Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जैसलमेरमध्ये होणार जैन समाजाचा ‘हा’ भव्य कार्यक्रम; RSS सरसंघचालक मोहन भागवत राहणार उपस्थित

खरतरगच्छाधिपती पूज्य श्री जिनमणिप्रभ सुरिश्वरजी यांच्या पावन ​सानिध्यात ८७१ वर्षानंतर युगप्रधान प्रथम दादा गुरुदेव श्री जिनदत्तसूरी यांच्या दिव्य चादर​चे दर्शन या चादर महोत्सवाच्या माध्यमाने या पिढीला होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 27, 2026 | 05:25 PM
जैसलमेरमध्ये होणार जैन समाजाचा ‘हा’ भव्य कार्यक्रम; RSS सरसंघचालक मोहन भागवत राहणार उपस्थित
Follow Us
Close
Follow Us:

देशभरातल्या विविध धर्म आणि पंथांचे वैचारिक मंथन
जैसलमेर मध्ये होणार भारतीय संस्कृतीचा महाकुंभ
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत राहणार उपस्थित

मुंबई: स्वर्णनगरी जैसलमेर येथे जैन समाजाचा भव्य आध्यात्मिक युगप्रधान प्रथम दादा गुरुदेव श्री जिनदत्तसूरी यांच्या दिव्य चादर​ महामहोत्सव​ आयोजित करण्यात येत असून या महोत्सवात भारतीय संस्कृती आणि समरसता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत ६ मार्च रोजी या महोत्सवाचा शुभारंभ होणार​ असून ८ मार्च पर्यंत श्रद्धा, तप व त्यागपरंपरे​चा उत्सव सुरु राहणार असल्याची माहिती कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान भवनात दिली. हा अध्यामिक महोत्सव सामाजिक बंधुभाव आणि आस्थेचं प्रतीक ​असल्याचे प्रतिपादनही मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या व्याख्यानाने समरसता कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. येत्या ६ मार्च पासून सुरू होणारा हा महोत्सव ८ मार्च पर्यंत चालणार असून यात सुमारे एक लाख भाविक सहभाग घेणार आहेत. त्याचबरोबर समरसता कार्यक्रमाच्या अनुषंगाने देशभरातून विविध धर्म आणि पंथांचे २५०० साधू , संत आणि महंत वसुधैव कुटुम्बकम् यावर वैचारिक मंथन करणार आहेत.

RSS सारखी संघटना कुठेही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांनी मांडली संघाची रुपरेषा अन् विचारधारा

खरतरगच्छाधिपती पूज्य श्री जिनमणिप्रभ सुरिश्वरजी यांच्या पावन ​सानिध्यात ८७१ वर्षानंतर युगप्रधान प्रथम दादा गुरुदेव श्री जिनदत्तसूरी यांच्या दिव्य चादर​चे दर्शन या चादर महोत्सवाच्या माध्यमाने या पिढीला होणार आहे. जैन श्वेतांबर समुदायाचे प्रथम दादा गुरुदेव श्री जिनदत्तसूरी यांच्या ​८७​१ वर्षांपूर्वीच्या अग्निसंस्कारावेळी त्यांचे शरीर भस्म झाले; मात्र त्यां​चे पवित्र वस्त्र ​चादर, चोल-पट्टा व मुखपट्टी अक्षत राहिली. या अद्भुत व पवित्र चादरीच्या पूजनासाठीच चादर महोत्सव साजरा केला जातो. खरतरगच्छ समुदायासाठी हा महोत्सव अत्यंत आध्यात्मिक व ऐतिहासिक महत्त्वाचा मानला जातो.​

आपत्ती आली तरी घाबरू नका! ‘दोन लाख विद्यार्थ्यांना…’; Mangal Prabhat Lodha यांची संकल्पना

संपूर्ण देशात या आयोजनाबाबत मोठा उत्साहअसून तयारी अंतिम टप्प्यात आहे. महोत्सवादरम्यान दादा गुरुदेवांशी संबंधित पवित्र चादर, चोल-पट्टा व अन्य ऐतिहासिक वास्तूंचे विशेष पूजन, आराधना, प्रवचन, भक्ती कार्यक्रम, ऐतिहासिक ५ किलोमीटरची शोभायात्रा तसेच सामूहिक धार्मिक विधी आयोजित करण्यात येणार आहेत. हा महोत्सव आध्यात्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असून समाजात धर्म, संयम, अहिंसा आणि सदाचाराचा संदेश प्रसारित करणारा आहे, असेही मंत्री लोढा म्हणाले.

Web Title: Mangal prbhat lodha said chadar maha mahotsav dada gurudev shri jinadatsuri will held jaisalmer presence of mohan bhagwat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • Indian culture
  • Mangal Prabhat Lodha
  • Rss Chief Mohan Bhagwat

संबंधित बातम्या

ब्रिटीशकालीन खुणा पुसल्या! मंत्री मंगलप्रभात लोढांच्या पाठपुराव्याला यश; बेलासीस पुलाचे नाव आता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’
1

ब्रिटीशकालीन खुणा पुसल्या! मंत्री मंगलप्रभात लोढांच्या पाठपुराव्याला यश; बेलासीस पुलाचे नाव आता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.