Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मावळ तालुक्यात झेडपी–पंचायत समितीच्या १५ जागांवर राष्ट्रवादीचा दणदणीत विजय; भाजपाचा सुपडा साफ

ल्या २५ वर्षांपासून मावळ पंचायत समितीवर सत्ता असलेल्या भाजपाला यावेळी एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे हा निकाल भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 09, 2026 | 02:59 PM
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti election results BJP defeated in Maval

Pune Zilla Parishad and Panchayat Samiti election results BJP defeated in Maval

Follow Us
Follow Us:
  • जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर
  • मावळमध्ये भाजपचा दारुण पराभव
  • 15 जागांवर राष्ट्रवादीचा दणदणीत विजय
Maval News : वडगाव मावळ : सतिश गाडे : मावळ तालुका येथे झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ने तब्बल १५ जागांवर दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे.(Maval News) गेल्या २५ वर्षांपासून मावळ पंचायत समितीवर सत्ता असलेल्या भाजपाला यावेळी एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे हा निकाल भाजपासाठी मोठा धक्का मानला जात असून माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासाठीही हा पराभव राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरला आहे. (Political News)

चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीचा कौल

इंदुरी–वराळे जिल्हा परिषद गटात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी–पिछाडी सुरू असताना अंतिम निकालात राष्ट्रवादीच्या पल्लवी दाभाडे यांनी बाजी मारली. खडकाळे–कार्ला जिल्हा परिषद गटात पुणे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बाबुराव वायकर यांच्या पत्नी आशा वायकर यांचा पराभव झाला असून राष्ट्रवादीच्या दीपाली हुलावळे विजयी झाल्या आहेत.

हे देखील वाचा : शेतकऱ्यांचे पंचप्राण आता उचलणार धनुष्यबाण; शंकरअण्णा धोंडगे यांचा परिवर्तनाचा नारा

२५ वर्षांची सत्ता उलथवली
एकूणच पुणे जिल्हा परिषद व मावळ पंचायत समितीवर गेल्या पंचवीस वर्षांपासून असलेल्या भाजपाच्या सत्तेला यावेळी जोरदार धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी निवडणुकीत प्रभावी रणनीती राबवत १५ पैकी १५ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी करून दाखवले. त्यामुळे या विजयाचे “शिल्पकार” आमदार सुनील शेळके ठरले, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

विजयामागे ठोस रणनीती

या विजयाचे श्रेय अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांना दिले जात आहे. स्थानिक प्रश्न, विकासकामांचा आढावा, तसेच बूथ पातळीवरील नियोजन यामुळे राष्ट्रवादीने प्रभावी प्रचार केला. उमेदवारांची योग्य निवड, कार्यकर्त्यांचे जाळे आणि मतदारांशी थेट संवाद या रणनीती निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात “या विजयाचे शिल्पकार आमदार सुनील शेळके” अशी चर्चा सुरू आहे.

हे देखील वाचा : : बर्फाच्या चादरमध्ये खुलले केदारनाथ धामचे सौंदर्य; गुडघाएवढ्या बर्फात भारतीय सैनिकांचा खडा पहारा

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, जल्लोष
निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, ढोल-ताशांच्या गजरात आनंद साजरा केला. अनेक ठिकाणी विजय मिरवणुका काढण्यात आल्या. विजयी उमेदवारांनी मतदारांचे आभार मानत “हा विजय जनतेचा आहे” अशी प्रतिक्रिया दिली.

पुढील राजकारणावर परिणाम

या निकालामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधानसभा निवडणुकांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेला हा प्रचंड कौल राज्याच्या राजकारणातही महत्त्वाचा मानला जात आहे.

जिल्हा परिषद

टाकवे बुद्रुक–नाणे गट

  • मधुकर कोकाटे – 7,279
  • अशोक दाते – 721
  • अनंता पावशे – 21,207 (विजयी)
  • नोटा – 631
इंदुरी–वराळे गट
  • पल्लवी दाभाडे – 14,831 (विजयी)
  • मेघा भागवत – 14,222
  • नोटा – 203
खडकाळे–कार्ला गट
  • आशाताई वायकर – 11,658
  • दीपाली हुलावळे – 17,693 (विजयी)
  • नोटा – 478
कुसगांव बुद्रुक–काले गट
  • दत्तात्रय गुंड – 11,747
  • भगवान डफळ – 1,518
  • संतोष राऊत – 17,402 (विजयी)
  • धीरज गरवड – 179
  • नोटा – 242
सोमाटणे–चांदखेड गट
  • शितल गराडे – 10,980
  • मनिषा मुऱ्हे – 23,505 (विजयी)
  • नोटा – 470
निकाल – पंचायत समिती

टाकवे बुद्रुक :

  1. प्राची गायकवाड – 11,681 (विजयी)
  2. नाणे : आशा मोरमारे – 10,057 (विजयी)
  3. वराळे : राजेंद्र कडलक – 9,656 (विजयी)
  4. इंदुरी : दिलीप ढोरे – 7,073 (विजयी)
  5. खडकाळे : समीर जाधव – 9,059 (विजयी)
  6. कार्ला : रेश्मा देवकर – 7,234 (विजयी)
  7. कुसगांव बुद्रुक : योगेश लोहर – 7,287 (विजयी)
  8. काले : शैला कालेकर – 10,264 (विजयी)
  9. सोमाटणे : साहेबराव कारके – 9,218 (विजयी)
  10. चांदखेड : सुनिता येवले – 10,569 (विजयी)

Web Title: Pune zilla parishad and panchayat samiti election results bjp defeated in maval

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • maval news
  • Maval Politics
  • political news

संबंधित बातम्या

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट
1

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
2

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
3

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
4

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.