खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूच्या युतीबाबत स्पष्ट भूमिका मांडली (फोटो - सोशल मीडिया)
Sanjay raut: मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे, यामुळे आरक्षण सोडत, प्रभाग रचना करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. यामध्ये मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील विरोधकांना पाठिंबा दर्शवला आहे. राज ठाकरे यांनी स्वतः मतदार याद्यांमधील घोळ दाखवून दिले. यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. खासदार राऊत म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. सामान्य माणूस आपला प्रतिनिधी जिल्हापरिषद, महानगरपालिका, नगरपालिका पाठवतो आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका सत्तेच विक्रेद्रींकरण करण्याऱ्या संस्था आहेत, या निवडणूकांना फार महत्व आहे. अशा वेळेला त्या निवडणूकांमध्ये विधासभेपर्यंत मतदार याद्या आणि यंत्रणेत घोळ होणार असेल तर त्या निवडणुकीला काय अर्थ नाही. म्हणून ज्यावेळी शिष्टमंडळ आयोगाला भेटलं आणि निवेदन दिलं, त्यांनी ते निवेदन स्वत: निर्णय न घेता केंद्राकडे पाठवलं, मग राज्यात तुम्हाला कशा करता नेमंलय? असा सवाल खासदार राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे सांगितले आहे. निवडणूक यादीत जे दोष आहे ते दुरुस्त करावे. निवडणूक याद्या या निर्दोष असायला पाहिजे, त्याशिवाय निवडणूका घेणं म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे. महाराष्ट्रातले प्रमुख अधिकारी निर्णय घेऊ शकत नाही ही शोकांतिका आहे. मतदान यादीतील बोगस नावे आहेत ती डिलीट करावी आणि वगळलेली नावे समाविष्ट करावीत. महाराष्ट्रात देशात कोणाचे ही आधार कार्ड बोगस तयार केले जाऊ शकते. मोदींच्या काळात दोन हजाराच्या नोटा देखील बोगस चलण्यात आल्या आधारकार्ड, पॅनकार्ड इन बोगस छापले जाते,” असा आरोप खासदार राऊत यांनी केला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मनसे नेते राज ठाकरे यांच्याकडून दरवर्षी दीपोत्सव मुंबईमध्ये आयोजित केला जातो. यंदा देखील राज ठाकरेंनी याचे आयोजन केले जात असून यंदा याचे उद्घाटन उद्धव ठाकरे करणार आहे. याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे. दोन्ही भाऊ अनेक ठिकाणी एकत्र दिसत आहेत मात्र त्यांच्याकडून युतीची घोषणा झालेली नाही. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “मराठी माणसाचा एकजुटीचा दीप उत्सव सोहळा आहे. आज (दि.17) त्याचे उद्घाटन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत. सर्व जण या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत मी सुद्धा त्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे अनेक महिने एकत्र काम करत आहेत. एकत्र राजकारण करत आहेत. या संदर्भात पुढील पाऊले पडणार आहेत ते योग्य वेळी बोलतील,’ असा सूचक इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.