Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raghav Chadha News : राघव चड्ढांनी मोदींविरोधी सर्व पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांनी स्क्रीनशॉटसह केली पोलखोल

खासदार राघव चड्ढा यांचा आम आदमी पक्षासोबत वाद निर्माण झाला असून त्यांनी मोदींविरोधात पोस्ट डिलीट केल्या आहेत. ल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी राघव चड्ढांची स्क्रीनशॉटसह पोलखोल केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 05, 2026 | 12:14 PM
Raghav Chadha left from aam-aadmi-party-announcedAshok Mittal and Sandeep Pathak left AAP

Raghav Chadha left from aam-aadmi-party-announcedAshok Mittal and Sandeep Pathak left AAP

Follow Us
Follow Us:
  • राघव चड्ढा आणि आप पक्षामध्ये वाढला संघर्ष
  • चड्ढांनी डिलीट केल्या मोदींविरोधात सर्व पोस्ट
  • सौरभ भारद्वाज यांनी स्क्रीनशॉटसह पोलखोल केली
Raghav Chadha News : नवी दिल्ली : आम आदमी पक्षामध्ये अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. पक्षामध्ये राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्याविरोधात वातावरण निर्माण झाले असून सर्व नेत्यांनी त्यांना निशाण्यावर धरले आहे. राघव चड्ढा यांच्यावर पक्षाने कारवाई देखील केली. त्यांना राज्यसभा उपनेते पदावरुन हटवण्यात आले आहे. तसेच त्यांना राज्यसभेमध्ये बोलण्यास वेळ देऊ नये असे देखील आपकडून सांगण्यात आले आहे. यानंतर आम आदमी पक्षाचे नेते आणि राघव यांच्यावर राजकीय वादंग निर्माण झाला आहे. दरम्यान, आप (AAP) दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी राघव चड्ढांची स्क्रीनशॉटसह पोलखोल केली आहे.

सौरभ भारद्वाज यांनी राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्यावर एक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की, चड्ढा यांनी त्यांच्या ‘X’ नावाच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून त्या सर्व जुन्या पोस्ट डिलीट केल्या आहेत, ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली होती. सौरभ भारद्वाज यांनी असेही सांगितले की, ‘आप’च्या नेत्यांनी शेअर केलेले राघव चड्ढा यांचे अनेक ट्वीट्स आता त्यांच्या अकाऊंटवरून गायब झाले आहेत. सौरभ यांनी त्यांच्या पूर्वीच्या अकाऊंटवरील राघव चड्ढा यांच्या नावावर असलेल्या काही पोस्ट्सचे स्क्रीनशॉट्स देखील शेअर केले आहेत.

हे देखील वाचा : Raghav Chadha: “मी संसदेत ओरडण्यासाठी आणि शिवीगाळ…,” राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार

सौरभ भारद्वाज यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, ‘राघव चड्ढाने आपली एक्स टाइमलाइन पूर्णपणे पुसून टाकली आहे, मोदी किंवा भाजपविरोधी सर्व जुन्या टीकात्मक पोस्ट्स गायब झाल्या आहेत! मी “भाजप” आणि “मोदी” हे शब्द वापरून त्याचे संपूर्ण अकाउंट तपासले. निकाल धक्कादायक आहेत: पूर्वीची कोणतीही टीका दिसत नाही. “मोदी” हा शब्द असलेल्या फक्त दोन पोस्ट्स शिल्लक आहेत, आणि त्या दोन्ही मोदींची प्रशंसा करणाऱ्या आहेत. आपच्या नेत्यांनी कोट केलेले ट्वीट्ससुद्धा गायब झाले आहेत,” असा दावा सौरभ भारद्वाज यांनी केला आहे.

राघव चड्ढा ने अपने X टाइमलाइन को पूरी तरह साफ कर दिया है , मोदी या भाजपा के खिलाफ जितनी भी पुरानी आलोचनात्मक पोस्ट्स थीं, वे सब गायब! मैंने उनके पूरे अकाउंट को “BJP” और “Modi” शब्दों से गहराई से सर्च किया। नतीजा चौंकाने वाला है , कोई भी पुरानी आलोचना अब दिखाई नहीं देती। “Modi”… pic.twitter.com/sTodxW8YHd — Saurabh Bharadwaj (@Saurabh_MLAgk) April 4, 2026

हे देखील वाचा : “राघव, तुम्ही घाबरलेले..PM मोदींच्या विरोधात बोलायला घाबरता; AAP नेत्याने सगळंच काढलं बाहेर

पुढे त्यांनी लिहिले आहे की,  “ही केवळ एक साधी साफसफाई नाही, तर त्याच्या संपूर्ण डिजिटल इतिहासाची शस्त्रक्रियेने केलेली पुसून टाकण्याची कारवाई आहे. एकेकाळी मोदी आणि भाजपचे कडवे टीकाकार असलेल्या राघव चड्ढाने आपली जुनी प्रतिमा पूर्णपणे पुसून टाकली आहे आणि एक नवीन, चकचकीत वॉशिंग मशीन सादर केली आहे. ज्या व्यक्तीची टाइमलाइन इतक्या पद्धतशीरपणे बदलली गेली आहे, त्याला किती तयारी करावी लागली असेल याची तुम्ही कल्पना करू शकता,” असे सूचक वक्तव्य आप नेते सौरभ भारद्वाज यांनी केले आहे. त्यांनी राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

Web Title: Saurabh bharadwaj shares screenshot of raghav chadhas x account deleted post against pm modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • AAP
  • Arvind kejriwal
  • Raghav Chadha

संबंधित बातम्या

AAP नेता नंदिनी बोसमियाने गळफास घेत संपवले आयुष्य, लिव्ह-इन-पार्टनर असलम हुसैनवर हत्येचा आरोप
1

AAP नेता नंदिनी बोसमियाने गळफास घेत संपवले आयुष्य, लिव्ह-इन-पार्टनर असलम हुसैनवर हत्येचा आरोप

‘धर्मेंद्र प्रधान यांना इतका अहंकार?’; पेपर लीकचा विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवल्याने अरविंद केजरीवाल संतापले!
2

‘धर्मेंद्र प्रधान यांना इतका अहंकार?’; पेपर लीकचा विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवल्याने अरविंद केजरीवाल संतापले!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.