Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषींची सुटका करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नलिनी श्रीहरन यांना वेल्लोरमधील महिलांसाठी असलेल्या विशेष तुरुंगात 30 वर्षांहून अधिक काळ ठेवण्यात आले आहे, तर रविचंद्रन हे मदुराई येथील मध्यवर्ती कारागृहात आहेत आणि 29 वर्षांच्या तुरुंगवास आणि माफीसह त्यांनी 37 वर्षे तुरुंगात घालवले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 11, 2022 | 04:26 PM
राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषींची सुटका करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली :  देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या (Rajiv Gandhi) हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या दोषींची तुरुंगातून मुक्तता करण्यात  येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नलिनी श्रीहरन आणि आरपी रविचंद्रन यांच्यासह सहा दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

[read_also content=”उत्तराखंडमध्ये पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी; हे आयुर्वेदविरोधींचे काम- बाबा रामदेव https://www.navarashtra.com/india/five-patanjali-drugs-banned-in-uttarakhand-so-this-is-the-work-of-anti-ayurveda-baba-ramdev-nrgm-343524.html”]

माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा निकाल दिला. या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सहा दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नलिनी श्रीहरन आणि आरपी रविचंद्रन यांच्यासह सहा दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश दिले. नलिनी आणि रविचंद्रन यांनी त्यांच्या मुदतपूर्व सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि बीव्ही नागरथना यांच्या  खंडपीठाने यावेळई सांगितले की, या खटल्यातील दोषींपैकी एक असलेल्या एजी पेरारिवलन यांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय इतर दोषींच्या बाबतीतही लागू होतो.18 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने पेरारीवलनच्या सुटकेचे आदेश दिले होते. 

[read_also content=”आपला तो फेकू… दुसऱ्याचा तो पप्पू, सुषमा अंधारे यांची किरीट सोमय्यांवर खोचक टिका https://www.navarashtra.com/maharashtra/sushma-andhare-slams-bjp-former-mp-kirit-somaiya-343592.html”]

राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की 9 सप्टेंबर 2018 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी या प्रकरणातील सात दोषींच्या दयेच्या अर्जावर विचार केला आणि राज्यपालांना त्यांच्या जन्मठेपेसाठी त्यांच्या अधिकारांचा वापर करण्यास सांगितले.  श्रीहरन, रविचंद्रन, संथन मुरुगन, एजी पेरारिवलन, रॉबर्ट पायस आणि जयकुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि त्यांनी 23 वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात घालवला आहे. असाही उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.   श्रीहरन आणि रविचंद्रन यांनी कलम 161 अन्वये दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय घेण्यास ते सक्षम असून 9 सप्टेंबर 2018 रोजी राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय अंतिम असून राज्यपाल त्यावर विचार करू शकतात, असे राज्य सरकारने म्हटले होते. 

[read_also content=”साखर संघाच्या संचालकपदी सुहासिनीदेवी घाटगे यांची बिनविरोध निवड https://www.navarashtra.com/maharashtra/suhasinidevi-ghatge-was-elected-unopposed-as-the-director-of-sugar-association-nrdm-343597.html”]

 नलिनी श्रीहरन यांना वेल्लोरमधील महिलांसाठी असलेल्या विशेष तुरुंगात 30 वर्षांहून अधिक काळ ठेवण्यात आले आहे, तर रविचंद्रन हे मदुराई येथील मध्यवर्ती कारागृहात आहेत आणि 29 वर्षांच्या तुरुंगवास आणि माफीसह त्यांनी तब्बल 37 वर्षे तुरुंगात घालवले आहेत. 26 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने श्रीहरन आणि रविचंद्रन यांची मुदतपूर्व सुटका करण्याच्या याचिकेवर केंद्र आणि तामिळनाडू सरकारकडे उत्तर मागितले होते. दोघांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या 17 जूनच्या आदेशाला आव्हान दिले होते. मात्र, त्यांच्या सुटकेची याचिका न्यायालयानं फेटाळून लावली होती. यावेळी त्यांनी सह-दोषी पेरारिवलनच्या सुटकेच्या आदेशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला दिला होता.

Web Title: Sc orders premature release of all 6 convicts in rajiv gandhi assassination case nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2022 | 02:32 PM

Topics:  

  • Rajiv Gandhi
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Supreme Court on Firecrackers: दिवाळीपूर्वी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘फटाक्यांवर पूर्ण बंदी शक्य नाही’, मात्र ही अट घातली
1

Supreme Court on Firecrackers: दिवाळीपूर्वी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘फटाक्यांवर पूर्ण बंदी शक्य नाही’, मात्र ही अट घातली

Supreme Court News: दिवाणी न्यायाधीश होण्यासाठी 3 वर्षांच्या वकिली सरावाची अट रद्द: सर्वोच्च न्यायालय
2

Supreme Court News: दिवाणी न्यायाधीश होण्यासाठी 3 वर्षांच्या वकिली सरावाची अट रद्द: सर्वोच्च न्यायालय

अयोध्यामध्ये प्रस्तावित मस्जिदचा आरखडा नाकारला, सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराऐवजी बांधकाम करण्याचे दिले होते आदेश
3

अयोध्यामध्ये प्रस्तावित मस्जिदचा आरखडा नाकारला, सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराऐवजी बांधकाम करण्याचे दिले होते आदेश

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसला दिलासा नाही; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावली, जाणून घ्या नेमकं काय होतं प्रकरण
4

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसला दिलासा नाही; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावली, जाणून घ्या नेमकं काय होतं प्रकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.