मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन (ट्विटर)
नवी दिल्ली: नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथे सांगितले. दिल्लीत 21 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान होणारे साहित्य संमेलन यशस्वी होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील साहित्य संमेलनासाठीच्या कार्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दिल्लीत होणारे साहित्य संमेलन निश्चित भव्य असे होईल. हे संमेलन देश नव्हे, तर जगभरातील मराठी माणसांकरिता अभिमानास्पद ठरेल. साहित्य संमेलनाचे आयोजन यशस्वी व्हावे यासाठी विविध यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीत होणाऱ्या या संमेलनास विशेष महत्व आहे. राजधानीत होणाऱ्या साहित्य संमेलनाबाबत मराठी साहित्यिक उत्सूक असून हे संमेलन विचारप्रवर्तक ठरेल, साहित्य संमेलनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
🔸Inauguration of the '98th Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan, New Delhi Office' at the hands of CM Devendra Fadnavis
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते '98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नवी दिल्ली कार्यालया'चे उदघाटन
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके… pic.twitter.com/iIwAtGK4Fv— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 30, 2025
दिल्लीतील मराठी मंडळाच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा नागरी सत्कार
दिल्लीतील विविध मराठी मंडळाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी दिल्लीत अनेक वर्षापासून राहत असलेल्या मराठी लोकांनी मुख्यमंत्री यांच्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या. मुख्यमंत्री यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली असून दिल्लीतील मराठी मंडळांसाठी आणि येथील वास्तूंसाठी निश्चित योग्य ती पाऊले उचलली जातील, असे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाबाबत देखील मत व्यक्त केले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नवी दिल्लीतील 98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, जगभरातील मराठी माणसाकरिता साहित्य संमेलन ही अभिमानाची गोष्ट आहे. देशाच्या राजधानीमध्ये अतिशय भव्य स्वरुपामध्ये हे साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनासाठी हे काही सहकार्य लागेल त्यासाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा: Devendra Fadnavis: गोड्या पाण्यातील मासेमारीचे धोरण तयार करा, मुख्यमंत्र्यांची सूचना
गोड्या पाण्यातील मासेमारीचे धोरण तयार करा
मासे हे दैनंदिन आहारात पोषणाच्या दृष्टीने प्राणिजन्य प्रथिनयुक्त अन्न आहे. मत्स्यपालन व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणात विविध रोजगार संधी निर्माण झाल्या आहेत. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून मच्छीमार आणि मत्स्यशेतकरी यांचे सामाजिक-आर्थिक कल्याण एकाच वेळी सुनिश्चित करताना मूल्यसाखळीचे आधुनिकीकरण करणे आणि मजबूत करणे, ट्रेसिबिलिटी वाढविणे तसेच मत्स्य व्यवसाय व्यवस्थापनाला चालना देण्यात येत आहे. मत्स्यबीज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्यासाठीही धोरण तयार करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.