राजस्थानमधून एक मोठी दुर्घटना घडल्याचं समोर येत आहे. राजस्थानातील दौसा जिल्ह्यात एक मोठ अपघात झाला आहे. महुआ पोलीस स्टेशन परिसरात गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता एक ओला टॅक्सी चालक जयपूरहून त्याच्या गावासाठी जाण्यासाठी निघाला होता. महुआ येथे पोहोचताच अचानक रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांना धडक (Rajasthan Accident News) दिली, त्यामुळे 11 जण जखमी झाले. या अपघाता डत रुग्णालयातच उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला.
[read_also content=”सलमान खान गोळीबार प्रकरणी वेगानं तपास, आधी बंदूक जप्त; आता शूटर्सला बंदूक पुरवणाऱ्यांना पंजाबमधून अटक! https://www.navarashtra.com/movies/mumbai-crime-brand-arrested-two-man-who-provide-guns-to-shooter-in-salman-khan-house-firing-case-527299.html”]
महुआ पोलिस स्टेशनचे अधिकारी जितेंद्र सिंह सोलंकी यांनी सांगितले की, टॅक्सी चालक दौलतरामचा मुलगा रामजीत हा वेगात गाडी चालवत असताना रात्री उशिरा टिकाराम पालीवाल शाळेजवळ हा अपघात झाला. त्यामुळे अचानक गाडीचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला झोपडपट्टीसमोर झोपलेल्या लोकांवर आदळल्याने 11 जण जखमी झाले. त्या वेळी ओला टॅक्सी चालक दारूच्या नशेत होता, त्यामुळे वळण घेत असताना भरधाव वेगात गाडी चालवताना त्याला वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही, असे सांगण्यात येत आहे.
अपघातात जखमी झालेल्यांना महुआ रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिघांना उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर जखमींना अलवर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी चालकाविरुद्ध कारवाई केली जाणार असून घटेननंतर तो पळून जाण्यात यशस्वी झाल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहे.






