Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हरयाणात पराभवाला पक्षातील ‘त्या’ गोष्टी कारणीभूत; राहुल गांधींनी थेट मुळावरच घाव घातला…

9 ऑक्टोबर रोजी हरियाणाच्या निकालानंतर राहुल गांधींनी लिहिले की ते हरियाणाच्या अनपेक्षित निकालांचे विश्लेषण करत आहेत. अनेक जागांवरून येणाऱ्या तक्रारी निवडणूक आयोगाला कळवल्या जातील. अनेक जागांवर ईव्हीएममध्ये गडबड होण्याची शक्यता असल्याची तक्रार काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडेही केली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 11, 2024 | 11:51 AM
राहुल गांधी यांच्या 'मिशन महाराष्ट्र'ची नागपुरातून होणार सुरुवात; संघाला बालेकिल्ल्यातच घेरणार?

राहुल गांधी यांच्या 'मिशन महाराष्ट्र'ची नागपुरातून होणार सुरुवात; संघाला बालेकिल्ल्यातच घेरणार?

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला. तर काँग्रेसने मात्र जिंकलेली बाजी हरली. निवडणुकीपूर्वी आलेल्या पोल्सनुसार, हरयाणात काँग्रेसचा विजय होत असल्याचे सांगितले जात होते. पण ऐन मतमोजणीच्या पहिल्या दुसऱ्या फेरीनंतर मात्र काँग्रेस मागे पडली आणि अखेर हरयाणात काँग्रेसचा पराभव झाला. पण हा पराभव काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. जम्मू-कश्मीरमध्ये मोठा विजय मिळवूनही हरयाणातील पराभवामुळे काँग्रेसचा आनंद मावळून गेला.

हरयाणाच्या  निकालानंतर गुरूवारी (10 ऑक्टोबर) लोकसभेचे विरोधीपक्षनेते  राहुल गांधी यांनी हरयाणातील पराभवाची कारणे जाणून घेण्यासाठी प्रमुख नेत्यांची बैठक घेतली.  सुमारे दीड तास चाललेल्या बैठकीत राहुल गांधींनी हरयाणाच्या पराभवाचा आढावा घेत नेत्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. तर बंडखोर अपक्ष उमेदवारांना मिळालेल्या मतांमुळे हरयाणात काँग्रेसचा पराभव झाला, असे अजय माकन यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा:  SCO शिखर परिषदेपूर्वी पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये भीषण हल्ला झाला

जर सर्व सर्वेक्षण काँग्रेस जिंकत असल्याचे दाखवत होते, तर काँग्रेसचा पराभव का झाला, असा सवाल राहुल गांधींनी भर सभेत उपस्थित केला.त्याचवेळी  कुमारी सैलजा, रणदीप सुरजेवाला  किंवा भुपेंदर हुडा यांचे  नाव न घेता,आमचे नेते पक्षाच्या हितापेक्षा स्वतःचे हिताकडेच लक्ष देतात, असे म्हणत पक्षांतर्गत गटबाजीवर राहुल गांधींनी निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले, ” आपल्या पक्षातील नेते आधी स्वत:चा विचार आणि नंतर पक्षाचा विचार करतात,  यामुळेच हरयाणात काँग्रेसचा परभव झाला.

संपूर्ण निवडणूक बुडवण्यामागे स्वतःला पक्षापेक्षा मोठे समजणारे लोक आहेत. आणि पक्षाचे हित दुय्यम ठेवून काही नेत्यांच्या स्वार्थाने संपूर्ण निवडणुकीवर वर्चस्व गाजवले, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, हरयाणाच्या या पराभवाची कारणे शोधण्यासाठी एक फॅक्ट फाईडिंग कमिटी स्थापन केली जाईल.  त्यामुळे समितीने दिलेल्या अहवालानंतर राहुल गांधी काय कारवाई कऱणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा:  दसरा मेळावा गाजणार ! यंदा पहिल्यांदा धनंजय अन् पंकजा मुंडे येणार एकत्र

 

9 ऑक्टोबर रोजी हरियाणाच्या निकालानंतर राहुल गांधींनी लिहिले की ते हरियाणाच्या अनपेक्षित निकालांचे विश्लेषण करत आहेत. अनेक जागांवरून येणाऱ्या तक्रारी निवडणूक आयोगाला कळवल्या जातील. अनेक जागांवर ईव्हीएममध्ये गडबड होण्याची शक्यता असल्याची तक्रार काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडेही केली आहे. मात्र हरियाणात काँग्रेसमध्येच वेगळी हेराफेरी सुरू असल्याचा आरोप झाला आहे. गटबाजी, तळ ठोकणे, स्वतःचे ढोल बडवणे, गलथान कारभार, बंडखोरांना स्वबळावर उभे करणे, युती न करणे, प्रभारींचे फोन न उचलणे, प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याऐवजी लढाईत व्यस्त राहणे, नेत्यांना कोंडीत पकडणे. राहुल दौऱ्यातही अंधारात, ओबीसी नेत्यांना भाव देऊ नका. वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर त्यांना काँग्रेसला आपला उमेदवार आणि नेता म्हणून घोषित करायचे आहे.

Web Title: Rahul gandhi said that those things in the party were responsible for the defeat in haryana nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 11:51 AM

Topics:  

  • Congress
  • haryana assembly election 2024
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
1

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
2

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
3

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

Fadnavis On Rahul Gandhi: “राहुल गांधींच्या आजींनी…”; फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्याची हवाच काढली
4

Fadnavis On Rahul Gandhi: “राहुल गांधींच्या आजींनी…”; फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्याची हवाच काढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.