Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

मत चोरी हा संविधानावर हल्ला आहे. हा हिंदुस्थानच्या आत्म्यावर हल्ला आहे. मतांची चोरी हा भारतमातेवर हल्ला आहे. या लढाईत काँग्रेस आणि विरोधी पक्ष मागे हटणार नाहीत. आम्ही नरेंद्र मोदी किंवा निवडणूक आयोगाला संविधान आणि भारतमा

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 19, 2025 | 01:39 PM
Rahul Gandhi

Rahul Gandhi

Follow Us
Close
Follow Us:

Rahul Gandhi News:  निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत आहे, तीनही निवडणूक आयुक्तांनी एक गोष्ट समजून घ्यावी, तुम्ही तुमचं काम केलं नाही तर, जेव्हा बिहार आणि दिल्लीत इंडिया आघाडीचं सरकार येईल तेव्हा तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल, आम्ही तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. इतकेच नव्हे तर, ज्यावेळी केंद्रात आमचे सरकार येईल, तेव्हा तुम्ही कुठेही असलात, तुम्ही निवृत्त झाले असलात तरीही आम्ही तुमच्यावर कारवाई करणार, हे लक्षात ठेवा. असंही राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला खडसावलं आहे.

गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत, केंद्रीय निवडणूक आयोग आणि भाजपवर मतचोरीचे गंभीर आरोप केले. इतकेच नव्हे तर त्यांनी आयोगाकडून कशा पद्धतीने मतचोरी होत आहे, याचे पुरावेही सादर केले. त्यानंतर निवडणूक आयोग विरूद्ध राहुल गांधी असा संघर्षच निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांच्या आरोपानंतर संपूर्ण देशातील राजकारण ढवळून निघालं आहे. निवडणूक आयोगावर आरोप केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी आयोगानेही पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांनी शपथपत्र सादर करावे अन्यथा देशाची माफी मागावी, त्यांनी माफी नाही मागितली तर सात दिवसांनंतर त्यांचे आरोप बिनबुडाचे मानले जातील, असंही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं.

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर

पण ज्ञानेश कुमार यांच्या या इशाऱ्यानंतर राहुल गांधी अधिकच आक्रमक झाल्याचं दिसत आहे. राहुल गांधी यांनी बिहारमध्ये सुरू असलेल्या इंडिया आघाडीच्या मतदान हक्क यात्रेत पुन्हा एकदा आयोगाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. निवडणूक आयोगाच्या सर्व आयुक्तांनी एक गोष्ट नीट लक्षात ठेवावी. जर तुम्ही तुमचं काम नीटपणे केलं नाही तर तुमच्यावर कडक कारवाई केली जाईल. आता नरेंद्र मोदी यांच सरकार आहे ते ठीक आहे, पण कधी ना कधी एक दिवस बिहार आणि दिल्लीत इंडिया आघाडीचं सरकार येईल, तेव्हा आम्ही तुम्हाला बघून घेऊ, तुम्ही कुठेही असलात तरी तुम्हाला शोधुन काढू, तुमच्यावर कारवाई करू, असा इशारा राहुल गांधींनी निवडणूक आयुक्तांना दिला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, “मत चोरी हा संविधानावर हल्ला आहे. हा हिंदुस्थानच्या आत्म्यावर हल्ला आहे. मतांची चोरी हा भारतमातेवर हल्ला आहे. या लढाईत काँग्रेस आणि विरोधी पक्ष मागे हटणार नाहीत. आम्ही नरेंद्र मोदी किंवा निवडणूक आयोगाला संविधान आणि भारतमातेवर हल्ला करू देणार नाहीत. ‘जननायक’ ही पदवी बिहारच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण करत आहे.

हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…

दुसरीकडे, बिहारच्या राजकारणात ‘मत चोरी’ वरून सुरू असलेली लढाई आता तीव्र झाली आहे. मतदार हक्क यात्रेदरम्यान माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, भाजप आणि निवडणूक आयोग मिळून गरीब, दलित, मागास आणि अल्पसंख्याकांची मते चोरण्याचा कट रचत आहेत. हे संविधान आणि लोकशाही अधिकारांशी थेट छेडछाड आहे. हे केवळ राजकारण नाही तर गरीब आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठीचा लढा आहे. पण इंडिया आघाडी कोणत्याही परिस्थितीत ही मतचोरी होऊ देणार नाही, लोकांच्या सैंविधानिक हक्कांचे रक्षण करण्यासाठी इंडिया आघाडी कायम जनतेच्या सोबत उभी असेल.

दुसरीकडे, समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनीदेखील निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर जोरदार टिका केली. माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण जर विरोधी पक्षनेत्याला वाटत असेल की मते चोरीला जात आहेत, तर निवडणूक आयोगाने असे होत नसल्याचे पुरावे द्यावेत. अखिलेश यादव यांनी अशा १८ हजार मतदारांची प्रतिज्ञापत्रे देखील दिली आहेत ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत किंवा निवडणूक आयोगाच्या त्रुटींमुळे हे लोक मतदान करू शकले नाहीत, अशा परिस्थितीत, प्रतिज्ञापत्र असूनही प्रेसमध्ये खोटे बोलण्यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.

Web Title: Rahul gandhi warns the election commission again after its press conference

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 01:38 PM

Topics:  

  • Bihar Election
  • Election Commission
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?
1

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Sharad Pawar : “काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान
2

Sharad Pawar : “काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान

आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; ‘या’ बड्या नेत्यांचा समावेश
3

आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; ‘या’ बड्या नेत्यांचा समावेश

बिहारच्या निकालामुळे खचून जाऊ नका, नकारात्मकता सोडा अन्…; काँग्रेसच्या बड्या नेत्याचे आवाहन
4

बिहारच्या निकालामुळे खचून जाऊ नका, नकारात्मकता सोडा अन्…; काँग्रेसच्या बड्या नेत्याचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.