Lata Mangeshkar Death: सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटी त्यांच्याशी संबंधित आठवणी शेअर करत आहेत. या यादीत पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरचेही नाव आहे, ज्याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये शोएबने २०१६ मध्ये लताजींसोबत झालेल्या फोन संभाषणाचा उल्लेख केला आहे.
तो म्हणाला, “२०१६ मध्ये, जेव्हा मी भारतात काम करत होतो, तेव्हा मला लताजींशी फोनवर बोलण्याचा बहुमान मिळाला होता. मी त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी आपल्या मधुर आवाजात उत्तर दिलं. मी जेव्हा त्यांना लताजी हाक मारली तेव्हा त्या म्हणाल्या, मला आई म्हणा, तेव्हापासून मी त्यांना आई म्हणू लागलो.
शोएब पुढे म्हणाला, लताजींनी माझ्याशी त्यांच्या क्रिकेट प्रेमाविषयी सांगितले की, तिने माझे अनेक सामने पाहिले आहेत आणि मैदानावर सचिन तेंडुलकरसोबत खूप भांडतानाही पाहिले आहे. लता दीदी म्हणाल्या की, तू मला मैदानावर आक्रमक वाटतो. तो म्हणाला होता की, मी माझ्या रागासाठी प्रसिद्ध आहे.
जेव्हा मी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्या म्हणाल्या की आता त्यांचे नवरात्रीचे उपवास सुरू आहेत आणि त्यानंतर त्यांना हवं तेव्हा भेटता येईल. मात्र, दुर्दैवाने तो दिवस आला नाही. त्यांनी मला अनेक आशीर्वाद दिले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण झाले आणि मी भारतात येऊ शकलो नाही. त्यांना कधीही भेटू शकलो नाही, ज्याचा मला कायम खेद राहील.
लता दीदीेचं दीर्घ आजाराने ६ फेब्रुवारीला निधन झालं. लताजी ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी ८ दशके हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केले आणि एकापेक्षा जास्त गाण्यांना आवाज दिला. विनयशील व्यक्तिमत्व असलेल्या भारतरत्न लतादिदी यांचा स्वर म्हणजे भावना आणि संवेदनांचा अनोखा अविष्कार आहे. त्यांचं गाणं केवळ सप्तसुरांपर्यंत मर्यादित नव्हतं, तर एक तरल अलौकिक अनुभुती देणारं, जगणं समृद्ध करणारं असं स्वरामृत आहे. हे स्वरामृत प्राशन करून इथलं प्रत्येक मन संगीतमय झालं आहे.