Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“हिंदूंनी ३ मुलांना जन्म द्यावा, ‘घरवापसी’चा वेग वाढवा”; लखनौमध्ये सरसंघचालक Mohan Bhagwat यांचे मोठे विधान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी हिंदू समाजाला संघटित होऊन स्वतःला सक्षम बनवण्याचे आणि किमान तीन मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 17, 2026 | 09:32 PM
लखनौमध्ये सरसंघचालक Mohan Bhagwat यांचे मोठे विधान (Photo Credit- X)

लखनौमध्ये सरसंघचालक Mohan Bhagwat यांचे मोठे विधान (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • हिंदू कुटुंबात किमान ३ मुले असावीत
  • लोकसंख्या संतुलनावर सरसंघचालकांचे मोठे विधान
  • जाणून घ्या काय म्हणाले ते…
Mohan Bhagwat On Hindu Population Growth: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत सध्या दोन दिवसीय लखनौ दौऱ्यावर असून, मंगळवारी त्यांनी सामाजिक सद्भाव बैठकीत विविध ज्वलंत मुद्द्यांवर भाष्य केले. हिंदू समाजातील कमी होणाऱ्या जन्मदर ही चिंतेची बाब असल्याचे सांगत, लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक हिंदू कुटुंबात किमान तीन मुले असणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

लोकसंख्या आणि ‘घरवापसी’वर रोखठोक भूमिका

लोकसंख्येच्या मुद्द्यावर बोलताना मोहन भागवत म्हणाले की, “हिंदू समाजाने कुटुंब विस्ताराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. लोकसंख्येचे संतुलन बिघडणे भविष्यासाठी घातक ठरू शकते, त्यामुळे तरुणांनी विवाहांतर किमान तीन मुलांच्या पालकत्वाचा विचार करावा.” तसेच, ‘घरवापसी’च्या मुद्द्यावर त्यांनी स्पष्ट केले की, ही कोणतीही तात्काळ प्रक्रिया नसून सामाजिक संवाद आणि सामंजस्यातून हळूहळू होणारी प्रक्रिया आहे.

“भारतीय मुस्लिमांचे पूर्वज हिंदूच”

सामाजिक सलोख्यावर भर देताना सरसंघचालकांनी मुस्लिमांबाबत मोठे विधान केले. “भारतात राहणाऱ्या मुस्लिमांची मुळे याच भूमीशी जोडलेली आहेत. ते येथीलच पूर्वजांची संतान आहेत. त्यामुळे समाजाला विभागण्याऐवजी जोडण्याची आज खरी गरज आहे,” असे त्यांनी नमूद केले. मुस्लिम राष्ट्रीय मंचबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की, काही मुस्लिमांनी स्वतःहून संघाशी जोडले जाण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यातूनच या मंचाची स्थापना झाली.

“मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न; राज ठाकरेंनी RSS मोहन भागवतांना सुनावले खडेबोल

UGC नियम आणि घटनात्मक प्रक्रिया

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) नियमांवरून सुरू असलेल्या वादावर भागवत यांनी सरकारची बाजू सावरली. “सरकारने बनवलेले नियम कोणत्याही विशिष्ट वर्गाच्या विरोधात नसतात. कायद्याचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. कोणाला आक्षेप असल्यास त्यांनी घटनात्मक मार्गाने आपली बाजू मांडावी, कारण हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे,” असे त्यांनी सांगितले.

जातिभेद निर्मूलनासाठी सहकार्याचे आवाहन

जातिव्यवस्थेवर चिंता व्यक्त करताना भागवत यांनी एक मार्मिक उदाहरण दिले. ते म्हणाले, “जर एखादी व्यक्ती खड्ड्यात पडली असेल, तर त्याला बाहेर काढण्यासाठी बाहेरच्या व्यक्तीला झुकावे लागेल आणि खड्ड्यातील व्यक्तीलाही हात वर करावा लागेल. म्हणजेच, सामाजिक समरसता ही दोन्ही बाजूंच्या सहकार्यानेच शक्य आहे.” जातीपातीचे राजकारण आणि भेदभाव विसरून समाज म्हणून एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.

इतिहासातून आत्मविश्वास घेण्याची गरज

मुघल आणि इंग्रजांच्या प्रदीर्घ राजवटीतही भारतीय संस्कृती आणि सनातन परंपरा अबाधित राहिली, याचा दाखला देत त्यांनी हिंदू समाजात आत्मविश्वास जागवण्याचा प्रयत्न केला. “अनेक आक्रमणे झेलूनही आपली संस्कृती भक्कम आहे, त्यामुळे आजच्या समाजाने पूर्ण आत्मविश्वासाने प्रगतीपथावर पुढे जायला हवे,” असे ते म्हणाले.

Mohan Bhagwat News: ‘संघाने सांगावे राजीनामा देतो!’ ७५ वर्षे वयोमानावर मोहन भागवत यांचे मोठे विधान

Web Title: Rss chief mohan bhagwats big statement in lucknow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 09:32 PM

Topics:  

  • Hindu
  • Indian Population
  • Lucknow
  • mohan bhagwat
  • RSS

संबंधित बातम्या

Mohan Bhagwat: ‘भारताने कधीही महासत्ता…’, कॅनडात मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य; ‘तिसरा मार्ग’ दाखवणार जगाला दिशा
1

Mohan Bhagwat: ‘भारताने कधीही महासत्ता…’, कॅनडात मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य; ‘तिसरा मार्ग’ दाखवणार जगाला दिशा

Mohan Bhagwat: ‘RSS आमचे प्रतिनिधित्व करत नाही’, मोहन भागवतांच्या न्यूयॉर्कमधील कार्यक्रमाला 61 संघटनांचा विरोध; हिंदूंचाही निषेध
2

Mohan Bhagwat: ‘RSS आमचे प्रतिनिधित्व करत नाही’, मोहन भागवतांच्या न्यूयॉर्कमधील कार्यक्रमाला 61 संघटनांचा विरोध; हिंदूंचाही निषेध

Rahul Gandhi PC Live: हल्दवानीत खर्गेंच्या रॅलीनंतर शुद्धीकरण; राहुल गांधींकडून भाजप-आरएसएसच्या मानसिकतेवर थेट हल्ला
3

Rahul Gandhi PC Live: हल्दवानीत खर्गेंच्या रॅलीनंतर शुद्धीकरण; राहुल गांधींकडून भाजप-आरएसएसच्या मानसिकतेवर थेट हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.