नवी दिल्ली : येत्या काही दिवसांत राज्यसभा निवडणूक होत आहे. त्या दृष्टीने सर्वच पक्षांकडून उमेदवार दिले गेले आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. याशिवाय, एक अपक्ष वगळता इतर कोणतेही अतिरिक्त अर्ज आलेले नाहीत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांनी तर काँग्रेस पक्षाने माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी अर्ज भरला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे.
याशिवाय, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रफुल्ल पटेल यांनी तर एका अपक्षाने अर्ज भरला आहे. या अर्जाच्या होणाऱ्या छाननीत अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर चव्हाण यांना भाजपने पहिल्या क्रमांकाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. भाजपने कोथरूडच्या माजी आमदार राज्यसभेवर जाण्याची संधी दिली आहे.
मेधा कुलकर्णी यांचे पुनवर्सन
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापले होते. त्यामुळे त्यांचे राज्यसभा उमेदवारी देऊन पुर्नवसन केले आहे.