Rahul Gandhi will never become Prime Minister, says BJP leader Brijbhushan Sharan Singh
गोंडा : भारत-पाकिस्तान युद्धबंदीवरून राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या विधानावरून भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी कधीही पंतप्रधान होऊ शकत नाहीत. ते फक्त एक कठपुतली आहेत, असा घणाघात ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केला आहे.
काँग्रेस सरकारचे मंत्री अनेक वर्षांपासून राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्याचे स्वप्न पाहत आहेत पण ते पूर्ण होताना दिसत नाही. काँग्रेस आणि त्यांचे समर्थक पक्ष अनेकदा राहुल गांधी पंतप्रधान होतील याबद्दल बोलतात. तर भाजप नेते त्याचा विरोध करत राहतात. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी राहुल यांच्याबाबत दिलेल्या विधानावरून आता राजकारण तापू लागले आहे. यावर भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी खोचक टिप्पणी केली आहे.
राहुलची विचारसरणी टुकडे-तुकडे गँगशी मिळतीजुळती
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या विधानावर, भारतीय कुस्ती महासंघाचे (DWFI) माजी प्रमुख आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “राहुल गांधी कधीही या देशाचे पंतप्रधान होऊ शकत नाहीत. कारण त्यांची दृष्टी अद्याप स्पष्ट नाही. ते एक कठपुतळी आहे. त्यांची विचारसरणी तुकडे-तुकडे गँगशी मिळतीजुळती आहे. ते एका विशिष्ट वर्गाबाबत राजकारण करत राहतात. ते फक्त एका विशिष्ट वर्गाला खूश करण्यासाठी विधाने करत राहतात, अशा कडक शब्दांत भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ते देशाला विकतील
पुढे ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, “राहुल गांधी अनेक वर्षांपासून भारताचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहत आहेत, पण जनतेने त्यांना समजून घेतले आहे आणि म्हणूनच आज त्यांची ही अवस्था आहे. तs पाकिस्तानला खूश करण्यासाठी भाजपाविरुद्ध विधाने करत राहतात. राहुल गांधी हे जर कधी पंतप्रधान झाले तरी ते हा देश नक्कीच विकतील, असा आरोप ब्रिजभूषण सिंह यांनी राहुल गांधींबाबत केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
रेवंत रेड्डी यांनी ‘हे’ विधान दिले
भारत-पाकिस्तान युद्धबंदीवरील चर्चेदरम्यान मोदी सरकारवर हल्लाबोल करताना तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते की जर राहुल गांधी आज पंतप्रधान असते तर आतापर्यंत पीओके भारताचा भाग झाला असता. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून जोरदार हल्लाबोल केला आहे.