Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Punjab Road Accident: फिरोजपूरमध्ये महामार्गावर भीषण अपघात; ९ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी

Punjab Road Accident News: पंजाबमधील फिरोजपूर-फाझिलका महामार्गावर महिंद्रा पिकअप व्हॅन आणि कॅन्टर यांच्यात झालेल्या धडकेत 9 जणांचा मृत्यू झाला तर १५ हून अधिक जण जखमी झाले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 31, 2025 | 12:41 PM
फिरोजपूरमध्ये महामार्गावर भीषण अपघात, ९ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी (फोटो सौजन्य-X)

फिरोजपूरमध्ये महामार्गावर भीषण अपघात, ९ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Punjab Road Accident News Marathi: पंजाबमधील फिरोजपूर-फाजिलका महामार्गावर एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. गोलुखा वळणाजवळ महिंद्रा पिकअप व्हॅन आणि केटरमध्ये धडक झाली . या धडकेत 9 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 15 हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.हा अपघात शुक्रवारी, सकाळी ७:४५ च्या सुमारास हा अपघात झाला. महिंद्रा पिकअपमधून 15 हून अधिक वेटर जलालाबादकडे जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिरोजपूर फाजिल्का महामार्गावरील अपघातात मृत्युमुखी पडलेले. त्यांना फाजिल्का येथील जलालाबाद सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले आहे. जखमी झालेल्या 15 जणांना फरीदकोट मेडिकल कॉलेज, फिरोजपूर हॉस्पिटल आणि जलालाबाद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृतीही गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Budget Session 2025: आजपासून सुरू होणार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; ‘ही’16 विधेयके सादर होणार

मिळालेल्या माहितीनुसार, पिकअपमधील लोक वेटर असल्याचे सांगितले जात होते आणि ते लग्न सोहळ्याला जात असताना अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. आज (31 जानेवारी) सकाळी फिरोजपूरमधील मोहन उत्तरजवळ हा अपघात झाला. घटनेच्या वेळी पिकअपमध्ये १५ हून अधिक लोक होते. गंभीर जखमींना रस्त्यावरून जाणाऱ्या आणि रुग्णवाहिकांच्या मदतीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताचे कारण गाडीचा वेग

अपघाताच्या वेळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की पिकअप गाडीत बरेच लोक होते आणि गाडीही वेगाने जात होती. अचानक नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. मोठा आवाज झाला आणि मग लोकांच्या ओरडण्याचा आवाज आला. यानंतर आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळाकडे धावले आणि त्याच दरम्यान पोलिसांना माहिती देण्यात आली. सध्या पोलीस अपघाताची चौकशी करत आहेत आणि कारणे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

या अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली. स्थानिक लोकांच्या मते, या महामार्गावर यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत, परंतु वेगाने जाणाऱ्या वाहनांवर कोणतेही बंधन नाही. मृतांच्या कुटुंबियांनी सरकारकडून भरपाईची मागणी केली आहे. प्रशासनाने मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि जखमींवर उपचार करण्याचे आश्वासनही दिले आहे.

याप्रकरणी ,डीएसपी सतनाम सिंह म्हणाले की, घटनेच्या १० मिनिटांतच पोलिस घटनास्थळी पोहोचले. मृत आणि जखमींची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींना उपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे फिरोजपूर, फरीदकोट, जलालाबाद आणि गुरुहरसहाई येथे पाठवण्यात आले आहे. हा अपघात धुक्यामुळे झाला की इतर काही कारणामुळे झाला याचा तपास सुरू आहे. अपघातस्थळी बचावकार्य सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांकडून या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला जात आहे.

दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ; CM फडणवीसांचे आश्वासन

Web Title: Road accident in punjab ferozepur leaves nine dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 12:30 PM

Topics:  

  • Punjab

संबंधित बातम्या

Punjab Crime : भय अजून संपेना! निळ्या ड्रमनंतर आता पोत्यात सापडला मृतदेह , कुजलेले आंबे असल्याचे सांगत रस्त्यावर फेकले
1

Punjab Crime : भय अजून संपेना! निळ्या ड्रमनंतर आता पोत्यात सापडला मृतदेह , कुजलेले आंबे असल्याचे सांगत रस्त्यावर फेकले

खलिस्तानी षड्यंत्राचा सूत्रधार हॅपी पसिया अखेर अडकला जाळ्यात; लवकरच भारताकडे होणार प्रत्यार्पित, NIAने घट्ट केली पकड
2

खलिस्तानी षड्यंत्राचा सूत्रधार हॅपी पसिया अखेर अडकला जाळ्यात; लवकरच भारताकडे होणार प्रत्यार्पित, NIAने घट्ट केली पकड

प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीच्या वडीलांवर गोळीबार, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल
3

प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीच्या वडीलांवर गोळीबार, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

पाण्यावरुन वादाची ठिणगी; सिंधूवर कालवा बांधण्याच्या विचारावर पंजाब अन् काश्मीरमध्ये वाकयुद्ध
4

पाण्यावरुन वादाची ठिणगी; सिंधूवर कालवा बांधण्याच्या विचारावर पंजाब अन् काश्मीरमध्ये वाकयुद्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.