PAK vs IND : ९ तारखेपासून यूएईमध्ये आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यावेळी आशिया कप टी२० स्वरूपात खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ घोषित होईन दोन आठवडे उलटले आहे. भारताने १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. सूर्यकुमार यादवकडे संघाची धुरा देण्यात आली आहे. तर शुभमन गिल उपकर्णधार असणार आहे. भारतीय संघ १० सप्टेंबरपासून यूएईविरुद्ध पहिला सामना खेळून मोहिमेला सुरुवात करणार आहे. तसेच १४ सप्टेंबरला भारत आणि भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यात महामुकाबला खेळला जाणार आहे. त्यामुळे या संघाबाबतच्या अनेक कहाण्या सध्या सोशल मिडियावर बोलल्या जात आहेत. अशातच भारताच्या स्फोटक माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागसोबतचा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्याबाबत एक किस्सा अजून देखील आठवला जातो. आपण त्याबाबत जाणून घेऊया.
आशिया कपमध्ये १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या सामन्याबद्दल खूप चर्चा रंगली आहे. तसेच प्रत्येक भारतीयाला वाटतं की पाकिस्तानला भारताने चांगली धूळ चारावी. कारण, पाहलगामन हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध चांगलीच संतापची लाट उठली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कपमधील सामन्यात कोणताही पाकिस्तानी खेळू विनाकारण बोलला तर त्याला वीरेंद्र सेहवागकडून देण्यात आलेले चोख उत्तरदेण्यात येईल. अशी अपेक्षा भारती चाहते बाळगून आहेत.सेहवाग नेमकं काय बोलला होता हे आपण जाणून घेऊया. अनेक वर्षांपूर्वी झालेल्या सेहवागच्या त्याच्या मुलाखतीत त्याच्या आणि अख्तरमध्ये झालेल्या शब्द-युद्धाचाबाबत त्याने उल्लेख केला होता. ज्यानंतर अनेक बातम्या आल्या होत्या. तेव्हा नेमकं काय घडलं होतं? आपण जाणून घेऊया.
सेहवाग फलंदाजी करत असताना शोएब त्याला म्हणाला की, “हुक मारून दाखवा.”, त्यानंतर सेहवागने उत्तर दिले की, “तू गोलंदाजी करत आहे की भीक मागत आहे?” एक षटक संपल्यानंतर, सेहवाग हे गोष्ट लक्षात ठेवतो. शोएब पुन्हा तीच गोष्ट बोलतो की, “हुक मारून दाखवा”
हेही वाचा : शुभ’मना’ला तडे? सारा तेंडुलकरसोबत ‘तो’ मुलगा कोण? जाणून घ्या सविस्तर..
त्यानंतर सेहवाग जोरदार उत्तर देतो की, “तो नॉन-स्ट्राइक एंडवर उभा असलेला तुमचा बाप आहे. त्याला सांगा, तो तुला मारून दाखवेन.” त्यानंतर शोएब सचिनला बाउन्सर टाकतो आणि सचिन त्यावर षटकार लागवतो. यानंतर सेहवाग अख्तरला उत्तर देतो आणि सेहवाग म्हणतो की “बाप हा बाप असतो, एक मुलगा हा मुलगा असतो.”