Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मणिपूरमधून RSS सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान; म्हणाले, “हिंदू नसतील तर…”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे मणिपूर दौऱ्यावर आहेत. मणिपूरमध्ये सरसंघचालक भागवत यांनी एका कार्यक्रमाला संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणार समाज, सभ्यता आणि भारताची ताकद यावर भाष्य केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 22, 2025 | 03:59 PM
मणिपूरमधून RSS सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान; म्हणाले, "हिंदू नसतील तर...";

मणिपूरमधून RSS सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान; म्हणाले, "हिंदू नसतील तर...";

Follow Us
Close
Follow Us:

सरसंघचालक मोहन भागवत मणिपूर दौऱ्यावर
प्रत्येक समस्येचे निराकरण होऊ शकते – भागवत 
भारतापासून सुरू झाला ब्रिटिशांचा सूर्यास्त

ईम्फाळ: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे मणिपूर दौऱ्यावर आहेत. मणिपूरमध्ये सरसंघचालक भागवत यांनी एका कार्यक्रमाला संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणार समाज, सभ्यता आणि भारताची ताकद यावर भाष्य केले आहे.  आम्ही एक बेसिक सोशल नेटवर्क तयार केले आहे, जे हिंदू समाजाचे अस्तित्व सुनिश्चित करेल. कारण हिंदू राहिले नाहीत तर, जग अस्तित्वात राहणार नाही, असे मोहन भागवत म्हणाले. मोहन भागवत मणिपूरमध्ये बोलत होते.

पुढे बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, “प्रत्येकाने परिस्थितीवर विचार करणे गरजेचे आहे. जगातील अनेक देशांनी वेगवेगळ्या परिस्थितींचा सामना केला आहे. काही राष्ट्र त्यात नष्ट झाले आहेत. ग्रीस, रोम हे देश या ठिकाणी नष्ट झाले. मात्र आपल्यात असे काहीतरी आहे, जे आपल्याला पुढे नेत आहे.”

पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले, “भारत एका अमर समाजाचे, संस्कृतीचे नाव आहे. इतर काही जण आले आणि गेले. आपण त्यांचे उदय आणि पतन पाहिले आहे. आपण अस्तित्वात आहोत आणि यापुढेही राहू. कारण आपण एक स्थानिक मूलभूत असे नेटवर्क तयार केले आहे. यामुळेच हिंदू समाज टिकून राहील. हिंदू नसतील तर हे जग नसेल.कारण हिंदू समाजच जगाला वेळोवेळी धर्माचा खरा अर्थ आणि मार्गदर्शन करतो.”

शेजारील देशाच्या अजराजकतेवर मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान

संघाच्या शताब्दीच्या या उत्सवामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशाच्या तरुणांना प्रोत्साहन केले. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय परिस्थिती, टॅरिफ वॉर आणि शेजारील देशांमध्ये असणारी अराजकता अशा सर्वच विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले की,  हिंदू समाज हा या देशासाठी उत्तरदायी असलेला समाज आहे.

RSS ने दिला स्वदेशीचा नारा…! टॅरिफ वॉर अन् शेजारील देशाच्या अजराजकतेवर मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान

हिंदू समाज सर्वसमावेशक आहे. वर उल्लेख केलेली विविध नावे, रूपे पाहता, स्वतःला वेगळे मानणे आणि मानवांमध्ये विभाजन किंवा वियोग निर्माण करणे, हिंदू समाज’ आपण आणि ते’ या मानसिकतेपासून मुक्त आहे, मुक्त राहील. हिंदू समाज हा ‘वसुधैव कुटुंबकम’ या सर्वसामावेशी विचारसरणीचा प्रवर्तक तथा संरक्षक आहे. म्हणूनच, भारताला समृद्ध बनवणे, संपूर्ण जगाला त्याचे अपेक्षित आणि योग्य योगदान देणारा देश बनवणे हे हिंदू समाजाचे कर्तव्य आहे. जगाला एक नवीन मार्ग दाखवू शकणाऱ्या धर्माचे रक्षण करताना, भारताला समृद्ध बनवण्याच्या संकल्पाने, संघ आपल्या संघटित कार्यबलाद्वारे संपूर्ण हिंदू समाजाला संघटित करण्याचे काम करत आहे,असे मत मोहन भागवत यांनी व्यक्तकेले.

Web Title: Rss chief dr mohan bhagwat statement on hindu community in manipur event

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 03:55 PM

Topics:  

  • Hindu
  • Manipur
  • Rss Chief Mohan Bhagwat

संबंधित बातम्या

Hindu Religion: 93 वा 95 नाही, तर हिंदू धर्मात चितेच्या राखेवर 94 आकडाच का लिहिला जातो? काय आहे रहस्य
1

Hindu Religion: 93 वा 95 नाही, तर हिंदू धर्मात चितेच्या राखेवर 94 आकडाच का लिहिला जातो? काय आहे रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.