ब्रिटिनच्या PM चा मिश्किल अंदाज; विमानत बसताच भारतीयांसोबत केला हास्यविनोद, म्हणाले, "मी तुमचा पंतप्रधान (फोटो सौजन्य: एक्स/@ANI)
Keir Starmer Mumbai Visit : ब्रिटिनचे पंतप्रधान केयर स्टारमर (Keir Starmer) भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. बुधावरी (०८ ऑक्टोबर) ते मुंबईत पोहोचले आहे. त्यांच्या दौऱ्याचा उद्देश भारत आणि ब्रिटनमधील आर्थिक, व्यापारिक आणि रणनीतिक संबंधाना अधिक दृढ करणे आहे. स्टारमर यांच्यासोबत ब्रिटनचे व्यापारी प्रतिनिधीमंडळही भारतात आले आहेत. या दौऱ्यात ते भारतीय उद्योगपती, सरकारी अधिकारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहेत. यामुळे भारत आणि ब्रिटनमधील मुक्त व्यापारा करारासाठी नवीन कवाडे खुली होतील.
त्यांच्या भारता दौऱ्याच्या प्रवासादरम्यान ब्रिटनकडून मुंबईला येणाऱ्या फ्लाइटमध्ये एक मजेशीर प्रसंग घडला आहे. ज्याचा व्हिडिओ स्टारमर यांनी सोशवल मीडियावर शेअर केला. त्यांनी ब्रिटिश एअरऐवजच्या मुंबईकडे येणाऱ्या फ्लाइट ९१०० मध्ये प्रवाशांसोबत एक विनोद केला. त्यांनी विमानाच्या कॉकपिटमध्ये जाऊन, कॉकपिटमधून तुमचे पंतप्रधान बोलत आहेत, असे म्हटले.
हे ऐकून सुरुवातील प्रवासी आश्चर्यचकित झाले, त्यांना कोणीतरी मजाक करत असल्याचे वाटले. पण नंतर हे खरे असल्याचे कळताचा सर्वांना आनंद झाला. हा प्रसंग शेअर करताना त्यांनी लिहिले की, हा क्षण त्यांच्या दौऱ्याचा
कॅनडाचे पंतप्रधान चाटतायेत डोनाल्ड ट्रम्पचे तळवे? केला भारत-पाक युद्धबंदीचा खोटा दावा
स्टारमर यांच्यासोबत ब्रिटनचे सर्वात मोठे व्यापारी प्रतिनिधीमंडळ आले आहे. यामध्ये १२५ हून अधिक व्यावसायिक, गुंतवणूकदार आणि अधिकारी आहेत. याचा उद्देश भारत आणि ब्रिटनमधील उद्योगांना नवीन बाजारपेठा खुली करुन देणे आहे. या दौऱ्यात आयटी, हरीत उर्जा, औषधनिर्मिती आणि शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूकवर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे.
शिवाय ही भेट अशा वेळी होत आहे जेव्हा भारत आणि ब्रिटनमध्ये जुलै २०२५ मध्ये मुक्त व्यापार करार झाला आहे. या कराराच्या दृष्टीकोनातून ब्रिटनच्या पंतप्रधानांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे करारामुले दोन्ही देशातील ९० टक्क्याहून अधिक वस्तूंवरील आयात शुल्क कमी होणार आहे. यामुळे द्विपक्षीय व्यापाराला वेग मिळेल.
व्हिजन २०३५
केयर स्टारमर पंतप्रधान मोदींचीही भेट घेणार आहे. यावेळी व्हिजन २०३५ या आराखड्यानुसार भारत आणि ब्रिटनमधील रणनीतिक भागीदारीचा आढावा घेतला जाणार आहे. याअंतर्गत दोन्ही देशात स्टार्टअप्स, हरित उर्जा आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याच्या करारांवर स्वाक्षरी होँण्याची शक्यता आहे.
प्रश्न १. ब्रिटनचे पंतप्रधान भारताच्या दौऱ्यावर का आले आहेत?
ब्रिटनचे पंतप्रधान भारत आणि ब्रिटनमधील आर्थिक, व्यापारिक आणि रणनीतिक संबंधाना अधिक चालना देण्यासाठी आले आहेत. तसेच भारत आणि ब्रिटनमधील व्हिजन २०३५ वरही चर्चा होणार आहे.
प्रश्न २. ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत किती अधिकाऱ्यांचे प्रतिनिधीमंडळ आले आहे?
स्टारमर यांच्यासोबत ब्रिटनचे सर्वात मोठे व्यापारी प्रतिनिधीमंडळ आले आहे. यामध्ये १२५ हून अधिक व्यावसायिक, गुंतवणूकदार आणि अधिकारी आहेत.