हरियाणामध्ये काँग्रेसचा विजय दर्शविला होता, परंतु त्याचा परिणाम असा झाला की काँग्रेसचा हरियाणा निवडणुकीत फक्त २२,७७९ मतांनी पराभव झाला.राहुल गांधी यांनी दावा केला की हरियाणामध्ये एकूण २५ लाख म्हणजेच १२.५% मते चोरीला गेली. त्याचबरोबर ब्राझीलच्या मॉडेलचे फोटो दाखवून हरयाणामध्ये 22 वेगवेगळ्या ठिकाणी मतदान झाल्याची धक्कादायक बाब समोर आणली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राहुल गांधी म्हणाले की, “हरियाणात आम्ही सखोल चौकशी केली. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि हरियाणात मत चोरी झाल्याचा दावा त्यांनी पुन्हा केला. या पत्र परिषदेत त्यांनी एका मुलीचा फोटो दाखवला. ती ब्राझिलयन मॉडेल असून तिच्या फोटोच्या आधारे विविध नावावर 22 ठिकाणी मतदान झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. या मॉडेलच्या नावावर 22 मतदार ओळखपत्र समोर आल्याचा दावा त्यांनी केला. तिचे नाव कधी सीमा तर कधी स्वीटी असल्याचा दावा त्यांनी केला. 10 वेगवेगळ्या बूथवर तिने 22 वेळा मतदान केलं आहे.” असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
हरियाणा की वोटर लिस्ट में ब्राजील की मॉडल ब्राजील की एक मॉडल की तस्वीर हरियाणा की वोटर लिस्ट में पाई गई है। इन्हें 10 बूथ में 22 बार वोट देने का मौका मिलता है। साफ है कि ये BLO का काम नहीं है। ये फर्जी डेटा, सेंटर से डाटाबेस में डाला गया है। : नेता विपक्ष श्री @RahulGandhi… pic.twitter.com/6dTbdMKNof — Congress (@INCIndia) November 5, 2025
मॉडेलचा फोटो दाखवत राहुल गांधी यांनी सांगितले की, “10 बुथवर 22 वेळा मतदान केले. प्रत्येक वेळी नावात बदल करण्यात आला. एकाच मॉडेलच्या फोटोवर विविध नावांआधारे 22 वेळा मतदान केले. हरियाणात जे 25 लाख मत चोरी झाली, त्यात हा एक मोठा घोटाळा असल्याचा दावा त्यांनी केला. वोट चोरी, मत चोरी हे 5 श्रेणीत करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. 5,21,619 बोगस मतदार आहे. 93,174 पत्ते बोगस आहेत. 19,26,351 एकगठ्ठा मतदार आहे. फॉर्म 6 आणि 7 चा मोठा गैरवापर झाला. हा एक केंद्रीय कट असल्याचा आरोप त्यांनी केला.”
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
हरयाणा विधानसभा निवडणुकीमध्ये ठरवून कॉंग्रेसचा पराभव केला असल्याचा दावा राहुल गांधींनी केला. ते म्हणाले की, “हरियाणात एक्झिट पोलमध्ये काँग्रेसचा विजय दाखवत होते. तर हरियाणाच्या इतिहासात पहिल्यांदाच पोस्टल मतदान आणि वास्तविक मतदानात मोठा फरक दिसला. हरियाणात यापूर्वी असे कधीच दिसले नाही. त्यामुळे आम्ही खोलात जाऊन चौकशी करण्याचे ठरवले. मी निवडणूक आयोग आणि भारताची लोकशाही प्रक्रियेवर मी त्यामुळेच सवाल उभे करत आहे. हे हवेतील आरोप नाही तर त्यासाठी 100% पुरावे सादर करत आहे. मला खात्री आहे की काँग्रेसच्या महाविजयाचे रुपांतर पराभवात करण्याची योजना आखण्यात आली,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.