Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नरहरी झिरवळांनी तात्काळ राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

नरहरी झिरवाळ यांच्या दालनातील एका लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या घटनेमुळे मंत्रालयात खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 13, 2026 | 03:39 PM
नरहरी झिरवळांनी तात्काळ राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

नरहरी झिरवळांनी तात्काळ राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रचा कारभार हाकणाऱ्या मंत्रालयाच्या इमारतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी मोठी कारवाई केली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनातील एका लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या घटनेमुळे मंत्रालयात खळबळ उडाली असून, या प्रकरणावरुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

 

सपकाळ म्हणाले, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री, नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने लाचलुचपत विभागाने मंत्री कार्यालयच सिल केले आहे. या घटनेने भाजपा महायुती सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या लाचखोरीची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मंत्री नरहरी झिरवळांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

मंत्रालयातील लाचखोरीवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात लोकाभिमुख कारभार करण्यासाठी लोकांना सरकार आपले वाटावे यासाठी राज्य सरकारचे मुख्यालय असणाऱ्या सचिवालयाचे नाव बदलून मंत्रालय करण्यात आले. पण महाभ्रष्ट भाजपा महायुतीने मंत्रालयाचे भ्रष्टाचारालय केले आहे. झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिकाने वरिष्ठांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे, हे आणखी धक्कादायक आणि गंभीर आहे. त्यामुळे मंत्री नरहरी झिरवळ यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

“संबंध आढळल्यास राजीनामा देईन” अशी भूमिका मंत्री नरहरी झिरवळ यांनी मांडली आहे मात्र नैतिक जबाबदारीच्या दृष्टीने, आपल्या कार्यालयात खुलेआम लाचखोरी सुरु असल्याचे समोर आल्यावर निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : गावातील उमेदवारांना नाकारून राष्ट्रवादीला दिले विक्रमी मताधिक्य; कोऱ्हाळेकरांची आवडत्या नेत्याला अनोखी श्रद्धांजली

…तर मी राजीनामा देईन – झिरवळ

राज्याच्या मंत्रिमंडळाच्या इमारतीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी कारवाई केली. यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनातील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आले आहे. ही लाच स्वीकारताना संबंधित लिपीकाला रंगेहात पकडल्यामुळे मंत्रीमंडळात खळबळ उडाली. यामुळे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर देखील ताशेरे ओढले जाऊ लागले. यावरुन झिरवळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, “संबंधित कर्मचारी हा सरकारी कर्मचारी असून त्याच्या वैयक्तिक कृत्याशी माझा किंवा माझ्या सचिवांचा संबंध नाही. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. जर या लाचखोरीच्या प्रकरणात माझ्यापर्यंत किंवा माझ्या कार्यालयातील इतर कोणापर्यंत धागेदोरे पोहोचले, तर मी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देईन,” अशी स्पष्ट भूमिका नरहरी झिरवाळ यांनी घेतली आहे.

Web Title: Harshvardhan sapkal has demanded the resignation of narahari zirwal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Congress
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

भोर तालुक्यात कुटुंबे उघड्यावर; गारपीठ अन् वादळी पावसामुळे शेतीसह घरांचे अतोनात नुकसान
1

भोर तालुक्यात कुटुंबे उघड्यावर; गारपीठ अन् वादळी पावसामुळे शेतीसह घरांचे अतोनात नुकसान

Ashok Kharat Case : सिलेक्टिव्ह व्हिडिओ लिक करण्यामागे गृहविभागाचा कुटील डाव; खरात प्रकरणावरुन काँग्रेसचा आरोप
2

Ashok Kharat Case : सिलेक्टिव्ह व्हिडिओ लिक करण्यामागे गृहविभागाचा कुटील डाव; खरात प्रकरणावरुन काँग्रेसचा आरोप

Kerala Political News : केरळमध्ये भाजपची ‘अग्निपरीक्षा’! कमळ फुलणार की मागे पडणार?
3

Kerala Political News : केरळमध्ये भाजपची ‘अग्निपरीक्षा’! कमळ फुलणार की मागे पडणार?

राज्यातील 99% कुणबी दाखले बोगस, गोपीचंद पडळकरांचा आरोप; दिघंची गटातील उमेदवाराचे कागदपत्र केले सादर
4

राज्यातील 99% कुणबी दाखले बोगस, गोपीचंद पडळकरांचा आरोप; दिघंची गटातील उमेदवाराचे कागदपत्र केले सादर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.