Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJI Bhushan Gavai Attack: CJI भूषण गवईंवर हल्ला करणाऱ्या राकेश किशोरांच्या अडचणी वाढणार; फौजदारी कारवाई करण्याची संमती

६ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजादरम्यान सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याची प्रकार घडला. राकेश किशोर नावाच्या वकिलाने सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 17, 2025 | 12:21 PM
CJI Bhushan Gavai Attack: CJI भूषण गवईंवर हल्ला करणाऱ्या राकेश किशोरांच्या अडचणी वाढणार; फौजदारी कारवाई करण्याची संमती
Follow Us
Close
Follow Us:
  • ६ ऑक्टोबरला CJI भूषण गवईंवर हल्ला
  • ज्येष्ठ वकील राकेश किशोरांकडून गवईंच्या दिशेने बुटाने हल्ला
  • राकेश किशोर यांच्याविरुद्ध फौजदारी अवमानना कारवाईस संमती
CJI Bhushan Gavai Attack news Update: गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर एका ज्येष्ठ वकिलाने बूट फेकत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. राकेश किशोर असे हल्ला करण्याऱ्या वकिलाचे नाव आहे. या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. वकील राकेश किशोर यांच्याविरूद्ध फौजदारी अवमानना कारवाई करण्यात येणार आहे. भारताचे अ‍ॅटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी राकेश किशोर यांच्याविरुद्ध फौजदारी अवमानना कारवाई सुरू करण्यास संमती दिली आहे.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला माहिती दिली आहे. भारताचे अ‍ॅटर्नी जनरल यांनी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारे वकील राकेश किशोर यांच्याविरुद्ध फौजदारी अवमान कारवाई सुरू करण्यास संमती दिली आहे.

उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन, पण युतीची घोषणा कधी? संजय राऊत स्पष्टच बोलले

एससीबीए अध्यक्ष विकास सिंह यांना लिहिलेल्या पत्रात अ‍ॅटर्नी जनरल यांनी या प्रकारचा पूर्णपणे निषेध केला आहे. ‘राकेश किशोर यांच्या “कृती आणि विधाने केवळ निषेधार्ह नाहीत तर सर्वोच्च न्यायालयाच्या वैभवाला आणि अधिकारालाही कमी करणारे आहे. राकेश किशोर यांचे वर्तन “न्याय वितरण व्यवस्थेच्या पायावर आघात करणार आहे.” असही आर. वेंकटरमणी यांनी म्हटले आहे.

घटनेनंतर सीजेआयने काय म्हटले?

पण त्याचवेळी भूषण गवई यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे वर्णन ‘विसरलेला अध्याय’ म्हणून केले. सर्वोच्च न्यायालयात बोलताना सरन्यायाधीश गवई म्हणाले, “सोमवारी घडलेल्या घटनेने मी आणि माझे विद्वान बांधव खूप हादरले आहेत. हा आमच्यासाठी विसरलेला अध्याय आहे.”

न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्याकडून  हल्ल्याचा निषेध

भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्यावेळी न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान हे देखील तिथे उपस्थित होते, त्यांनीही या प्रकारावर टिका केली आहे. “यावर माझे स्वतःचे मत आहे. ते भारताचे मुख्य न्यायाधीश आहे. हा विनोद नाही. गेल्या काही वर्षांत, न्यायाधीश म्हणून, आम्ही अशा अनेक गोष्टी केल्या आहेत ज्या इतरांना योग्य वाटणार नाहीत, परंतु त्यामुळे आम्ही जे केले त्याबद्दल आमचे मत बदलत नाही.”

यादीवर मोठी शंका, विधानसभा निवडणुकीत शेवटच्या चार दिवसात…; काँग्रेसच्या नेत्याचा सवाल

ही एक अक्षम्य घटना – एसजी तुषार मेहता

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही हल्ल्याचा निषेध केला. ते म्हणाले, “भूषण गवईंवर होणारा हल्ला ही अक्षम्य घटना होती आणि या घटनेचा विचार करण्यात मुख्य न्यायाधीशांची महानता आणि उदारता दिसून येते.”

न्यायालयीन सुनावणीदरम्यान घडलेली घटना

६ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजादरम्यान सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याची प्रकार घडला. राकेश किशोर नावाच्या वकिलाने सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर ‘सनातन का अपमान नही सहेगा हिंदुस्तान’ अशी नारेबाजीही त्यांनी केल. त्यांनी केलेल्या प्रकाराबद्दल माफी मागण्यास किंवा या प्रकाराचा पश्चाताप नसल्याचेही स्पष्ट केले. पण या सर्व प्रकारादरम्यान मात्र सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शांत राहणे पसंत केले आणि कामकाजही सुरू ठेवले. “अशा गोष्टींमुळे प्रभावित होणारा मी शेवटचा व्यक्ती आहे. या सर्व गोष्टींमुळे विचलित होऊ नका. आम्ही विचलित नाही. या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही.” असंही भूषण गवईंनी स्पष्ट केले.

तथापि, या घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाने औपचारिक तक्रार दाखल केली नाही. सरन्यायाधीश गवई यांनी रजिस्ट्रीला त्या व्यक्तीविरुद्ध दंडात्मक कारवाई करू नये असे सांगितले. तरीही, दिल्ली पोलिसांनी राकेश किशोर यांची न्यायालयाच्या आवारात अनेक तास चौकशी केली आणि नंतर त्यांना सोडून दिले. नंतर त्यांचे बूट परत करण्यात आले.

 

 

Web Title: Rakesh kishores problems will increase who attacked cji bhushan gavai consent to take criminal action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 12:21 PM

Topics:  

  • CJI BR Gavai
  • Supreme Court of India

संबंधित बातम्या

Supreme Court  News: UGC च्या नव्या नियमांना स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
1

Supreme Court  News: UGC च्या नव्या नियमांना स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.