Vote चोरीचे प्रकरण काँग्रेसवरच पलटणार? चव्हाणांच्या कुटुंबियांनी दुबार-तिबार मतदान केलं? भाजपचा गंभीर आरोप
राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत आहे, तीनही निवडणूक आयुक्तांनी एक गोष्ट समजून घ्यावी, तुम्ही तुमचं काम केलं नाही तर, जेव्हा बिहार आणि दिल्लीत इंडिया आघाडीचं सरकार येईल तेव्हा तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल, आम्ही तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. इतकेच नव्हे तर, ज्यावेळी केंद्रात आमचे सरकार येईल, तेव्हा तुम्ही कुठेही असलात, तुम्ही निवृत्त झाले असलात तरीही आम्ही तुमच्यावर कारवाई करणार, हे लक्षात ठेवा. असंही राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला खडसावलं आहे.