Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kanpur News: ‘साहेब, मी जिवंत आहे… माझं पोस्टमॉर्टम थांबवा!’ कानपूरमधील विचित्र प्रकार

मृतदेहाची ओळख पटवण्यात चूक झाली होती. आता पुन्हा एकदा त्या मृत व्यक्तीची खरी ओळख पटवण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 14, 2025 | 11:52 AM
Kanpur News: ‘साहेब, मी जिवंत आहे… माझं पोस्टमॉर्टम थांबवा!’  कानपूरमधील विचित्र प्रकार
Follow Us
Close
Follow Us:

Uttar Pradesh News:  कानपूरच्या घाटमपूर पोलिस स्टेशन परिसरात एक अत्यंत विचित्र आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने थेट पोलिस स्टेशन गाठून विनंती केली, “साहेब, मी जिवंत आहे… कृपया माझं पोस्टमॉर्टम थांबवा.” ही घटना ऐकताच उपस्थित पोलिसांसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

घाटमपूर परिसरात गुरुवारी एक बेवारस मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेहाचा फोटो सोशल मीडियावर प्रसारित केला. काही वेळातच सुमन नावाच्या महिलेनं घाटमपूर पोलिस ठाण्यात येऊन मृतदेहाची ओळख तिच्या भावासारखी असल्याचे सांगितले. मृत व्यक्तीने लाल शर्ट आणि काळी पँट घातली होती. सुमन म्हणाली, “हे कपडे माझ्या भावाचेच आहेत आणि चेहराही जुळत आहे.” त्यामुळे पोलिसांनी मृतदेह अजय शंखवार या नावाने ओळखून शवविच्छेदनासाठी पाठवला.

Local Body Elections in Maharashtra: महापालिका निवडणुकांचा मुहूर्त ठरला; दिवाळीनंतर उडणार निवडणुकांचा धुराळा

मात्र, थोड्याच वेळात सर्वांना धक्का देणारी घटना घडली.  भितरगाव परिसरातील वीटभट्टीवर काम करणारा इदुरखू गावातील अजय शंखवार थेट पोलिस स्टेशनमध्ये आला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. अजयने  आपण जिवंत असल्याचे सांगितले. तसेच घडलेला प्रकारसह सांगितला. अजयने सांगितले की, “माझ्याकडे मोबाईल नाही. त्यामुळे महिन्यातून दोन-चार वेळाच घरी फोन करतो. आज पोलिस भट्टीवर आले आणि माझ्याबाबत चौकशी करत होते. त्यांना पाहून मलाही आश्चर्य वाटलं.”

पोलिसांनी त्याला सांगितलं की, त्याच्या बहिणीने एका मृतदेहाची ओळख अजय शंखवार म्हणून केली आहे. त्यामुळे त्याने त्वरित घाटमपूर पोलिस स्टेशन गाठून स्वतः जिवंत असल्याचा पुरावा दिला. या संपूर्ण प्रकरणामुळे मृतदेह कोणाचा आहे, याचा तपास पुन्हा नव्याने सुरू करण्यात आला आहे. सध्या घाटमपूर पोलिस बेवारस मृत व्यक्तीची खरी ओळख पटवण्यासाठी वैद्यकीय तपासणी कऱण्यात येणार आहे.

अरे बापरे! अवकाशात उडणाऱ्या पक्ष्याचे पोट फाडून बाहेर आला ईल मासा, आश्चर्यकारक दृश्यांनी सर्वच हादरले अन्

नेमक काय आहे प्रकरण?

घाटमपूरमधील अजय शंखवार नावाच्या तरुणाने थेट पोलिस स्टेशन गाठून आपण जिवंत असल्याची माहिती दिली. अजय शंखवार भितरगाव येथील वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करतो. त्याच्याकडे मोबाईल नसल्यामुळे तो आठवड्यातून एक-दोन वेळा दुसऱ्याच्या फोनवरून कुटुंबाशी संपर्क साधतो. शुक्रवारी, पोलिस जेव्हा त्याच्या शोधात वीटभट्टीवर पोहोचले, तेव्हा अजय जिवंत असल्याचे स्पष्ट झाले आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आलं.

त्यापूर्वू  घाटमपूरमधील चौकात एक बेवारस मृतदेह पोलिसांना आढळून आला आणि तो  अजय शंखवार यांचा असल्याचे सांगितले जाऊ लागले. अजयच्या बहिणीनेही संबंधित मृतदेह अजयचा असल्याचा दावा केला. त्यानुसार पोलिसांनी पोस्टमॉर्टम प्रक्रिया सुरू केली होती. मात्र अजय पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर सर्वच हादरले.

घाटमपूरचे एसीपी कृष्णकांत यादव यांनी सांगितले की, मृतदेहाची ओळख पटवण्यात चूक झाली होती. आता पुन्हा एकदा त्या मृत व्यक्तीची खरी ओळख पटवण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकारामुळे अजयच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिकांमध्येही ही घटना चर्चेचा विषय बनली आहे.

Web Title: Sir im alive stop my postmortem strange incident in kanpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 11:52 AM

Topics:  

  • crime
  • Uttar Pradesh news

संबंधित बातम्या

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
1

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Pune Crime: मौजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी केली चोरी, दुचाकीसह दोन रिक्षा जप्त
2

Pune Crime: मौजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी केली चोरी, दुचाकीसह दोन रिक्षा जप्त

Chhattisgarh Crime: एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय तरुणाने रचला मोठा कांड; इंटरनेटवर पाहून बॉम्ब तयार केले आणि पॅकेट तयार करून…
3

Chhattisgarh Crime: एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय तरुणाने रचला मोठा कांड; इंटरनेटवर पाहून बॉम्ब तयार केले आणि पॅकेट तयार करून…

Satara crime: दारूच्या नशेत रिक्षाचालकाचे भयानक कृत्य! आधी २-३ वाहनांना दिली धडक, नंतर महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेलं
4

Satara crime: दारूच्या नशेत रिक्षाचालकाचे भयानक कृत्य! आधी २-३ वाहनांना दिली धडक, नंतर महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.