Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडिलांच्या मारहाणीचा गोळी घालून घेतला बदला, ४ अल्पवयीन मुले ताब्यात

याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले चारही आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांना शुक्रवारी संध्याकाळी 5.15 च्या सुमारास पीसीआर कॉल आला.

  • By Sunil Chavan
Updated On: Jul 16, 2022 | 02:56 PM
वडिलांच्या मारहाणीचा गोळी घालून घेतला बदला, ४ अल्पवयीन मुले ताब्यात
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली – जहांगीरपुरी येथे भरदिवसा एका व्यक्तीला गोळ्या घातल्याची घटना समोर आली आहे. जहांगीरपुरीच्या एच-4 ब्लॉकमध्ये जावेद नावाच्या व्यक्तीला गोळी मारल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलीसही आता ऍक्टिव झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करून आरोपींची ओळख पटवली असून आता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले चारही आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांना शुक्रवारी संध्याकाळी 5.15 च्या सुमारास पीसीआर कॉल आला. फोन करणार्‍याने माहिती दिली की, जहांगीरपुरीच्या एच-4 ब्लॉकमध्ये जावेद नावाच्या व्यक्तीवर गोळी झाडण्यात आली आहे.

माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि जखमीला बीजेआरएम रुग्णालयात नेले. जेथे प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना उच्च केंद्रात रेफर केले. 36 वर्षीय जावेदच्या उजव्या डोळ्याजवळ गोळी लागली आहे. जावेद यांनी पोलिसांना माहिती दिली की, दुपारी 4.45 वाजता ते एच-3 ब्लॉकजवळील उद्यानाजवळ असताना तीन अल्पवयीन मुले त्यांच्याजवळ आली. तिन्ही मुले त्यांना ओळखत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी जावेदने सांगितले की, एका मुलाने त्यांच्या तोंडावर गोळी झाडली. गोळी झाडल्यानंतर तिन्ही मुले घटनास्थळावरून पळून गेली. जखमीवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी दिल्लीच्या जहांगीरपुरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. गुन्ह्यात वापरलेले देशी बनावटीचे पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहे.

Web Title: Revenge of fathers beating by shooting 4 minors detained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2022 | 02:56 PM

Topics:  

  • crime news
  • Marathi News
  • New Delhi
  • Revenge

संबंधित बातम्या

मुंबईत साकारणार जगातील सर्वात मोठा ‘Water Metro’ प्रोजेक्ट! 6066 कोटी खर्चून बदलणार मुंबईचं रूप, कसा असेल रुट?
1

मुंबईत साकारणार जगातील सर्वात मोठा ‘Water Metro’ प्रोजेक्ट! 6066 कोटी खर्चून बदलणार मुंबईचं रूप, कसा असेल रुट?

Forex Reserves Update: भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! परकीय चलन साठ्यात मोठी वाढ, सरकारी तिजोरी 674.19 अब्ज डॉलर्सवर
2

Forex Reserves Update: भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! परकीय चलन साठ्यात मोठी वाढ, सरकारी तिजोरी 674.19 अब्ज डॉलर्सवर

मुसळधार पावसाने शाळेला धोका! दरड कोसळल्यानंतर संरक्षणासाठी 15 लाखांचा निधी मंजूर
3

मुसळधार पावसाने शाळेला धोका! दरड कोसळल्यानंतर संरक्षणासाठी 15 लाखांचा निधी मंजूर

Mumbai Crime : मुंबईत सिया-केतन हत्याकांडाची पुनरावृत्ती! डिलिव्हरी बाॅयने अल्पवयीन प्रेयसीला कड्यावरुन ढकलले
4

Mumbai Crime : मुंबईत सिया-केतन हत्याकांडाची पुनरावृत्ती! डिलिव्हरी बाॅयने अल्पवयीन प्रेयसीला कड्यावरुन ढकलले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.