Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्रात सत्तेत असलेल्या ‘या’ पक्षामुळे एनडीएत वाढतोय तणाव; ‘ही’ भूमिका ठरतीये अडचणीची

बिहारमधील राजकीय गणितांमध्ये सातत्याने बदल होत असताना आणि पारस यांच्या पक्षाची स्थितीही स्पष्ट नसताना हे वक्तव्य समोर आले आहे. पशुपती पारस म्हणाले, 'आमचा पक्ष सर्व 243 जागांवर निवडणूक लढवणार आहे. आमचे कार्यकर्ते सर्व बूथ

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 08, 2024 | 09:16 AM
केंद्रात सत्तेत असलेल्या 'या' पक्षामुळे एनडीएत वाढतोय तणाव; 'ही' भूमिका ठरतीये अडचणीची

केंद्रात सत्तेत असलेल्या 'या' पक्षामुळे एनडीएत वाढतोय तणाव; 'ही' भूमिका ठरतीये अडचणीची

Follow Us
Close
Follow Us:

पाटणा : लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) विजय झाला आहे. त्यामध्ये अनेक छोट्या-मोठ्या पक्षांनी भाजपला पाठिंबा दिला असून, नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. असे असताना आता केंद्रात सत्तेत असलेल्या एका पक्षाने जी भूमिका घेतली आहे ती आता अडचणीची ठरत असल्याचे दिसत आहे.

हेदेखील वाचा : सूर्याच्या प्रखर उष्णतेमागची रहस्ये उलगडणार; जाणून घ्या काय आहेत इस्रोच्या PROBA-3 मिशनचे फायदे

राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षप्रमुख पशुपती पारस यांनी आगामी 2025 बिहार विधानसभा निवडणुकीत सर्व 243 जागा स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. बिहारमधील राजकीय गणितांमध्ये सातत्याने बदल होत असताना आणि पारस यांच्या पक्षाची स्थितीही स्पष्ट नसताना हे वक्तव्य समोर आले आहे. पशुपती पारस म्हणाले, ‘आमचा पक्ष सर्व 243 जागांवर निवडणूक लढवणार आहे. आमचे कार्यकर्ते सर्व बूथवर निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत’.

तसेच युतीसोबत करार झाला आणि त्यांना अपेक्षित जागा मिळाल्या तर मित्रपक्षांसोबत निवडणूक लढवण्यास तयार आहे. मात्र, त्यांच्या पक्षाला योग्य जागा न दिल्यास ते एकटेच लढतील.

पशुपती पारस हे रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू

पशुपती पारस हे रामविलास पासवान यांचे धाकटे भाऊ आहेत. त्यांच्या निधनानंतर लोक जनशक्ती पक्षाला वाद आणि मतभेदाला सामोरे जावे लागले. रामविलास यांचा मुलगा चिराग पासवान आणि पशुपती पारस यांनी पक्षापासून फारकत घेतली असली तरी दोन्ही नेते रालोआ आघाडीच्या झेंड्याखाली आहेत. पशुपती पारस यांनी 2021 मध्ये एलजेपीचे अध्यक्षपद स्वीकारले आणि केंद्र सरकारमध्ये मंत्री बनले.

एनडीएत वाढलाय तणाव

बिहारच्या राजकारणात आघाडीला महत्त्वाचे स्थान आहे. राज्यात आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत भाजप आणि जदयू यांची युती झाली आहे, मात्र, पशुपती पारस यांच्या या विधानामुळे रालोआमधील नवा तणाव वाढला आहे.

भाजपचा मित्रपक्ष असूनही पारस यांची भूमिका

भाजपचा मित्रपक्ष असूनही पारस यांच्या भूमिकेवरून ते बिहारमधील भाजपच्या युतीवर खूश नसून कोणतीही तडजोड न करता निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे सूचित करते. आता पशुपती पारस यांच्या या विधानाचा बिहारमधील राजकीय समीकरणावर काय परिणाम होतो आणि भाजप बिहारमधील आपल्या मित्रपक्षांशी कसा ताळमेळ ठेवतो हे पाहायचे आहे.

हेदेखील वाचा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किती वेतन मिळणार माहितीये का? ‘हा’ आकडा एकदा पाहाच…

Web Title: Rashtriya lok janshakti party may contest 243 seats in bihar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2024 | 09:16 AM

Topics:  

  • Bihar Politics
  • political news

संबंधित बातम्या

Vote चोरीचे प्रकरण काँग्रेसवरच पलटणार? चव्हाणांच्या कुटुंबियांनी दुबार-तिबार मतदान केलं? भाजपचा गंभीर आरोप
1

Vote चोरीचे प्रकरण काँग्रेसवरच पलटणार? चव्हाणांच्या कुटुंबियांनी दुबार-तिबार मतदान केलं? भाजपचा गंभीर आरोप

Vice President Election: “…तर 2020 पूर्वीच नक्षलवाद संपला असता”; अमित शहांचा सुदर्शन रेड्डींवर निशाणा
2

Vice President Election: “…तर 2020 पूर्वीच नक्षलवाद संपला असता”; अमित शहांचा सुदर्शन रेड्डींवर निशाणा

कायद्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांवर निशाणा; सत्ताधाऱ्यांच्या दुरुस्ती विधेयकावर जोरदार ‘हंगामा’
3

कायद्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांवर निशाणा; सत्ताधाऱ्यांच्या दुरुस्ती विधेयकावर जोरदार ‘हंगामा’

“देशाला इंग्रजांपेक्षा जास्त भ्रष्टाचाराने लुटलं…; चिमुकलीचं शाळेत बिंधास्त भाषण, रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर
4

“देशाला इंग्रजांपेक्षा जास्त भ्रष्टाचाराने लुटलं…; चिमुकलीचं शाळेत बिंधास्त भाषण, रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.