Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता नव्याने स्वतंत्र SIT स्थापन होणार; तिरुपती लाडू प्रसाद वादप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Tirupati Temple Laddu Case : आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर लाडू वाद प्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. आता नव्या तपास पथकात सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांचाही समावेश होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 04, 2024 | 12:09 PM
आता नव्याने स्वतंत्र SIT स्थापन होणार; तिरुपती लाडू प्रसाद वादप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश (फोटो सौजन्य-X)

आता नव्याने स्वतंत्र SIT स्थापन होणार; तिरुपती लाडू प्रसाद वादप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारच्या काळामध्ये तिरुपती देवस्थानच्या लाडू प्रसादामध्ये जनावरांची चरबी आणि माशांच्या तेलाचा वापर होत होता, असा आरोप विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. त्यानंतक देशभरात एकच खळबळ उडाली. याचदरम्यान आता तिरुपती प्रसादम वादाच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाने स्वतंत्र तपासासाठी पाच सदस्यीय एसआयटी (SIT) स्थापन केली आहे. म्हणजे राज्याची एसआयटी न्यायालयाने रद्द केली.

आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या नव्या एसआयटीमध्ये दोन CBI अधिकारी असतील. याशिवाय या टीममध्ये राज्य पोलिसांचे दोन आणि FSSAI चा एक अधिकारी देखील असणार आहेत. हे आदेश देताना न्यायालयाने या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी करावी, असे स्पष्ट केले. सॉलिसिटर जनरल यांनी जुन्या एसआयटीवर विश्वास व्यक्त केला असला तरी न्यायालयाने नवीन एसआयटी स्थापन केली.

या प्रकरणात नाटक नको- एस.सी

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती गवई म्हणाले की, हे राजकीय नाटक होऊ नये अशी आमची इच्छा आहे. स्वतंत्र संस्था असेल तर आत्मविश्वास येईल. या प्रकरणाची सुनावणी काल म्हणजेच बुधवारी पुढे ढकलण्यात आली. एसजी तुषार मेहता यांनी शुक्रवारी केंद्राचे उत्तर सादर करणार असल्याचे सांगितले होते, त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी एका दिवसाने पुढे ढकलण्यात आली.

मागच्या सुनावणीत SC काय म्हणाले?

गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना विचारले होते की, राज्य सरकारची एसआयटी पुरेशी आहे की तपास स्वतंत्र एजन्सीकडे सोपवावा. एसजी म्हणाले की मी या समस्येकडे लक्ष दिले. एक गोष्ट स्पष्ट आहे की या आरोपात तथ्य असेल तर ते अस्वीकार्य आहे. मला एसआयटी सदस्यांविरुद्ध काहीही आढळले नाही.

एसआयटीवर वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्याने लक्ष ठेवले पाहिजे, असे एसजी म्हणाले. यामुळे आत्मविश्वास वाढेल. न्यायमूर्ती गवई म्हणाले की, चौकशी झाली तर मुख्यमंत्र्यांना हरकत नाही, असे आम्ही वर्तमानपत्रात वाचले आहे. रोहतगी म्हणाले की, आम्हाला एसआयटीसोबत जायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही अधिकारी समाविष्ट करू शकता. सरकारने भावना लक्षात घेऊन एफआयआर दाखल केला.

याचिकाकर्त्याची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र तपास झाल्यास ते योग्य ठरेल. त्यांनी निवेदन दिले नसते तर गोष्ट वेगळी असती. तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या आंध्र प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीच्या सदस्यांवर मला विश्वास आहे. एसआयटीच्या तपासावर केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष ठेवले पाहिजे, असा त्यांचा सल्ला असल्याचे एसजी म्हणाले.

काय आहे तिरुपती लाडूचा वाद प्रकरण ?

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दावा केला होता की, राज्यातील मागील सरकारच्या काळात (जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील) तिरुपतीमध्ये लाडू तयार करण्यासाठी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला होता. नायडूंच्या या वक्तव्यानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. सर्वोच्च न्यायालयात तीनहून अधिक याचिका दाखल झाल्या होत्या. याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये सुब्रमण्यम स्वामी, राज्यसभा खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी आणि इतिहासकार विक्रम संपत यांचा समावेश आहे. या प्रकरणी ३० सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने कडक टीका केली होती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात किमान देवाला राजकारणापासून दूर ठेवा, असे म्हटले होते.

Web Title: Sc orders independent sit probe into tirupati prasadam row

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 12:09 PM

Topics:  

  • Supreme Court

संबंधित बातम्या

Supreme Court on Firecrackers: दिवाळीपूर्वी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘फटाक्यांवर पूर्ण बंदी शक्य नाही’, मात्र ही अट घातली
1

Supreme Court on Firecrackers: दिवाळीपूर्वी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘फटाक्यांवर पूर्ण बंदी शक्य नाही’, मात्र ही अट घातली

Supreme Court News: दिवाणी न्यायाधीश होण्यासाठी 3 वर्षांच्या वकिली सरावाची अट रद्द: सर्वोच्च न्यायालय
2

Supreme Court News: दिवाणी न्यायाधीश होण्यासाठी 3 वर्षांच्या वकिली सरावाची अट रद्द: सर्वोच्च न्यायालय

अयोध्यामध्ये प्रस्तावित मस्जिदचा आरखडा नाकारला, सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराऐवजी बांधकाम करण्याचे दिले होते आदेश
3

अयोध्यामध्ये प्रस्तावित मस्जिदचा आरखडा नाकारला, सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराऐवजी बांधकाम करण्याचे दिले होते आदेश

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसला दिलासा नाही; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावली, जाणून घ्या नेमकं काय होतं प्रकरण
4

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसला दिलासा नाही; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावली, जाणून घ्या नेमकं काय होतं प्रकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.