इंडिया अलायन्स उपराष्ट्रपती निवडणूक सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर झाली (फोटो - सोशल मीडिया)
B. Sudarshan Reddy : नवी दिल्ली : देशामध्ये लवकरच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. जगदीप धनखड यांनी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी अचानकपणे राजीनामा दिला. यानंतर उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. एनडीएकडून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने यावेळी देखील धक्कातंत्र वापरत चर्चेत असणाऱ्या नावांपेक्षा दुसरेच नाव जाहीर केले. यानंतर आता इंडिया आघाडी देखील निवडणूकीच्या रिंगणात उतरली आहे, इंडिया आघाडीकडून न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी हे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असणार आहे.
दिल्लीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. . एकीकडे मतचोरीच्या आरोपांनी रान पेटले असून दुसरीकडे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या संदर्भात देशातील विरोधकांची आघाडी असलेल्या इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीमध्ये काल(दि.18) पार पडली. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडत आहे. उपराष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षाचे उमेदवार न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी हे असणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावावर विरोधी पक्षांनी एकमताने सहमती दर्शविली आहे.
बातमी अपडेट होत आहे.