Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवरून नवा वाद; पत्नीने थेट उच्च न्यायालयाचे दार ठोठावले

Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगमो यांनी सांगितले की, कुटुंबाला आपल्या आवडीच्या रुग्णालयात दाखल करण्याचा अधिकार असायला हवा. पण सध्या त्यांना हा निर्णय घेऊ दिला जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 19, 2026 | 01:40 PM
Sonam Wangchuk (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Sonam Wangchuk (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत चिंता

दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल

वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगमो यांचा आरोप..

 

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढत असतानाच त्यांच्या पत्नीने मोठे पाऊल उचलले आहे. सफदरजंग रुग्णालयाऐवजी दुसऱ्या खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी मिळावी, यासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आपल्या पतीच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड करायची नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. वांगचुक गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्यानंतर प्रशासनाने त्यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांच्या कुटुंबाला या उपचारपद्धतीबाबत समाधान नसल्याचे आता समोर आले आहे.

वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगमो यांचा आरोप..

वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगमो यांनी सांगितले की, कुटुंबाला आपल्या आवडीच्या रुग्णालयात दाखल करण्याचा अधिकार असायला हवा. पण सध्या त्यांना हा निर्णय घेऊ दिला जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळेच त्यांनी न्यायालयाची मदत घेण्याचा निर्णय घेतला.सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यांनुसार, रुग्णालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आरोग्य अहवालात काही महत्त्वाची वैद्यकीय माहिती पूर्णपणे नमूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे कुटुंबाच्या मनात शंका निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दुसर्‍या रुग्णालयात हलवण्यास किंवा डिस्चार्ज देण्यास नकार…

याशिवाय, वारंवार विनंती करूनही वांगचुक (Sonam Wangchuk ) यांना दुसर्‍या रुग्णालयात हलवण्यास किंवा डिस्चार्ज देण्यास परवानगी मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या मते, उपचारांपेक्षा निर्बंध अधिक जाणवत आहेत.त्यांनी असा दावा केला की, ज्या मजल्यावर वांगचुक यांच्यावर उपचार सुरू आहेत, तेथे मोठ्या संख्येने पोलीस तैनात आहेत. रुग्णालयात येण्या-जाण्यावरही अनेक मर्यादा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ही परिस्थिती सामान्य वैद्यकीय उपचारांसारखी वाटत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Sonam Wangchuk: उपोषणामुळे चर्चेत असलेले सोनम वांगचुक पैसे कसे …

न्यायालयाकडे तातडीने सुनावणी घेण्याची मागणी

याच कारणामुळे त्यांनी न्यायालयाकडे तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. वांगचुक यांच्या प्रकृतीत आणखी बिघाड होण्यापूर्वी त्यांना पसंतीच्या खासगी रुग्णालयात हलवण्यास परवानगी मिळावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.दरम्यान, वांगचुक यांचे उपोषण गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. विद्यार्थ्यांशी संबंधित काही गंभीर प्रश्न आणि परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी अन्नत्यागाचा मार्ग स्वीकारला होता. त्यांच्या आंदोलनामुळे देशभरात या विषयावर चर्चा सुरू झाली आहे.

देशभरातील अनेकांचे लक्ष

उपोषणाचा कालावधी वाढत गेल्यानंतर त्यांच्या आरोग्याची चिंता वाढली. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर प्रशासनाने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, या निर्णयानंतरही वाद थांबलेला नाही. त्यांच्या समर्थकांकडून तसेच कुटुंबीयांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.सध्या सर्वांचे लक्ष उच्च न्यायालयाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. न्यायालयाने परवानगी दिल्यास वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवले जाऊ शकते. तोपर्यंत त्यांच्यावर सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू राहणार आहेत.वांगचुक यांच्या प्रकृतीसोबतच त्यांच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याकडेही देशभरातील अनेकांचे लक्ष लागले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे आरोग्य, प्रशासन आणि नागरिकांच्या अधिकारांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Sonam Wangchuk : 20 जुलैला काय होणार? रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचे पहिले आवाहन

Web Title: Sonam wangchuk removed from jantar mantar and taken to hospital by delhi police cjp creates an uproar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • High court
  • Medical Sector
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

‘तो’ VIDEO गुन्हा नाही! PFI सदस्याला हायकोर्टाकडून जामीन; न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण
1

‘तो’ VIDEO गुन्हा नाही! PFI सदस्याला हायकोर्टाकडून जामीन; न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.