Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rakesh Kishor News: सरन्यायाधिशांवर हल्ला करणाऱ्या राकेश किशोरांचे जुने कारनामे समोर; सोसायटीतील रहिवाशांनीच केला पर्दाफाश 

सहा वर्षांपूर्वी राकेश किशोर सोसायटीचे अध्यक्ष झाले होते आणि अलीकडेच कोणत्याही निवडणुका झालेल्या नाहीत. सोसायटीच्या सदस्यांनी अनेकदा राकेश किशोर यांच्याविरूद्ध अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 08, 2025 | 12:57 PM
Rakesh Kishor News:

Rakesh Kishor News:

Follow Us
Close
Follow Us:
  • राकेश किशोरांचे जुने कारनामे समोर
  • राकेश किशोरांकडून सोसायटीतील रहिवाशांना धमक्या
  • सोसायटीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर जातीयवादी आणि धार्मिक शिवीगाळ

Rakesh Kishor News: सर्वोच्च न्यायालयात एका ज्येष्ठ वकीलाने भारताचे सरन्यायाधीश CJI हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण सुरक्षा रक्षकांनी त्याला ताबडतोब न्यायालयातून बाहेर काढले. या घटनेमुळे संपूर्ण देशात एकच खळबळ माजली होती. त्यानंतर, बार कौन्सिलने घटनेतील आरोपी वकील राकेश किशोर यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. सीजेआयने कोर्टरूममध्ये उपस्थित असलेल्या न्यायालयीन अधिकाऱ्यांना आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना घटनेकडे दुर्लक्ष करण्यास आणि आक्षेपार्ह वकील राकेश किशोर यांना इशारा देऊन सोडून देण्यास सांगितले. राकेश किशोर यांनी या प्रकाराबाबत कोणताही पश्चाताप नसल्याची प्रक्रिया दिली आहे. पण त्याचवेळी राकेश किशोर यांच्याविषयी अनेक गोष्टीही समोर आल्या आहेत.

ब्रिटिनच्या PM चा मिश्किल अंदाज; विमानत बसताच भारतीयांसोबत केला हास्यविनोद, म्हणाले, “मी तुमचा पंतप्रधान

राकेश किशोर यांचा जन्म १० सप्टेंबर १९५४ रोजी झाला. वयाच्या ५५ ​​व्या वर्षी त्यांनी २००९ मध्ये बार कौन्सिल ऑफ दिल्ली (बीसीडी) मध्ये नोंदणी केली. सध्या ते मयूर विहार फेज १ मध्ये राहतात. सोमवारच्या घटनेनंतर लगेचच बार कौन्सिल ऑफ इंडिया (बीसीआय) ने किशोर यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. बीसीआयने त्यांना भारतातील कोणत्याही न्यायालय, न्यायाधिकरण किंवा प्राधिकरणासमोर हजर राहण्यास, बाजू मांडण्यास किंवा वकिली करण्यास मनाई केली आहे. राकेश यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये त्यांच्याविरुद्ध कार्यवाही का सुरू ठेवू नये, हे स्पष्ट करण्यास सांगितले गेले आहे. बीसीआयने याबाबत असेही स्पष्ट केले आहे की, राकेश यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू केली जाईल.

राकेश किशोर यांच्या सोसायटीतील रहिवाशांच्या तक्रारी ?

राकेश किशोर राहत असलेल्या सोसायटीतील रहिवाशांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला सांगितले की, सहा वर्षांपूर्वी राकेश किशोर सोसायटीचे अध्यक्ष झाले होते आणि अलीकडेच कोणत्याही निवडणुका झालेल्या नाहीत. सोसायटीच्या सदस्यांनी अनेकदा राकेश किशोर यांच्याविरूद्ध अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यापैकी एक नोव्हेंबर २०२१ रोजी एका ज्येष्ठ नागरिकावर झालेल्या कथित हल्ल्याशी संबंधित होती. पण राकेश किशोर यांच्याबाबत कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.

स्थानिकांनी किशोर याच्यावर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनुसार, राकेश किशार यांच्यामार्फत त्यांच्या परिसरातील नागरिकांना जवळपास एक वर्षभर धमक्या दिल्या जात होत्या, त्यांना घाबरवले जात होते. तसेच, किशोर यांनी सोसायटीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर जातीयवादी आणि धार्मिक शिवीगाळ केली होती. रहिवाश्यांनी सांगितले की किशोर हे यापूर्वी सोसायटीच्या रेसिडन्ट वेल्फेअर असोसिएशनचा सदस्य होते. त्याच्या कृत्यांविषयी पूर्वीही माहिती होती. मात्र, सुप्रीम कोर्टात घडलेल्या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे.

वैभव सूर्यवंशीसह ऑस्ट्रेलियात Cheating, बॉल बॅटला न लागताच अंपायरने दिले Out; माजली खळबळ

सोसायटीच्या सुरक्षारक्षकांच्या माहितीनुसार, राकेश किशोर यांच्या कुटुंबियांनी बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीस भेटण्यास नकार दिला आहे. किशोर यांची तब्येत ठीक नाही आणि ते मानसिकदृष्ट्या अस्थिर वाटत असल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, कोर्टातील तक्रारींच्या पार्श्वभूमीवर बार काऊन्सिल ऑफ इंडियाने राकेश किशोर यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. या निर्णयानंतर राकेश किशोर यांना आता वकिली करण्याचा अधिकार राहणार नाही.

वकिलाने पोलिसांना काय सांगितले?

दिल्ली पोलिसांनी ७१ वर्षीय वकील राकेश किशोर यांची सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात सुमारे तीन तास चौकशी केली. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान कोणतीही औपचारिक तक्रार दाखल न झाल्यामुळे दुपारी २ वाजता त्यांना सोडण्यात आले. तसेच, पोलिसांनी त्यांचे बूटही परत केले.

पोलिसांना वकिलाकडून मिळालेल्या चिठ्ठीत असा संदेश होता: “हिंदुस्थान सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही.” चौकशीदरम्यान राकेश किशोर यांच्याकडे सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन आणि शाहदरा बार असोसिएशनची ओळखपत्रे असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

चौकशीदरम्यान पोलिसांनी किशोर यांना त्यांच्या कृतीमागील हेतू विचारला. वकिलाच्या मते, मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिर संकुलातील भगवान विष्णूच्या मूर्तींच्या पुनर्संचयितीविषयीच्या याचिकेवर झालेल्या अलिकडील सुनावणीदरम्यान वरिष्ठ न्यायाधीशांच्या टिप्पण्या त्यांना नाराज करणाऱ्या ठरल्या.

 

Web Title: Rakesh kishor news rakesh kishors old deeds who attacked the chief justice exposed the residents of the society exposed it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 12:57 PM

Topics:  

  • Supreme Court

संबंधित बातम्या

Cough Syrup मुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी, सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
1

Cough Syrup मुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी, सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

‘मला वाईट वाटत नाही, देवाने हे सर्व…’; सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचे धक्कादायक विधान
2

‘मला वाईट वाटत नाही, देवाने हे सर्व…’; सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचे धक्कादायक विधान

CJI Bhushan Gavai : सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न, पोलिसांनी वकिलांना घेतले ताब्यात
3

CJI Bhushan Gavai : सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न, पोलिसांनी वकिलांना घेतले ताब्यात

Sonam Wangchuk : सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सु्प्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस , पत्नी गीतांजलीने केल्या दोन मागण्या
4

Sonam Wangchuk : सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सु्प्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस , पत्नी गीतांजलीने केल्या दोन मागण्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.