वैभव सूर्यवंशीने व्यक्त केली नाराजी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
आयपीएलनंतर युवा भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशी आता जगभरात चर्चेत आला आहे. मर्यादित षटकांच्या कारकिर्दीनंतर वैभव कसोटी क्रिकेटमध्येही अपवादात्मक कामगिरी करत आहे. भारताचा १९ वर्षांखालील संघ सध्या दुसऱ्या युवा कसोटीत ऑस्ट्रेलिया अंडर-१९ विरुद्ध खेळत आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीला पंचांनी चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याने वाद निर्माण झाला आहे. वैभव सूर्यवंशी आपल्या बॅटने कमालीची कामगिरी करत आहे आणि अशातच आता पंचांमुळे नवा वाद निर्माण झालाय आणि एरव्ही शांत असणारा वैभवदेखील यावेळी रागावलेला पहायला मिळाला. नक्की काय घडलं जाणून घ्या.
वैभव सूर्यवंशीचा पाकिस्तानच्या बाबर आझमला धोबीपछाड! युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये रचला ‘हा’ इतिहास
अंपायरने वैभव सूर्यवंशीला चुकीच्या पद्धतीने बाद दिले
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या युवा कसोटीत भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला वादग्रस्त पद्धतीने बाद दिल्याने तो आश्चर्यचकित झाला. १४ वर्षांच्या या खेळाडूने पंचांना स्पष्टपणे दाखवले की त्याच्या बॅट आणि चेंडूमध्ये मोठे अंतर आहे. वैभवला चार्ल्स लॅचमंडने २० धावांवर बाद केले.
ही घटना भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघांमधील दुसऱ्या युवा कसोटी सामन्यादरम्यान घडली. पहिल्या सामन्यात भारताच्या डावात आणि ५८ धावांच्या विजयात ८६ चेंडूत ११३ धावा करून महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वैभव सूर्यवंशीने १४ चेंडूत २० धावा केल्या, ज्यात दोन चौकार आणि एक षटकार होता. तथापि, चार्ल्स लेचमंडच्या चेंडूवर त्याला बाद देण्यात आले. वैभवने पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतला आणि चेंडू आणि बॅटमधील अंतर स्पष्टपणे दाखवले. यावेळी वैभवने आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली.
ऑस्ट्रेलियात वैभवची कमालीची खेळी
वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलियन भूमीवर धुमाकूळ घातला आहे. युवा एकदिवसीय सामन्यात धमाकेदार खेळी केल्यानंतर, त्याने युवा कसोटीतही शतक झळकावले. हा तोच खेळाडू आहे ज्याने वयाच्या १२ व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि १३ व्या वर्षी आयपीएलमध्ये खळबळ उडवून दिली. त्यानंतर, त्याने पुरुषांच्या टी-२० क्रिकेटमध्ये फक्त ३५ चेंडूत सर्वात कमी वयाचे शतक ठोकून इतिहास रचला. त्याच वर्षी त्याने इंग्लंडविरुद्ध युवा एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम केला. मात्र या मॅचदरम्यान पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे वैभवला जास्त धावा करता आल्या नाहीत. दरम्यान हा १४ वर्षीय खेळाडू सध्या सगळ्याच आघाडीवर पुढे असल्याचे दिसून येत आहे.
14 वर्षाच्या मुलाने गाजवले क्रिकेटचे मैदान; सर्वत्र वैभव सुर्यवंशीची चर्चा अन् गुणगान
पहा व्हिडिओ
Unlucky Vaibhav suryavnshi, not happy with umpire decision #vaibhavsuryavanshi pic.twitter.com/ahHNEnNSnR — ANOOP DEV (@AnoopCricket) October 7, 2025