
Ayodhya Ram Mandir: "अशोक सिंघल यांना..."; RSS सरसंघचालक मोहन भागवत नेमके काय म्हणाले?
राम मंदिराच्या शिखरासाठी धर्मध्वज फडकावण्यात आला
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते फडकावण्यात आला धर्मध्वज
श्री राम जन्मभूमीत पार पडला सोहळा
श्री राम जन्मभूमी असलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरासाठी धर्मध्वज फडकावण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १९१ फूट उंच शिखरावर प्रथमच तो फडकवला आहे. पंतप्रधान मोदींनी शुभ मुहूर्तावर २२ फूट लांब, ११ फूट रुंद आणि अंदाजे ३ किलो वजनाचा धर्मध्वज फडकवला. दरम्यान या शुभप्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संबोधन केले आहे.
श्री रामजन्मभूमी अयोध्या येथून बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, “आज आपल्यासाठी यशाचा दिवस आहे. अनेकांनी या दिवसाचे स्वप्न पाहिले. अनेकांनी आपले प्राण अर्पण केले. आज त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. धर्मध्वज फडकवण्यात आला आहे. अशोक सिंघल यांच्या आत्म्याला आज शांती मिळाली असेल.”
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरावर ध्वजारोहण
अखेर ५०० वर्षांची प्रतीक्षा संपली असली असून अयोध्येत बांधलेल्या भव्य श्री राम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकवण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी शुभ मुहूर्तावर २२ फूट लांब, ११ फूट रुंद आणि अंदाजे ३ किलो वजनाचा धर्मध्वज फडकवला. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि देशभरातून आलेल्या सुमारे ७००० पाहुण्यांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. ध्वजारोहण करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी सप्तमंदिरात सप्त ऋषींचे दर्शन घेतले आणि भगवान रामाची आरती केली. यावेळी पंतप्रधान म्हणाले की शतकानुशतके जखमा बरी होत आहेत.
#WATCH | Ayodhya Dhwajarohan | RSS Sarsanghchalak Mohan Bhagwat says, "This is a significant day for all of us. Numerous people saw a dream, numerous people made efforts, and numerous people made sacrifices. Their souls must be full today. Ashok ji (Ashok Singhal) must have felt… pic.twitter.com/QLXPWMn8b3 — ANI (@ANI) November 25, 2025
यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितले की, “आज, अयोध्या शहर भारताच्या सांस्कृतिक जाणिवेतील आणखी एक वळण पाहत आहे. श्री राम जन्मभूमी मंदिरात ध्वजारोहण सोहळ्याचा हा क्षण अद्वितीय आणि असाधारण आहे. हा धर्मध्वज केवळ एक ध्वज नाही… तो भारतीय संस्कृतीच्या पुनर्जागरणाचा ध्वज आहे. हा ध्वज संघर्षातून निर्माण झालेल्या निर्मितीची गाथा आहे, शतकानुशतके जुन्या स्वप्नांचे मूर्त स्वरूप आहे, संतांच्या आध्यात्मिक साधना आणि समाजाच्या सहभागाचा अर्थपूर्ण कळस आहे.
तसेच पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपण असा समाज निर्माण करूया जिथे गरिबी नसेल, कोणीही दुःखी किंवा असहाय्य नसेल. जे काही कारणास्तव मंदिरात येऊनही दूरवरून मंदिराच्या ध्वजाला आदरांजली वाहण्यास असमर्थ आहेत, त्यांनाही तेच पुण्य मिळते. हा धर्मध्वज या मंदिराच्या ध्येयाचे प्रतीक आहे. हा ध्वज दूरवरून राम लल्लाच्या जन्मस्थानाची झलक देईल. तो येणाऱ्या युगानुयुगे सर्व मानवजातीला श्री रामाच्या आज्ञा आणि प्रेरणा देईल. या अनोख्या प्रसंगी मी जगभरातील लाखो रामभक्तांना माझ्या शुभेच्छा देतो.”