Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“राहुल गांधींनी 20-30 वर्षे स्वप्न पाहू नये”. रामदास आठवले यांचे लालूंच्या ‘सरकार पडण्याच्या’ दाव्यावर सडेतोड उत्तर

केंद्रिय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लालूप्रसाद यादव यांच्या दाव्यावर सडेतोड उत्तर दिले आहे. उत्तरप्रदेशचे राजकारण आणि महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभेवर भाष्य केले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Jul 06, 2024 | 10:27 PM
सौजन्य - X

सौजन्य - X

Follow Us
Close
Follow Us:

राजकारण:  रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. “20 ते 30 वर्षात पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहू नका,” असा टोला रामदास आठवले यांनी राहुल गांधींना लगावला. आठवले म्हणाले की, आमचे सरकार खूप मजबूत आहे. एनडीएचे 292 खासदार असून 17 अपक्षांपैकी अनेक खासदार आमच्या संपर्कात आहेत. अशा परिस्थितीत सरकार खूप मजबूत आहे आणि ते पाच वर्षे टिकेल.

काल राष्ट्रीय जनता दलाच्या 28 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात लालूप्रसाद यांनी मोदी सरकार ऑगस्टपनंतर कोसळेल असा खळबळजनक दावा केला होता. त्या दाव्यावर अनेक राजकीय नेते विश्लेषक मत व्यक्त करताना दिसत आहेत.

उत्तरप्रदेशमध्ये एनडीएला कमी जागा, आमच्या पक्षाचा समावेश करा फायदा होईल

आठवले म्हणाले की, उत्तप्रदेशमध्ये एनडीए आघाडीला 71 जागा मिळतील, अशी अपेक्षा होती, मात्र त्यांना फार कमी जागा मिळाल्या. तेथे एडीएला 400 हून अधिक जागा मिळाल्यानंतर राज्यघटना बदलण्याबाबत लोकांमध्ये भ्रम पसरवण्यात येथे सपा आणि काँग्रेसला यश आले.इतर छोट्या पक्षांप्रमाणे आमच्या पक्षाचा उत्तरप्रदेशच्या एनडीएमध्ये समावेश झाल्यास त्याचा मोठा फायदा होईल.

महाराष्ट्र विधानसभेत हव्यात आठ ते दहा जागा

महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत पण आता तेथील विरोधी पक्षांना संविधान बदलण्याची भीती पसरवता येणार नाही. आता विकासाचे राजकारण सुरूच राहणार आहे. महाराष्ट्रात आम्ही भाजपकडे आठ ते दहा जागांवर निवडणूक लढवण्याची मागणी करणार आहोत. असे म्हणत महाराष्ट्राच्या राजकारणावर आठवलेंनी भाष्य केले.

महाराष्ट्र विधानसभेमध्ये सध्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा एकही आमदार नाही आहे त्यामुळे भविष्यात त्यांच्या पक्षाचा आमदार असावा ही आठवलेंची अपेक्षा आहे. महायुतीमध्ये अगोदरच भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी जागांसदर्भात वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत. त्यामुळे महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम आहे.  त्यात आता रामदास आठवले यांच्या आठ ते दहा जागांच्या मागणीने महायुतीच्या जागावाटपाचा तिढा वाढणार आहे.

Web Title: Rahul gandhi should not dream for 20 30 years ramdas athawales scathing reply to lalus government fall claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2024 | 10:27 PM

Topics:  

  • Lalu Prasad yadav
  • maharashtra
  • Rahul Gandhi
  • Ramdas Athawale

संबंधित बातम्या

‘वोटवा चोर लागेला..’;ऐन निवडणुकीत भोजपुरी गाण्याचा तडका, काँग्रेसकडून मतचोरीचे गाणे व्हायरल
1

‘वोटवा चोर लागेला..’;ऐन निवडणुकीत भोजपुरी गाण्याचा तडका, काँग्रेसकडून मतचोरीचे गाणे व्हायरल

Impeachment: इंडिया अलायन्सकडून मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवणार? ‘मतचोरी’चं राजकारण तापणार
2

Impeachment: इंडिया अलायन्सकडून मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवणार? ‘मतचोरी’चं राजकारण तापणार

Maharashtra Rain Update : नागरिकांनो सतर्क राहा! ढगफुटी अन् मुसळधार पावसाचा कहर, ‘या’ जिल्ह्यांना धोक्याचा इशारा
3

Maharashtra Rain Update : नागरिकांनो सतर्क राहा! ढगफुटी अन् मुसळधार पावसाचा कहर, ‘या’ जिल्ह्यांना धोक्याचा इशारा

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
4

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.