Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonia Gandhi : जन्मानंतर काही तासांतच पहिल्या बाळाचा मृत्यू; सोनिया गांधींनी पुस्तकातून सांगितला हृदयद्रावक प्रसंग

Sonia Gandhi : सोनिया गांधी यांनी 'बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह' या पुस्तकातून पहिल्या बाळाच्या निधनाचा वेदनादायी प्रसंग सांगितला. राजीव गांधी आणि इंदिरा गांधींच्या भावनिक आठवणींनाही उजाळा दिला.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 10, 2026 | 09:06 PM
Sonia Gandhi : जन्मानंतर काही तासांतच पहिल्या बाळाचा मृत्यू; सोनिया गांधींनी पुस्तकातून सांगितला हृदयद्रावक प्रसंग

Sonia Gandhi : जन्मानंतर काही तासांतच पहिल्या बाळाचा मृत्यू; सोनिया गांधींनी पुस्तकातून सांगितला हृदयद्रावक प्रसंग

Follow Us
Follow Us:

 

  • बाळाला नदीत विसर्जित करण्यास दिला नकार
  • राजीव गांधी आणि इंदिरा गांधींच्या भावनिक आठवणींनाही उजाळा
  • इंदिरा गांधींनी दौरा अर्धवट सोडून गाठले रुग्णालय
 

 

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) आपल्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकातून आयुष्यातील एका अत्यंत वेदनादायी प्रसंगाचा उलगडा केला आहे. लग्नानंतर काही वर्षांतच त्यांनी आणि त्यांचे पती, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आपल्या पहिल्या बाळाला गमावले होते. जन्मानंतर अवघ्या काही तासांतच नवजात बाळाचा मृत्यू झाला होता. या घटनेचा धक्का दोघांनाही सहन करणे कठीण झाले होते.

या आठवणी सांगताना सोनिया गांधी यांनी त्या काळातील दुःख, कुटुंबीयांचा आधार आणि बाळाला अखेरचा निरोप देण्याच्या वेदनादायी क्षणांचे वर्णन केले आहे.

 

सोनिया गांधी यांच्या पुस्तकानुसार, १८ जानेवारी १९६९ रोजी त्यांनी एका मुलाला जन्म दिला होता. ही प्रसूती नियोजित वेळेपूर्वी झाली होती. राहुल गांधी यांच्या जन्माच्या सुमारे एक वर्ष आधी ही घटना घडली होती. गर्भधारणेदरम्यान गांधी कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, बाळाच्या जन्मानंतर काही तासांतच परिस्थितीने अनपेक्षित वळण घेतले आणि कुटुंबाचा आनंद दुःखात बदलला.

 

अन् काही तासातंच तो जगात नसल्याची बातमी आली

 

सोनिया गांधी यांनी पुस्तकात लिहिले आहे की, बाळाच्या जन्मानंतर त्यांनी त्याचा पहिला आवाज ऐकला. त्यानंतर त्याला इनक्युबेटरमध्ये ठेवण्यात आले होते. काही वेळाने राजीव गांधी त्यांना बाळाला दाखवण्यासाठी घेऊन गेले. ते बाळ दिसायला निरोगी होते. त्याचे दाट काळे केस आणि लांब, नाजूक बोटे त्यांना स्पष्टपणे आठवत होती.

पहिल्याच नजरेत त्या आणि राजीव गांधी बाळाच्या प्रेमात पडले होते. मात्र, काही तासांनंतर डॉक्टरांनी बाळ या जगात नसल्याची दुःखद बातमी त्यांना दिली.

 

या प्रसंगाचे वर्णन करताना सोनिया गांधी यांनी आपल्याला बसलेल्या धक्क्याची तीव्रता व्यक्त केली आहे. बाळाचा मृत्यू झाल्याचे ऐकल्यानंतर त्यांना या वास्तवावर विश्वास ठेवणे अशक्य झाले होते. नेमके असे का घडले, असा प्रश्न त्या वारंवार विचारत होत्या. या घटनेमुळे आपण आणि राजीव गांधी पूर्णपणे खचून गेलो होतो. दोघांचेही मन दुःखाने भरून आले होते, असे त्यांनी नमूद केले आहे.

Droupadi Murmu : नागरिकांवर श्रेष्ठत्व नव्हे, सेवाभाव ठेवा! राष्ट्रपती मुर्मू यांचा आयपीएस अधिकाऱ्यांना कानमंत्र

इंदिरा गांधींनी दौरा अर्धवट सोडून गाठले रुग्णालय

 

या कठीण प्रसंगी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सोनिया आणि राजीव गांधी यांना मोठा भावनिक आधार दिला. घटनेची माहिती मिळताच त्यांनी आपला सरकारी दौरा अर्धवट सोडला आणि रुग्णालय गाठले. त्या वेळी इंदिरा गांधी स्वतःही या घटनेमुळे व्यथित झाल्या होत्या. त्यांचे डोळे लाल आणि सुजलेले होते. त्यांनी दोघांनाही जवळ घेतले आणि बराच वेळ त्यांच्यासोबत राहून त्यांना धीर दिला, अशी आठवण सोनिया गांधी यांनी पुस्तकात सांगितली आहे.

राजीव गांधी यांनाही या घटनेचा मोठा मानसिक धक्का बसला होता. तेही सोनिया गांधी यांच्यासोबत अश्रू अनावर होऊन रडले होते. मुलाला गमावण्याचे दुःख दोघांसाठीही अत्यंत असह्य होते. अशा परिस्थितीत इंदिरा गांधी यांनी दिलेला भावनिक आधार त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला.

Election Commission : निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांनाही आचारसंहितेचे बंधन; निवडणूक आयोगाचे कडक निर्देश

बाळाला नदीत विसर्जित करण्यास दिला होता नकार

 

पहिल्या बाळाला अखेरचा निरोप देण्याच्या प्रसंगाचाही सोनिया गांधी यांनी पुस्तकात उल्लेख केला आहे. त्या काळातील परंपरेनुसार नवजात बाळाचा मृतदेह नदीत विसर्जित करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, सोनिया गांधी यांनी या सूचनेला स्पष्ट नकार दिला. आपल्या बाळाला अशा प्रकारे निरोप देणे त्यांना मान्य नव्हते.

कुटुंबात अनेकदा चर्चा झाल्यानंतर अखेर बाळाला दक्षिण दिल्लीतील महरौली परिसरातील फिरोज गांधी यांच्या फार्महाऊसमध्ये दफन करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेणे अत्यंत वेदनादायी होते; मात्र दुसरा पर्याय नसल्याचे सोनिया गांधी यांनी लिहिले आहे.

या घटनेनंतरही सोनिया आणि राजीव गांधी त्या ठिकाणी अनेकदा जात असत. बाळाला ज्या ठिकाणी दफन करण्यात आले होते, त्या जागेजवळ ते काही काळ थांबत असत. तेथे असलेल्या बोगनवेलियाच्या रोपाजवळ एक फूल ठेवून ते आपल्या बाळाची आठवण काढत असत.

सोनिया गांधी यांच्या या पुस्तकातून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील क्वचितच चर्चेत आलेल्या भावनिक प्रसंगाला उजाळा मिळाला आहे. राजकीय जीवनातील अनेक महत्त्वाच्या घटनांबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील सुख-दुःख आणि कुटुंबीयांशी जोडलेल्या आठवणीही त्यांनी या पुस्तकातून मांडल्या आहेत.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: सोनिया गांधी यांनी आपल्या पुस्तकात कोणत्या प्रसंगाचा उल्लेख केला आहे?

    Ans: सोनिया गांधी यांनी लग्नानंतर पहिल्या बाळाच्या जन्मानंतर काही तासांतच त्याचा मृत्यू झाल्याच्या दुःखद प्रसंगाचा उल्लेख केला आहे.

  • Que: सोनिया गांधी यांच्या पहिल्या बाळाचा जन्म कधी झाला होता?

    Ans: १८ जानेवारी १९६९ रोजी सोनिया गांधी यांनी एका मुलाला जन्म दिला होता.

  • Que: राजीव गांधी यांची या घटनेवरील प्रतिक्रिया काय होती?

    Ans: पहिल्या बाळाच्या निधनामुळे राजीव गांधी यांनाही मोठा मानसिक धक्का बसला होता. ते सोनिया गांधी यांच्यासोबत अश्रू ढाळत होते.

Web Title: Sonia gandhi first child loss rajiv gandhi book memoir rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 09:06 PM

Topics:  

  • Rahul Gandhi
  • Rajiv Gandhi
  • Sonia Gandhi

संबंधित बातम्या

Gandhi: जावाजावांची भांडणं चव्हाट्यावर, सोनिया गांधीने केले मनेका गांधीवर अनेक खुलासे
1

Gandhi: जावाजावांची भांडणं चव्हाट्यावर, सोनिया गांधीने केले मनेका गांधीवर अनेक खुलासे

Sonia Gandhi Book : सोनिया गांधींचा मोठा खुलासा! आणीबाणीवरून राजीव – संजय गांधींमध्ये झाला होता वाद; इंदिरा गांधींची चूकही मान्य
2

Sonia Gandhi Book : सोनिया गांधींचा मोठा खुलासा! आणीबाणीवरून राजीव – संजय गांधींमध्ये झाला होता वाद; इंदिरा गांधींची चूकही मान्य

Sonia Gandhi : हे राजकीय पुस्तक नाही, तर खासगी आयुष्याची कहाणी; सोनिया गांधींचे स्पष्टीकरण
3

Sonia Gandhi : हे राजकीय पुस्तक नाही, तर खासगी आयुष्याची कहाणी; सोनिया गांधींचे स्पष्टीकरण

Amit Shah : हिम्मत असेल तर संसदेत येऊन चर्चा करा; अमित शाहांचे राहुल गांधींना थेट आव्हान
4

Amit Shah : हिम्मत असेल तर संसदेत येऊन चर्चा करा; अमित शाहांचे राहुल गांधींना थेट आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.