शहीद मुदासिर अहमद शेख नक्की कोण आहेत? त्यांची आई पाकिस्तानी आहे की भारतीय? वाचा सविस्तर
जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हल्ल्यानंतर मोदी सरकारने भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर पाठवण्याची मोहीम सुरू केली आहे.पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना कोणतीही सूट दिलेली नाही. मात्र मरणोत्तर शौर्य चक्र विजेते आणि शहीद जवान मुदासिर अहमद शेख यांच्या आई शमीमा अख्तर यांना पाकिस्तानला न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत सरकार शहीद जवानाच्या आईला देखील पाकिस्तानात पाठवत आहे, अशा बातम्या सोशल मीडियावर येत होत्या. त्याचं बारामुला पोलिसांनी खंडन केलं आहे. पोलिसांनी या बातम्या निराधार व खोट्या असल्याचे स्पष्ट केले असून शहीद मुदासिर यांची आई भारतातच राहणार असल्याचं म्हटलं आहे.
मुदासिर यांची आई नेमकी कोणत्या देशाची रहिवाशी आहे?
जम्मू-काश्मीर पोलिस दलातील शहीद कॉन्स्टेबल मुदासिर यांचे काका यांनी माध्यमांना सांगितले की शहीद यांची आई घरी परतली आहे. त्यांना पाकिस्तानात पाठवण्यात आलेलं नव्हतं. त्यांनी मोदी सरकारचे आभार मानले आणि स्पष्ट केले की त्यांची वहिनी शमीना या पाकव्याप्त काश्मीरच्या रहिवासी आहेत. जो भाग आमच्या भारताचा आहे. केवळ खऱ्या पाकिस्तानी नागरिकांनाच निर्वासित केले पाहिजे.”
शहीद जवान मुदासिर अहमद कोण होते?
जम्मू-कश्मीर पोलिस दलात कार्यरत असलेले मुदासिर अहमद शेख हे बारामुला येथे एका दहशतवादी ऑपरेशन दरम्यान शहीद झाले. २५ मे २०२२ रोजी बारामुलामध्ये यात्रेकरूंवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात दशतवाद्यांशी त्यांनी एकट्याने झुंज दिली होती. असामान्य शौर्य दाखवलं होतं. या चकमकीत ते गंभीर जखमी झाले आणि शहीद झाले. मुदासिर यांनी जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. २०२२ साली त्यांना मरणोत्तर “शौर्य चक्र” देऊन सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेले अलोक जोशी नक्की कोण आहेत?
मे २०२३ मध्ये दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शहीद जवान मुदासिर अहमद शेख यांना मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी त्यांची आई शमीमा यांनी हा सन्मान स्वीकारला होता. त्या वेळी राष्ट्रपती मुर्मू भावुक झाल्या होत्या.