Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde Birthday : गेमचेंजर शिंदे! रिक्षावाला ते मुख्यमंत्री थक्क करणारा राजकीय प्रवास

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्या ठाण्यापासून सुरु झालेला राजकीय प्रवास ते राज्याचे नेतृत्व म्हणून मिळवलेली लोकप्रियता याची माहिती देणारा हा लेख

  • By प्रीति माने
Updated On: Feb 09, 2026 | 11:54 AM
DCM Eknath Shinde birthday special political journey from auto to cm of maharashtra

DCM Eknath Shinde birthday special political journey from auto to cm of maharashtra

Follow Us
Follow Us:
  • DCM एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस
  • एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास
  • रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा शिंदेंचा प्रवास
Eknath Shinde Birthday : आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने संपूर्ण राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. एकनाथ शिंदे हे आज राज्यातील एक गेमचेंजर नेते बनले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या भोवती महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra Politics) फिरते आहे. त्यांची नाराजी भाजपसाठी आजही डोकेदुखी बनते. एकनाथ शिंदे यांची देहबोली आणि त्यांचे कमी शब्दांतील परखड बोलणे हे राजकारणात चर्चेचा विषय ठरते. सामान्य कुटुंबातून असणारे एकनाथ शिंदे आज राजकारणातील महत्त्वपूर्ण व्यक्ती हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

ठाण्याच्या राजकारणामध्ये दोन नावे कायम घेतली जातात ते म्हणजे आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे, लोकांचा नाथ – एकनाथ अशी उपाधी दिल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे राजकारणा समाजाभिमुख राहिले आहे. सामान्य लोकांच्या अडचणी सोडवत त्यांनी सर्वसामान्यांच्या घरात स्थान निर्माण केलं. एकनाथ शिंदे हे स्वतः सामान्य घरातून आल्यामुळे त्यांना लोकांना झळ बसत असल्याची पूर्ण जाणीव होती. एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील दारे या गावाचे आहेत. ९ फेब्रुवारी १९६४ रोजी त्यांचा जन्म झाला.

हे देखील वाचा : राज्यातील 12 जिल्हा परिषदांसह 125 पंचायत समितींचे निकाल आज; मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी ठाणे गाठले आणि कुटुंबाचे पोट भरण्यासाठी सुरुवातीला रिक्षा चालवली. यानंतर ठाण्यातील राजकारणात आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणामध्ये प्रवेश केला. आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जाऊ लागले. २००१ मध्ये ठाणे महानगरपालिकेत सभागृह नेते आणि ००४ मध्ये पहिल्यांदा विधानसभा आमदार म्हणून एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये प्रवेश केला. पुढे हाच नेता महाराष्ट्राचे नेतृत्व करेल अशी कोणी कल्पना देखील केली नसेल,

मात्र मनातील स्वप्न सत्यात उतरवण्याची ताकद असणारे एकनाथ शिंदे यांचा राजकारणाचा आलेख कायम चढता राहिला. त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री, नगरविकास मंत्री, त्यानंतर मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री अशी पदे सांभाळली आहेत. आनंद दिघेंनंतर शिवसेनेचे ठाण्यामध्ये नेतृत्व आणि पक्षवाढीमध्ये एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र त्यांच्या एका राजकीय खेळीने संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले.

हे देखील वाचा : अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणूक; निवडणूक आयोगाकडून SIR प्रक्रिया सुरू

एकनाथ शिंदे यांच्या एका राजकीय चालीमुळे राज्याच्या राजकारणाचा तख्ता पूर्णपणे बदलला. एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये शिवसेनेमध्ये अभूतपूर्व असे बंड केले आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकार कोसळले. २० जून २०२२ रोजी विधानपरिषदेच्या निकालानंतर शिंदे ‘नॉट रिचेबल’ झाले आणि शिवसेनेतील निम्म्याहून अधिक आमदारांसह सुरत आणि गुवाहाटीला पळून गेले. त्यांचीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना मोठा शह दिला. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यांचे सरकार कोसळले.
यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत ३० जून २०२२ रोजी महायुतीचे सरकार स्थापन केले. या सरकारचे नेतृत्व एकनाथ शिंदेंनी केले आणि ते राज्याचे 20 वे मुख्यमंत्री बनले. मात्र एकनाथ शिंदेंच्या या बंडखोरीमुळे राजकारणाला पूर्णपणे वेगळे वळण मिळाले. आज एकनाथ शिंदे यांचा 61 वा वाढदिवस आहे. मात्र अजित पवारांच्या निधनामुळे त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Dcm eknath shinde birthday special political journey from auto to cm of maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • political news
  • Thane news

संबंधित बातम्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
1

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त
2

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
3

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
4

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.