शोयब अख्तर(फोटो-सोशल मीडिया)
Shoaib Akhtar’s statement before India vs Pakistan match : आशिया कप २०२५(Asia Cup 2025) स्पर्धेला ९ सप्टेंबर रोजी सुरवात झाली आहे. आतापर्यंत या स्पर्धेत ४ सामने खेळवण्यात आले आहेत. आज श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सामना रंगणार आहे. तत्पूर्वी सध्या चर्चा रंगते आहे ती भारत आणि पाकिस्तान (IND VS PAK)यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या सामन्याची, जो सामना १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरने भारत-पाकिस्तान सामन्याविषयी मोठे भाष्य केले आहे. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर बोलताना अख्तरने म्हटले भारत पाकिस्तानला सहज हरवेल असा विश्वास व्यक्त केला.
पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज अख्तर म्हणाला की, “भावना खूप तीव्र असून युद्धानंतर आम्ही पहिल्यांदाच भारताविरुद्ध खेळणार आहोत, जरा विचार करा. भारत आम्हाला पराभूत करण्यासाठी सर्व प्रकारे सज्ज झाला आहे. हा सामना खूप मनोरंजक असा होणार आहे. हा एक दबावाचा सामना असेल.” असे देखील अख्तर म्हणाला.
अख्तर पुढे असे देखील म्हणाला की, “मी हसन अलीकडे नवीन चेंडू सोपवला असता, तो अशा परिस्थितीत खेळला आहे. भारताविरुद्ध पहिल्या ४ षटकांत पाकिस्तानला जास्तीत जास्त दबाव आणण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. मला हसन अलीने शाहीनसोबत आक्रमक खेळताना आणि हरिस रौफने मधल्या षटकांत गोलंदाजी करायला पाहिजे असे वाटते.”
शोयब अख्तरने एक गोष्ट कबूल केली की, “भारताला पराभूत करणे कठीण आहे. भारत तुमच्यावर सर्व प्रकारे दबदबा राखणार आहे. ते तुम्हाला खाली खेचण्याचा देखील प्रयत्न करतील. यात काही एक शंका नाही. भारताविरुद्धचा सामना जिंकणे पाकिस्तानसाठी कठीण असणार आहे.”
हेही वाचा : ‘विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध अग्निपरीक्षा’, मुख्य प्रशिक्षकांकडून आगामी रणनीती स्पष्ट
भारतीय संघ खालीलप्रमाणे
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, संजू सॅमसन, कुलदीप यादव, हर्षित राणा, रिंकू सिंग.
पाकिस्तान संघ खालीलप्रमाणे
सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रफ, हारिस रौफ, हसन अली, फखर जमान, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हरीस, मोहम्मद वसीम जूनियर, साहिबजादा फरहान, मोहम्मद नवाज, सैम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी, सुफियान मोकीम.