1. काशी -मथुरा प्रकरणावर मोहन भागवतांचे महत्वाचे विधान
2. भाजपचा अध्यक्ष आम्ही ठरवत नाही – मोहन भागवत
3. स्वयंसेवक कोणत्याही मोहिमेत सहभागी होण्यास स्वतंत्र
Kashi-Mathura: देशभरात राम मंदिराच्या आंदोलनानंतर काशी-मथुरा येथील मंदिरांसाठी देखील आंदोलन केले जात आहे. या दोन्ही प्रकरणांवर कोर्टात सुनावणी सुरू आहे. दरम्यान या प्रकरणावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्वाचे विधान केले आहे. या आंदोलनात संघाचा सहभाग असणार की नाही याबाबत त्यांनी विधान केले आहे.
राजधानी दिल्ली येथे विज्ञान भवनमध्ये आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमालेच्या समारोप समारंभात सरसंघचालक मोहन भागवत बोलत होते. या कार्यक्रमात सरसंघचालक म्हणाले, “राम मंदिराचे आंदोलन हे एकमेव होते ज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने थेट सहभाग घेतला होता. स्वयंसेवक अशा कोणत्याही मोहिमेत सामील होण्यास स्वतंत्र आहेत.”
100 वर्ष की संघ यात्रा नए क्षितिज तृतीय दिवस 28 अगस्त 2025 विज्ञान भवन दिल्ली https://t.co/rN713FHaOZ
— RSS (@RSSorg) August 28, 2025
पुढे बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, “राम मंदिर ही अशी एक चळवळ होती ज्याला संघाने पाठिंबा दिलेला. संघ अन्य कोणत्याही आंदोलनात सहभागी होणार नाही. संघ काशी-मथुरामधील चळवळींना पाठिंबा देणार नाही, परंतु आमचे स्वयंसेवक त्यात सहभागी होऊ शकतात.” मोहन भागवत यांच्या या विधानाकडे संघाच्या भविष्यातील रणनीतीचा एक भाग समजले जात आहे. कारण आतापर्यंत या दोन्ही प्रकरणात संघ सकिरी भूमिका घेईल असे वाटत होते.
RSS Chief Mohan Bhagwat: प्रत्येक भारतीयाने ३ अपत्ये जन्माला घालावीत! मोहन भागवत यांचे विधान चर्चेत
भाजपचा अध्यक्ष आम्ही ठरवत नाही
सरसंघचालक मोहन भागवत यांनी या कार्यक्रमात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत देखील भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपसाठी रिमोट कंट्रोल म्हणून कार्यरत आहे ही धारणा त्यांनी नाकारली. ते म्हणाले, “आम्ही निर्णय घेत अस्टो तर इतका वेळ लागला असता का? संघाचे काम फक्त सूचना देण्याचे आहे. अंतिम निर्णय घेणे हे पक्षाचे काम आहे. संघ शाखा चालवण्यात तज्ज्ञ आहे, त्याचप्रमाणे भाजप सरकार चालवण्यात तज्ज्ञ आहे. दोघेही एकमेकांचा आदर करतात.
प्रत्येक भारतीयाने ३ अपत्ये जन्माला घालावीत – भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावर मोठे आणि धक्कादायक विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारतातील प्रत्येक नागरिकाने किमान तीन अपत्ये जन्माला घालावीत. मोहन भागवत म्हणाले की, ‘जन्मदराच्या बाबतीत तुम्ही हा प्रश्न प्रचारकाला विचारू नये, पण आता विचारला आहे तर मी उत्तर देतो.’ ते म्हणाले की, जगात सर्व शास्त्रे सांगतात की, ज्या समाजाचा जन्मदर ३ पेक्षा कमी असतो, तो हळूहळू लुप्त होतो. त्यामुळे तीनपेक्षा जास्त जन्मदर राखणे आवश्यक आहे.