केंद्र सरकारनेच दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी ते शांततेच्या मार्गाने मागणी करत होते. कारण हा सीमाभाग आहे, संवेदनशील भाग आहे. इथे आर्मीसोबतच जनतेची साथ असणेही महत्त्वाचे आहे.
सोनम वांगचुकचा काही परदेश दौऱ्या संशयास्पद असल्याचे सांगून पोलीस प्रमुखांनी सांगितले की, द डॉन (पाकिस्तानी वृत्तपत्र) च्या पाकिस्तानातील एका कार्यक्रमात सहभागी होऊन बांगलादेशलाही भेट दिली होती.
सोनम वांगचुक यांनी लडाखला संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची आणि त्याला राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत ३५ दिवसांच्या धरणे आंदोलनाची घोषणा केली होती.
गृह मंत्रालयाने लडाखमधील हिंसाचारासाठी कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांना जबाबदार धरले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की सोनम वांगचुक यांनी त्यांच्या प्रक्षोभक विधानांनी जमावाला चिथावणी दिली