Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi : राहुल गांधींकडे खरंच ब्रिटिश नागरिकत्व आहे का? दुहेरी नागरिकत्वावर न्यायालयीन सुनावणी सुरू

Rahul Gandhi dual citizenship Case: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत वाद पुन्हा उफाळला असून, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने या प्रकरणावर महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 26, 2025 | 03:14 PM
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने किती विमानं गमावली? राहुल गांधींचा एस. जयशंकर यांना थेट सवाल

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने किती विमानं गमावली? राहुल गांधींचा एस. जयशंकर यांना थेट सवाल

Follow Us
Close
Follow Us:

Rahul Gandhi dual citizenship Case: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत वाद पुन्हा उफाळला असून, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने या प्रकरणावर महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) नेहमीच राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित करत आला आहे, आणि आता हा मुद्दा थेट न्यायालयात पोहोचला आहे. जर राहुल गांधींवर करण्यात आलेले आरोप सिद्ध झाले, तर त्यांना भारतीय नागरिकत्व गमवावे लागू शकते.

न्यायालयाचा केंद्र सरकारला आदेश

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने केंद्र सरकारला आदेश दिला आहे की, त्यांनी या प्रकरणावर चार आठवड्यांत निर्णय घ्यावा. यावर केंद्र सरकारने आठ आठवड्यांची मुदत मागितली होती, मात्र न्यायालयाने त्यांना मर्यादित कालावधी दिला आहे. परिणामी, या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेच्या धमक्यांना इराणचे कडवे उत्तर! भूमिगत मिसाईल शहराचा धक्कादायक VIDEO झाला व्हायरल

प्रकरण न्यायालयात कसे पोहोचले?

कर्नाटकातील भाजप कार्यकर्ता एस. विघ्नेश शिशिर यांनी या प्रकरणी जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार, राहुल गांधींनी ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिशिर यांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे याबाबत नवीन पुरावे आहेत, ज्यात यूके सरकारकडून प्राप्त दस्तऐवज आणि ईमेल्सचा समावेश आहे. या आधीही, सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अशाच प्रकारची याचिका दाखल केली होती.

सुब्रमण्यम स्वामी यांचे दावे

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २००३ मध्ये युनायटेड किंगडममध्ये ‘बॅकअप्स लिमिटेड’ नावाची कंपनी नोंदणीकृत केली होती, जिचे संचालक आणि सचिव राहुल गांधी होते, असा दावा केला होता. कंपनीच्या २००५ आणि २००६ च्या वार्षिक अहवालांमध्ये राहुल गांधी यांचे राष्ट्रीयत्व ‘ब्रिटिश’ असल्याचे नमूद करण्यात आले होते. याच कारणामुळे त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

दुहेरी नागरिकत्व म्हणजे काय?

दुहेरी नागरिकत्व म्हणजे एकाच वेळी दोन किंवा अधिक देशांचे नागरिकत्व असणे. यामुळे संबंधित व्यक्तीला दोन्ही देशांचे पासपोर्ट ठेवण्याची आणि त्या देशांमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याची मुभा मिळते.

भारतीय कायद्यातील तरतुदी

भारतीय संविधानाच्या कलम ९ नुसार, भारतात दुहेरी नागरिकत्वाला मान्यता नाही. जर कोणत्याही व्यक्तीने परदेशी नागरिकत्व स्वीकारले, तर त्याचे भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होते. तसेच, भारतीय पासपोर्ट कायदा, १९६७ नुसार, परदेशी नागरिकत्व घेतल्यानंतर भारतीय पासपोर्ट वापरणे हा गुन्हा मानला जातो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : आता संपूर्ण जगाचे इंटरनेट कनेक्शन जाणार ड्रॅगनच्या ताब्यात; चिनी शास्त्रज्ञांनी तयार केले ‘डीप सी’ केबल कटर

न्यायालयाच्या निकालावर सर्वांचे लक्ष

जर राहुल गांधींवरील आरोप सिद्ध झाले, तर त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील सुनावणीवर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Rahul gandhis dual citizenship case reaches court he may lose indian citizenship if proven true nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 03:14 PM

Topics:  

  • Allahabad High Court
  • britain
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला
1

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच
2

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
3

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

सीसीटीव्ही देणे हे गोपनीयतेचे उल्लंघन कसे? आयोगाच्या पत्रकार परिषदेवर विरोधक आक्रमक
4

सीसीटीव्ही देणे हे गोपनीयतेचे उल्लंघन कसे? आयोगाच्या पत्रकार परिषदेवर विरोधक आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.