
delhi bomb Blast
तपास अधिकाऱ्यांच्या मते, या मॉड्यूलमध्ये डॉ. उमरची भूमिका महत्त्वाची होती. डॉ. उमरने अमोनियम नायट्रेट, ट्रायएसीटोन ट्रायपेरोक्साइड (टीएटीपी) किंवा इतर कोणतेही रसायन खरेदी करायचा तेव्हा ते खरेदी केलेले प्रमाण, स्रोत आणि ते कसे तयार केले जाईल यासह तपशीलवार माहिती गटात पोस्ट केली जात असे. डिजिटल फूटप्रिंट्सवरून असे दिसून आले आहे की उमरने अमोनियम नायट्रेट, टीएटीपी, सल्फर डायऑक्साइडसह बहुतेक स्फोटक रसायने आणि टायमर आणि वायर्ससारखी उपकरणे खरेदी करण्यात आली होती.
खरेदी केलेल्या स्फोटकांचा साठा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी डॉ. मुझम्मिल यांच्यावर होती. जेव्हा जेव्हा स्फोटके आणि रसायनांचा साठा त्यांच्या भाड्याच्या घरात हलवला जात असे, तेव्हा मुझम्मिल त्या सर्व वस्तूंचे फोटो काढून मॉड्यूलला पाठवत असे. यामागचा उद्देश स्फोटके सुरक्षितरीत्या साठवली गेल्याची खात्री करून देणे हा होता. शिवाय, डॉ. उमर मॉड्यूलकडून वापरल्या जाणाऱ्या आय20 कारच्या खरेदीसंदर्भातील माहितीही तो नियमितपणे शेअर करत असे.
तपासादरम्यान समोर आलेले महत्त्वाचे नाव म्हणजे फैसल इशाक भट्ट. तो जैश-ए-मोहम्मदशी संबंधित या मॉड्यूलचा हँडलर असल्याचा संशय आहे. डॉ. उमर स्फोटके गोळा करणे, त्यांची तयारी करणे, चाचण्या घेणे आणि इतर संबंधित माहिती दररोज या हँडलरला पाठवत असल्याची माहिती आरोपींनी दिली आहे. अटक केलेल्या आरोपींना अजूनही या हँडलरची खरी ओळख पटलेली नाही. असेही
एजन्सींच्या माहितीनुसार, फरार मुझफ्फर अफगाणिस्तानात पळून गेल्यानंतर मॉड्यूलच्या संपूर्ण ऑपरेशन व रिपोर्टिंगची जबाबदारी हा हँडलर सांभाळत होता. तपासात असेही आढळले की हा हँडलर +966 कोड असलेला सौदी अरेबियाचा व्हर्च्युअल नंबर वापरत होता. त्याची खरी ओळख शोधण्याचे काम सध्या गुप्तचर यंत्रणा करत आहेत.
प्राथमिक तपासानुसार ‘फैसल इशाक भट’ हे नाव टोपणनाव असण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातील जैश नेटवर्कने संपूर्ण कटाचे स्थानिकीकरण दाखवण्यासाठी आणि पाकिस्तानी हात झाकण्यासाठी जाणूनबुजून काश्मिरी नावाचा वापर केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आतापर्यंतच्या तपासात जैश-ए-मोहम्मदच्या चार पाकिस्तानी हँडलर्सची नावे समोर आली असून त्यात अबू उकाशा, हंजुल्लाह, निसार आणि फैसल इशाक भट यांचा समावेश आहे.
Ans: या सिग्नल ग्रुपचा अॅडमिन डॉ. मुझफ्फर असल्याचे तपासात समोर आले आहे.
Ans: ग्रुपमध्ये डॉ. उमर, डॉ. मुझम्मिल, डॉ. आदिल आणि डॉ. शाहीन यांचा समावेश असल्याचे आढळले.
Ans: अमोनियम नायट्रेट, TATP, सल्फर डायऑक्साइड यांसह स्फोटकांसाठी लागणारी उपकरणे, टायमर आणि वायर्स खरेदी केल्याचे आढळले.