Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jyoti Malhotra News: पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी प्रकरण; युट्यूबर ज्योती मल्होत्राचे थेट ISI सोबत संपर्क

काही महिन्यांपूर्वी, एका भारतीय व्यक्तीने ज्योती मल्होत्राच्या हालचालींबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे चिंता व्यक्त केली होती. २०२४ सालची एक पोस्ट आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे,

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 18, 2025 | 03:50 PM
Jyoti Malhotra News: पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी प्रकरण; युट्यूबर ज्योती मल्होत्राचे  थेट ISI सोबत संपर्क
Follow Us
Close
Follow Us:

हिसार: पाकिस्तानसाठी भारतीतील संवेदनशील गुप्त माहिती पाठविल्याप्रकरणी हरियाणामधील हिसार येथील युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक कऱण्यात आली आहे. तिच्या प्राथमिक चौकशीतून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती ही थेट पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI च्या तीन अधिकाऱ्यांशी संपर्कात होती. दिल्लीतील पाकिस्तानी दुतावासात कार्यरत असलेल्या ‘दानिश’नावाच्या अधिकाऱ्या माध्यमातून ती आयएसआयच्या संपर्कात आली होती.

पाकिस्तानी दुतावासातून ISI चा जाळे!

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, दिल्लीतील पाकिस्तानी दुतावासातून वीजा प्रक्रियेच्या आडून ISIचे एक पूर्ण नेटवर्क चालवले जात होते. पाकिस्तानात जाण्यासाठी वीजा अर्ज करणाऱ्यांना लक्ष्य करून त्यांना भारतातील गुप्त आणि संवेदनशील माहिती पुरवण्यासाठी तयार केले जोता होते. विशेष म्हणजे जे माहिती देण्यासाठी तयार होत त्यांना वीजा नाकारला जात नसे. ज्योती मल्होत्राही याच प्रक्रियेतून ISI च्या जाळ्यात अडकली.

BMC Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे गट मैदानात; शिवसेना भवनात ठरला मास्टरप्लॅन

ज्योती मल्होत्रा कोण आहे?

ज्योती ही हरियाणा पॉवर डिस्कॉमच्या निवृत्त अधिकाऱ्याची मुलगी असून तिने पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. तिच्या युट्यूब चॅनेलवर 3.21 लाख फॉलोअर्स असून, तिने तिच्या चॅनेलवर पाकिस्तानच्या प्रवासाबद्दलचीही माहिती दिली आहे. 13 मे रोजी केंद्र सरकारने गुप्तहेरीच्या आरोपाखाली ज्या अधिकाऱ्याला देश सोडण्याचे आदेश दिले, तोच दानिश हा तिचा संपर्कात होता. ज्योतीने व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट आणि टेलिग्रामसारख्या माध्यमांतून भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवल्याचे उघड झाले आहे.

संपर्काची सुरुवात कशी झाली?

2023 मध्ये ज्योतीला पाकिस्तानात जायचे होते. वीजासाठी तिने पाकिस्तानी दुतावासात अर्जही केला होता. त्यावेळी तिची दानिश सोबत भेट झाली. त्यानंतर ती अनेकदा त्याच्या संपर्कत आली. पाकिस्तानात गेल्यावरही तिला अली अहवान नावाच्या व्यक्तीने मदत केली. अली अहवान आणि दानिश यांचे जवळचे संबंध होते. धक्कादायक बाब म्हणजे च्या माहितीनुसार, चौकशीत ज्योतीने ISI अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती पुरवल्याची कबुली दिली आहे. गुन्हेगारी स्वरूपाचा हा गंभीर प्रकार असल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, ज्योतीच्या संपर्कातील इतर व्यक्तींविषयी तपास सुरू आहे. भारत सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

Operation Sindoor : भारतीय सैन्याने अशा उद्ध्वस्त केल्या होत्या पाकिस्तानी चौक्या; लष्कराने शेअर केला नवा

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी, एका भारतीय व्यक्तीने ज्योती मल्होत्राच्या हालचालींबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे चिंता व्यक्त केली होती. २०२४ सालची एक पोस्ट आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ज्योतीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची विनंती करण्यात आली होती.

कपिल जैन नावाच्या एका एक्स (ट्विटर) युजरने मे २०२४ मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेला ज्योतीच्या कारवायांची चौकशी करण्याची विनंती केली होती. त्या व्यक्तीने ज्योती मल्होत्राच्या यूट्यूब पेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि पोस्ट केले, “एनआयए, कृपया या महिलेवर बारकाईने लक्ष ठेवा. आधी ती पाकिस्तानी दूतावासातील एका कार्यक्रमात सहभागी झाली, नंतर १० दिवसांसाठी पाकिस्तानात गेली आणि आता ती काश्मीरला जात आहे. या सगळ्यामागे काही धोका असू शकतो.” अशी पूर्वकल्पना असलेला मेसेज एनआयएला केला होता.

 

Web Title: Spying for pakistan youtuber jyoti malhotras direct contact with isi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 03:50 PM

Topics:  

  • India-Pakistan Conflict
  • Jammu Kashmir News
  • Jyoti Malhotra News
  • pahalgam attack

संबंधित बातम्या

अनेक वादानंतर अखेर ‘Abir Gulaal’ची रिलीज डेट जाहीर; वापरली ‘सरदारजी 3’ ची स्ट्रेटेजी
1

अनेक वादानंतर अखेर ‘Abir Gulaal’ची रिलीज डेट जाहीर; वापरली ‘सरदारजी 3’ ची स्ट्रेटेजी

Pahalgam Attack बाबत नवा खुलासा! पाकिस्तानी दहशतवादी पहलगाममध्ये आले आणि लष्कराच्या इशाऱ्यावर हल्ला…; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
2

Pahalgam Attack बाबत नवा खुलासा! पाकिस्तानी दहशतवादी पहलगाममध्ये आले आणि लष्कराच्या इशाऱ्यावर हल्ला…; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

“चिदंबरम अँड कंपनीच्या काळातील १० पैकी… “; ‘ऑपरेशन सिंदूर’ वरून अमित शहांचा संसदेत रुद्रावतार
3

“चिदंबरम अँड कंपनीच्या काळातील १० पैकी… “; ‘ऑपरेशन सिंदूर’ वरून अमित शहांचा संसदेत रुद्रावतार

“मग तुम्ही का…?” ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधी-राजनाथ सिंह आमने-सामने; संसदेत गदारोळ
4

“मग तुम्ही का…?” ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधी-राजनाथ सिंह आमने-सामने; संसदेत गदारोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.